Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपण सज्ज आहे का ?

दुसऱ्या लाटेमुळे युरोपात पुन्हा लॉकडाऊन केलंय. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सज्ज आहे का ?

पाकिस्तान, चीन त्याही पेक्षा आपला, केवळ आपलाच नाही तमाम मानवजातीचा शत्रू कोण? म्हणाल तर यो कोरोना (Coronavirus). चीनच्या वुहान शहरात जगातला पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला, आता या गोष्टीला वर्ष होत आलं. आपल्या सगळ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, आपल्याकडे ही केरळमध्ये जानेवारीच्या अखेरीस पहिला रुग्ण सापडला, जो वुहानमध्येच शिक्षणासाठी राहत होता. बचावासाठी म्हणून घातलेला मास्क आता मोबाईल इतकाच सवयीचा झाला आहे. तो आपल्यासाठी अलंकार झाला आहे म्हणायला काही हरकत नाही. आता रुग्णसंख्या कमी होत आहे. पण…पण काय? अजूनही भीती संपलेली नाही. कारण ती दडली आहे Second Wave of Coronavirus या चार शब्दात.

३० जानेवारी २०२० ला पहिल्या रुग्णाची झाली खरी पण फेब्रुवारी आणि मार्चचे पाहिले दोन आठवडे या गोष्टीकडे कुणाचंही विशेष लक्ष नव्हतं. मध्यपूर्वेतून विमान प्रवास करून आलेल्यांमुळे आपल्याकडे त्याचा प्रसार सुरू झाला आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून खबरदारी म्हणून संपूर्ण देश लॉकडाउन केला गेला. तेंव्हा तिकडे युरोपातल्या स्पेन, इटली, फ्रान्स मध्ये कोरोनाचा थयथयाट सुरू होता. आशियात इराणमध्येही तसंच वातावरण होतं. लोक मृत्युमुखी पडत होते, मोठ्या संख्येने रुग्ण पॉजिटीव्ह होत होते.

तिथल्या परिचारिकांचे सोशल मीडियावर आलेले फोटो आठवत असतील… मे च्या अखेर पासून अनलॉक सुरू झाला आणि केसेस वाढायला लागल्या. कोरोनाच्या पहिल्या टप्प्याचा सर्वोच्च बिंदू आपल्याकडे आला तेंव्हा सप्टेंबर चालू होता. दिवसागणिक ९०००० रुग्ण सापडत होते. मुख्य हॉटस्पॉट तर आपलं राज्य होतं. पण आता ती परिस्थिती कमी झाली आहे. साधारणतः ५०००० च्या आसपास सध्या रुग्ण सापडत आहेत. लोक बरे होण्याचा दर ही चांगलाच सुधारला आहे. काही शहरातले कोविड सेंटर तर रिकामे होत आहेत.

Second Wave of Coronavirus ची चर्चा का ?

ऑक्टोबर अखेरपर्यंतचा जागतिक कोरोना रुग्णांचा आकडा हा ४ कोटीहून अधिक आहे. आणि त्यापैकी जवळपास साडे अकरा लाख जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. भारत याबाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजवर भारतात ७७ लाखांहून अधिक पेशंट झाले आहेत. सध्या तिकडे फ्रान्स, यू.के. आणि अन्य युरोपिय देशांत पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत आहे, अगदी Second Wave of Coronavirus म्हणून घोषणा सुद्धा झाली. पहिल्या टप्प्यात जेंव्हा तिथला आलेख हा सर्वोच्च होता तेंव्हा ५ – १० हजार रुग्ण दरदिवशी सापडत होते पण आता एप्रिल-मे पेक्षा अधिक रुग्ण संख्या म्हणजे ४०- ४२ हजार दरदिवशी आढळत आहेत.

Second Wave of Coronavirus, Coronavirus, Second Wave, कोरोना, कोरोनाचा थयथयाट

भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार का ?

आपल्याकडे आता गणपती-नवरात्र, दसरा झाला तर पुढे दिवाळी मग नाताळ-नववर्ष अशी सणांची रेलचेल आहे. निवडणुकांच्या प्रचारात असो की बाजारपेठेत लोक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. महाराष्ट्रात तर ‘पुनश्च हरिओम’ चा हा सहावा टप्पा सुरू आहे, हॉटेल्स उघडली आहेत. सिनेमागृहेही सुरू होत आहेत. पंतप्रधानांच्या “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही” या संदेशाकडे आपण काणाडोळा करतो आहोत. थंडीचा मौसम जो की कोरोनाच्या फैलावासाठी पोषक आहे तो ही येतो आहे. त्याच्याजोडीला प्रदूषण ही वाढत आहे. कदाचित Second Wave of Coronavirus येईल. आणि डिसेंबर-जानेवारी मध्ये येईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

या Second Wave of Coronavirus ला तोंड देण्यासाठी युरोपात काय काय तयारी केली गेली त्याच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे. दुसरी लाट आली असं जाहीर करून फ्रान्समध्ये पुन्हा एकदा नवा लॉकडाउन जाहीर केला. याआधी रात्रीची संचारबंदी जी ठराविक शहरांमध्ये होती ती आता संपूर्ण देशात केली गेली. त्याचबरोबर स्पेन, जर्मनी मधील शहरे, राज्ये ही स्थानिक पातळीवर संचारबंदी नव्याने लागू करत आहेत. यू.के. मध्ये तर २ आठवड्यांचा वगैरे पण कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

कारण मध्यंतरी जवळपास नगण्य संख्या असताना आता दिवसाला २०००० हून जास्त लोक पॉजिटिव्ह होत आहेत, हे वाढते आकडे थांबवण्यासाठी हा एकच ठोस पर्याय आहे काही महिने लॉकडाउन हा अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम करतो म्हणून साधारणतः १५ दिवसांचा संक्रमणाची साखळी तोडणारा ‘फायर ब्रेक’ लॉकडाउन लावण्यात आला आहे कारण विषाणूचं जीवनचक्र ही तेवढंच आहे. या देशांमध्ये आता टेस्टिंगच प्रमाण परत वाढवलं गेलं आहे, पण तरीही जेवढ्या केसेस वाढल्या त्यामानाने चाचण्या करण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. तिथले मृत्युदर हे पहिल्यापेक्षा कमी झाले आहेत पण जे कोविड अतिदक्षता विभाग पुन्हा भरत आहेत, लोक पुन्हा दवाखान्यात दाखल होत आहेत.

काय काळजी घ्याल ?

आपल्याकडे अन्य देशांपेक्षा मृत्यूदर खूपच कमी आहे. ही बाब सकारात्मक आहे. पण आपल्या १३० कोटी पैकी १०% हून ही कमी लोकांच्या चाचण्या झालेल्या आहेत. यामुळे आपल्याकडे एकूण किती लोक पॉजिटीव्ह असून त्यांची वास्तवातली संख्या समजू शकली नाही. कोविड पासून सुटका झाली असणाऱ्या लोकांना,जे दीर्घ काळ राहू शकतात अशा त्याच्या अन्य दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

लोकांच्या फुप्पुसांना कमकुवतपणा आलेला असतो. पुढे ती फुप्पुसे निकामी होण्याची शक्यता आहे त्यामागचं महत्वाचं कारण वायुप्रदूषण. त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो तर IPL असो किंवा दिवाळी किंवा न्यू ईयर या काळात फटाके उडवू नयेत म्हणजे जवळपास असणाऱ्या या व्यक्तींचे आयुष्य धोक्यात जाण्यापासून वाचवणार आहोत. राजस्थान आणि उडीसा सरकारने तर यावर्षी फटाके उडवणे आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

हे लिहिण्याचा उद्देश केवळ माहिती पोहोचवणं नसून आमचा तमाम वाचक वर्ग, त्यांच्याजवळचे लोक व सर्व देशवासीय जर का हे वायुप्रदूषण जितकं शक्य आहे तितकं कमी करत नाहीत. सर्वत्र अनलॉक होत असताना सुद्धा गर्दी करणं टाळत नाहीत आणि ‘कायम दोन हातांचं अंतर आणि मास्क हवा निरंतर’ हे विसरत असतील तर त्यांनी तसं करू नये!.!.! नियमानुसार वागावं, आपली काळजी घ्यावी कारण Second Wave of Coronavirus येण्यापासून रोखणं आपली जबाबदारी जास्त आहे.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.