Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

किस्सा टाटांनी सुरु केलेल्या भारतातल्या पहिल्या एअर लाईनचा

८८ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जे. आर. डी टाटांनी पहिले उड्डाण करत ‘टाटा एअरलाइन्स’चे विमान कराची वरून मुंबई येथे आणले होते.

भारतीय उद्योग जगतातील एक बडं नाव….. जे. आर. डी. टाटा! ‘टाटा समूहाचे मालक’ त्यांची ही इतकीच ओळख सामान्य माणसाला माहीत ! परंतु याव्यतिरिक्त ते भारतातील पहिले वैमानिक होते हे फारच थोड्या जणांना ठाऊक असेल.

jrd tata, jrd tata biography in marathi, Jehangir tata, air india story, tata air services, jrd tata information in marathi, tata airlines, जे आर डी टाटा, जहांगीर टाटा, टाटा एअरलाईन्स, एअर इंडिया
JRD Tata

एखाद्या माणसाचं नाव असं चौफेर पसरलेलं असतं, सर्वत्र त्याची ख्याती झालेली असते तेव्हा तो माणूस त्याच्या केवळ एका गुणासाठी प्रसिद्ध नसतो. तो बहुगुणी असतो. विशिष्ट गोष्टीमुळे जरी तो प्रसिद्ध झाला असला तरी त्याचं व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी असतं.

विविध गुणांच्या जोरावर तो त्या एका विशिष्ट कौशल्याला प्राप्त करून स्वतःचं नाव जगात कोरायला समर्थ झालेला असतो. छोट्या अथवा मोठ्या कुठल्याही व्यवसायासाठी स्वभावात ते आवश्यक गुण असावे लागतात. नसतील तर बाणवावे लागतात.

व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी, वेळेप्रमाणे, वेळेला अनुरूप लवचिकता असावी लागते. अशाच अनेक छोट्या मोठ्या गोष्टी मग व्यक्तीला पुढे नेतात. जगाला तिची ओळख एक यशस्वी व्यक्ती म्हणून होते.

त्यावेळची त्या व्यक्तीची असलेली दिमाखदार जीवनशैली सगळ्यांना दिसते परंतु त्यासाठी घेतलेले कष्ट कुणाला दिसत नाही. स्वतःला घडवण्यासाठी, तिने स्वतःत बदल घडवून आणणं आवश्यक असतं, त्यासाठी तिने घेतलेली मेहनत कुणाला कळत नाही.

रतनजी दादाभाई टाटा व त्यांची फ्रेंच पत्नी सुनीच्या पोटी जन्माला आलेले जहांगीर टाटा हे या दाम्पत्याचं दुसरं अपत्य! आई फ्रेंच असल्याने जे.आर.डी यांचा बहुतेक काळ फ्रान्स मध्ये गेला.

आपल्याला पुढे काय करायचं आहे हे काही ठरवलं नसताना त्यांना विमान उडवण्याचं वेड लागलं. फ्रेंच एव्हीएटर लुईस ब्लेरिओट हा इंग्लिश खाडी विमानाने पार करणारा पायलट जे.आर.डी टाटांना एक अमूर्त स्वप्न देऊन गेला. या वैमानिकाचा प्रचंड प्रभाव जे.आर.डी यांच्यावर पडला.त्यांनी वैमानिक होण्याचा ध्यास घेतला.

फ़्रेंच सिटीझनशीप सोडून ते भारतात आले. मुंबईतील पहिल्या फ्लाईंग क्लबद्वारे त्यांनी वैमानिक होण्याचं लायसन्स मिळवलं. केवळ साडेतीन तासांच्या उड्डाणाच्या जोरावर त्यांना हे लायसन्स मिळालं हे विशेष!

त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या मार्गदर्शकाने त्यांचं विमान उडवण्याचं कौशल्य हेरलं असणार हे नक्की !

jrd tata, jrd tata biography in marathi, Jehangir tata, air india story, tata air services, jrd tata information in marathi, tata airlines, जे आर डी टाटा, जहांगीर टाटा, टाटा एअरलाईन्स, एअर इंडिया

१९३२ मध्ये जे.आर.डी टाटांनी टाटा एअर सर्व्हिसेस उभारली. ही पहिली भारतीय कमर्शियल वाहतूक सेवा होती जी भारतातील टपाल व प्रवासी यांची ने-आण करत असे. त्याकाळी विमानात आसने कमी व पुरेशा सोयी नसल्याने प्रवासी चक्क टपालांच्या बॉक्सेस वर बसून विमानप्रवास करायचे !!

पुढे, म्हणजे १९४८ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस ही पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. तिचं नामकरण एअर इंडिया असं झालं आणि भारत सरकारने ह्या कंपनीचा ४९% हिस्सा विकत घेतला.

१९४८ मध्ये मुंबई ते लंडन पर्यंत प्रवास करणारी एअर इंडिया ही इंटरनॅशनल फ्लाईट सर्व्हिसेस बनली.

कंपनीचे चेअरमन म्हणून जे आर डी टाटा १९७८ पर्यंत या पदावर राहिले. कंपनीच्या ३०व्या वर्धापन दिनाला एअर इंडियाचा कराची ते मुंबई असा प्रवास झाला. तर १९८२ मध्ये पाकच्या राष्ट्रध्यक्षांचे टपाल भारताच्या राष्ट्रध्यक्षांपर्यंत पोचवण्याचं काम एअर इंडियाने केलं.

कधीकाळी हे दोन देश एकच होते. त्यामुळे आता वेगळे झाल्यावर व काही कारणांमुळे कटुता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांमध्ये वस्तूंचं आदानप्रदान होणं गरजेचं होतं. एकच विचार, संस्कृती असलेल्या या दोन देशांमध्ये पडलेली दरी सांधण्याचं कामच जणूकाही ही विमानसेवा करत गेली!

१९९० मध्ये एअर इंडियाची IAF म्हणजेच इंडियन एअर फोर्सशी हातमिळवणी झाली. अमानहून १,११,००० लोक भारतात परत आणण्याचं ऐतिहासिक कार्य या विमान सेवेने केलं.

मिडल ईस्ट मध्ये गल्फ वॉर सुरू व्हायच्या आधी भारतीय बांधव आपल्या देशात सुखरूपपणे पोहोचले! एकाच विमान सेवेने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणं ही खरोखर फार मोठी गोष्ट होती.

वैमानिक झाल्यावर खरंतर टाटांची ईच्छा तेव्हाच पूर्ण झाली होती. परंतु त्यानंतरही हा माणूस स्वस्थ बसला नाही. विमान सेवा देणारी कंपनी उघडली, त्यात पुरस्कार मिळवले, नाव कमावलं.. इतकंच नव्हे तर टाटा सन्सच्या १४ विविध कंपन्या आहेत, ज्यात रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल, तंत्रज्ञान यातही जम बसवला.

jrd tata, jrd tata biography in marathi, Jehangir tata, air india story, tata air services, jrd tata information in marathi, tata airlines, जे आर डी टाटा, जहांगीर टाटा, टाटा एअरलाईन्स, एअर इंडिया

१९५६ मध्ये त्यांनी कामगार कल्याण योजनेअंतर्गत मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा सारख्या कामगारांच्या हिताच्या योजना सुरू केल्या. ज्या कालांतराने सरकारने सगळ्या उद्योजकांना बंधनकारक केल्या!

याशिवाय टाटा मूलभूत संशोधन संस्था उभारल्या गेल्या आहेत. आशियातील १ लं कर्करोग रुग्णालय बांधण्यात टाटांनीच पुढाकार घेतला. सर्वेक्षणाद्वारे “द ग्रेटेस्ट इंडियन” मध्ये ६व्या स्थानावर येणाऱ्या जे आर डी टाटांना पद्मविभूषण, भारतरत्न, नागरी सन्मान व इतर अनेक सन्मान मिळाले आहेत यातच या माणसाची महानता लक्षात यावी!

Leave A Reply

Your email address will not be published.