Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

कुख्यात गुंडाना यमसदनी धाडणारे भारतातले टॉप एन्काऊंटर स्पेशलिस्ट

विकास दुबेच्या एन्काउंटरची सगळीकडे चर्चा चालू असताना भारतातही टॉप एन्काऊंटर स्पेशलिस्ट कोण आहेत तेही जाणून घ्या….

विकास दुबेचा एन्काउंटर केल्यांनतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुणी ह्या एन्काउंटरला सहमती दर्शवली तर काही लोक ह्याला मानवी हक्काचं उल्लंघन म्हणत आहेत. परंतु एखाद्या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करणारी हि काही पहिली वेळ नाही. एन्काउंटरच्या नियमानुसार पोलीस तोपर्यंत गुन्हेगारावर गोळी झाडू शकत नाहीत जोपर्यंत समोरून हल्ला होत नाही.

देशातील गुन्हेगारी कमी करण्यात पोलीस दलातील अनेक धडाकेबाज अधिकाऱ्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. ह्या अधिकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून भारतातील ठिकठिकाणची गुन्हेगारी मुळासकट नष्ट केली. ह्यातील काही एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिसांवर सिनेमे सुद्धा निघालेत. चित्रपट बघताना जरी ते तुम्हाला मनोरंजक वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र फार थरारक आणि धोकादायक असतं.

बघुयात भारतातील टॉप एन्काउंटर स्पेशालिस्ट कोणते आहेत …..

१) प्रदीप शर्मा

मुंबईतलीत अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नावावर आज पर्यंत ११३ एन्काउंटरची नोंद आहे परंतु असं म्हटल्या जातं कि प्रत्यक्षात मात्र हा आकडा ३०० पेक्षा जास्त आहे. मुंबई अंडरवर्ल्डचे कुख्यात गुंड लेखन भैया आणि छोटा राजन यांना यमसदनी धाडण्याचं काम Encounter Specialist Pradeep Sharma यांनीच केलं. काही कारणास्तव शर्मा यांना सेवेतून सस्पेंड करण्यात आलेलं. काही काळानंतर त्यांनी शिवसेना ह्या पक्षात प्रवेश केला.

encounter specialist pradeep sharma, top encounter specialist in marathi, pradeep sharma mumbai police, encounter pradeep sharma in marathi, daya nayak india, daya nayak, vijay salaskar, Praful Bhonsale, Sachin Waze in marathi, encounter specialist, mumbai police, प्रदीप शर्मा, सचिन वझे, विजय साळसकर, प्रफुल भोसले, दया नायक, एन्काउंटर स्पेशालिस्ट
Encounter Specialist Pradeep Sharma
२) दया नायक

दया नायक सर्वात प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत. कुठल्याही एन्काउंटर बद्दल बोलणं चालू असेल तर त्यात दया नायक यांच्या कामाची आठवण नक्कीच केली जाते. त्यांच्या सिनेमे सुद्धा तयार करण्यात आले आहेत. नाना पाटेकर यांची भूमिका असलेला अब तक छप्पन हा चित्रपट Encounter Specialist Daya Nayak यांच्या जीवनावर आधारित होता. १९९५ साली पोलीस दलात आलेले दया केवळ ३-४ वर्षांतच एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून नावारूपास आले. आपल्या करिअरमध्ये ८३ एन्काउंटर त्यांनी केलेले आहेत.

३) प्रफुल्ल भोसले

मुंबईतली गुन्हेगारी संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘डेथ स्क्वाड’ तयार केला होता आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रफुल्ल भोसले या स्क्वाडचा भाग होते. छोटा शकीलच्या एन्काउंटरसाठी भोसले प्रसिद्ध आहेत. Encounter Specialist Praful Bhosale यांच्या नावावर ८५ पेक्षा जास्त एन्काउंटर असून खरा आकडे ह्यपेक्षा मोठा असल्याचा अनेक लोक दावा करतात.

४) शहिद विजय साळसकर

२००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यात मुंबई पोलीसचे इन्स्पेक्टर विजय साळसकर शहदी झाले. २००९ साली सरकारने त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गवळी गँगच्या काही महत्वाच्या सदस्यांचा एन्काउंटसाठी साळसकर सगळ्यांना ठाऊक आहेत. Encounter Specialist Vijay Salaskar यांनी आपल्या करिअरमध्ये ९० गुन्हेगारांना त्यांनी यमसदनी धाडले.

encounter specialist pradeep sharma, top encounter specialist in marathi, pradeep sharma mumbai police, encounter pradeep sharma in marathi, daya nayak india, daya nayak, vijay salaskar, Praful Bhonsale, Sachin Waze in marathi, encounter specialist, mumbai police, प्रदीप शर्मा, सचिन वझे, विजय साळसकर, प्रफुल भोसले, दया नायक, एन्काउंटर स्पेशालिस्ट
Encounter Specialist Vijay Salaskar
५) सचिन वझे

सचिन वझे आणि प्रदीप शर्मा यांच्या जोडीचं नाव ऐकून अंडरवर्ल्डची चांगलीच टरकत असे. वझे हे प्रदीप शर्मा यांना आपले गुरु मानतात. आशिया खंडात चालू असलेला क्रेडिट कार्ड घोटाळा समोर आणला आणि त्या गुन्हेगाराला अटक सुद्धा केली. कृष्ण शेट्टी, मुन्ना नेपाळी आणि लष्कर ए तोयबाला मदत करणाऱ्या अनेकांचा त्यांनी एन्काउंटर केला. Encounter Specialist Sachin Vaze यांनी तब्बल ६३ गुन्हेगारांना वझे यांनी यमसदनी धाडलं आहे.

हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.