Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेट खेळपट्टीचे विविध प्रकार कोणते ? खेळपट्टी तयार करण्याची पद्धत काय आहे ?

ऑस्ट्रेलियात चक्क एका कारखान्यात Pitch तयार करून नंतर ती मैदानावर आणून बसवली जाते.

भारतात लहान मुला-मुलींपासून अगदी वयस्कर आजोबांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेटचं वेड आहे. क्रिकेट म्हटल्यावर ह्या खेळातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी म्हणजे खेळपट्टी (Pitch). क्रिकेट मैदानावरची खेळपट्टी 20.12 मिटर लांब व 3.05 मिटर रुंद असते. अनेक गोष्टी या खेळपट्टीशी थेट संबंधित असतात. जसे की खेळाडूची कामगिरी तसेच सामन्याचा निकाल अशा अनेक गोष्टी खेळपट्टीशी निगडित असतात.

भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळपट्टी बाबत काही नियम आखून दिले आहेत, त्याचे पालन करणे राज्यातील क्रिकेट आयोजकांना आवश्यक असते. त्यानुसार खेळपट्टी ही संतुलित असावी म्हणजेच ती फक्त फिरकीला किंवा वेगवान गोलंदाजीला अशी एकतर्फी अनुकूल नसावी असाही नियम आहे. Cricket Pitch चे मुळात ३ प्रकार असतात, ते म्हणजे डेड पीच, ग्रीन पीच, डस्टी पीच

क्रिकेट खेळपट्टीचे प्रकार (Types of Cricket Pitches)

डेड पीच (Dead Pitch)
cricket pitch construction, cricket pitch size, cricket pitch dimensions, cricket pitch length, cricket information in marathi, Types of Cricket Pitches, Dead Pitch, Green Pitch, Dusty Pitch, How Pitch is made in Marathi, cricket pitch information in marathi, portable cricket pitch, drop in pitch, क्रिकेट खेळपट्टी माहिती, क्रिकेट खेळपट्टीचे प्रकार, क्रिकेट पीच प्रकार, क्रिकेट खेळाची माहिती, क्रिकेट पीच कशी तयार करतात, क्रिकेट पीच माहिती
Dead Pitch is suitable for batsman

डेड पीच संपूर्णपणे सपाट असते आणि त्याच्या पृष्ठभागावर गवत किंवा आर्द्रता (Moisture) नसते. या खेळपट्ट्यांवर सातत्याने रोलर फिरवून त्यावरील गवत आणि आर्द्रता काढून टाकल्या जाते. अश्या खेळपट्ट्या फलंदाजांना जास्त अनुकूल असतात कारण ह्या पीच फिरकी किंवा वेगवान गोलंदाजांना जास्त मदत करत नाही.

डेड पीचचा उपयोग टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट मॅचसाठी जास्त केला जातो. अश्या खेळपट्टीवर विकेट घेणे फार अवघड असल्याने टेस्ट मॅच मध्ये Dead Pitch चा उपयोग सहसा केला जात नाही. डेड पीचला Dark Pitch असेही म्हटले जाते.

ग्रीन पीच (Green Pitch)

ग्रीन पिचवर बॉलिंग करायला बॉलर्सला फार आवडतं आणि ह्या खेळपट्या बॅट्समनसाठी फार धोकादायक असतात. Green Pitch वर नावाप्रमाणेच गवताचा बारीक थर असतो. ह्यामुळे गोलंदाजांना बॉल स्विंग करण्यास फार मदत होते. ग्रीन पीचचा उपयोग सहसा टेस्ट मॅच मध्ये केला जातो, त्यामुळे खेळणारा फलंदाजाची सुद्धा परीक्षा घेतली जाते.

साऊथ आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ह्या देशांतील जास्तीत जास्त मैदानांवर Green Pitch आहे, कारण ह्या संघांकडे डेल स्टेन, मिशेल स्टार्क यासारखे भेदक गोलंदा आहेत.

डस्टी पीच (Dusty Pitch)
cricket pitch construction, cricket pitch size, cricket pitch dimensions, cricket pitch length, cricket information in marathi, Types of Cricket Pitches, Dead Pitch, Green Pitch, Dusty Pitch, How Pitch is made in Marathi, cricket pitch information in marathi, portable cricket pitch, drop in pitch, क्रिकेट खेळपट्टी माहिती, क्रिकेट खेळपट्टीचे प्रकार, क्रिकेट पीच प्रकार, क्रिकेट खेळाची माहिती, क्रिकेट पीच कशी तयार करतात, क्रिकेट पीच माहिती
Dusty Pitch helps Spinners and spins balls easily

‘डस्टी पीच’ची विशेषता म्हणजे घ्या खेळपट्या सॉफ्ट असतात. अश्या खेळपट्यांचा उपयोग फिरकी गोलंदाजांना (Spinners) मोठ्या प्रमाणात होतो. Dusty Pitch मुले स्पिनर्सचे बॉल मोठ्या प्रमाणात स्पिन होतात आणि बॅट्समनला देखील अश्या वेळी आक्रमक खेळी करता येत नाही. Dusty Pitch चा उपयोग श्रीलंका आणि भारतात जास्त प्रमाणात केला जातो. ह्या दोन्ही संघांकडे चांगले स्पिनर आहेत आणि अटीतटीच्या सामन्यात ते चांगलेच उपयोगी पडतात.

प्रत्येक देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाचे खेळपट्टी बाबतचे धोरण हे वेगवेगळे असते

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, ऑस्ट्रेलिया (Melbourn Cricket Ground)

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच MCG असे या मैदानाचे संक्षिप्त नाव आहे. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय मैदानांपैकी एक आहे. या मैदानाच्या खेळपट्टी बद्दल विशेष गोष्ट म्हणजे ‘पोर्टेबल क्रिकेट पिच’ (Portable Cricket Pitch). म्हणजे येथील खेळपट्टी (Pitch) एका कारखान्यात तयार केली जाते व नंतर ती मैदानावर क्रेनच्या साहाय्याने बसवण्यात येते. या खेळपट्टी बनवताना हलकी स्टील फ्रेम ह्यात भरली जाते, यामुळे खेळपट्टीची कार्यक्षमता वाढते तसेच ती कारखान्यातून मैदानावर नेण्यासही सोपी जाते. पोर्टेबल पिचला ‘ड्रॉप इन पीच’ (Drop-in Pitch) असेही म्हटले जाते.

वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium)
cricket pitch construction, cricket pitch size, cricket pitch dimensions, cricket pitch length, cricket information in marathi, Types of Cricket Pitches, Dead Pitch, Green Pitch, Dusty Pitch, How Pitch is made in Marathi, cricket pitch information in marathi, portable cricket pitch, drop in pitch, क्रिकेट खेळपट्टी माहिती, क्रिकेट खेळपट्टीचे प्रकार, क्रिकेट पीच प्रकार, क्रिकेट खेळाची माहिती, क्रिकेट पीच कशी तयार करतात, क्रिकेट पीच माहिती
Wankhede Stadium, Mumbai

वानखेडे स्टेडियम हे भारतातील एक प्रसिद्ध क्रिकेटच्या मैदानांपैकी एक आहे. शिवाय हे सचिन तेंडुलकरचे होम ग्राऊंड आहे. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टी बाबत सांगायचे झाले तर या खेळपट्टीवरील माती ही सहा प्रकारचे असते आणि सगळ्यात खालचा थर हा काँक्रीटपासून तयार केला जातो. दुसऱ्या क्रमांकाच्या मातीचा थरामध्ये थर्माकोलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पावसाचे पाणी खेळपट्टीवर साचत नाही. या मैदानावरील पिचला वर्षाला सर्वसाधारणपणे ४० लाख लिटर एवढे पाणी लागते.

हाग्ले ओवल, क्राइस्टचर्च, न्युझीलँड (Hagley Oval, Christchurch, New Zealand)

न्यूझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील मैदानावरील खेळपट्टी ही संपूर्णपणे सिमेंट काँक्रीट द्वारा तयार केली जाते व नंतर खेळपट्टीवर एक विशेष लॅमिनेशन कव्हर टाकले जाते जे पूर्णपणे वाटरप्रूफ असते. ह्या लॅमिनेशन कव्हरच्या वर मातीचा थर टाकला जातो. या पीचसाठी लागणारी माती ही साऊथ ऑस्ट्रेलियातून मागविली जाते, ही माती चाळून त्यात थोड्या प्रमाणात लाकडाचा भुसा मिसळला जातो.

न्यूलँड क्रिकेट ग्राउंड, द. आफ्रिका (Newland Cricket Ground)

केपटाउन मधील हि क्रिकेट पीच अतिशय दुर्मिळ एक आहे. हि क्रिकेट Pitch हवामानाला अनुसरून कार्य करत असते. वेगवान गोलंदाजाला स्विंग, तर फलंदाजाला भरपूर धावा हि पीच देते. या खेळपट्टीवर तीन प्रकारच्या मातीचे थर आहेत त्यातील सगळ्यात वर एकदम हलक्या प्रकारच्या मातीचा उपयोग केला आहे. जर हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर चेंडू एकदम वेगाने आउट स्विंग होतो. जर या मैदानावर एखादा कसोटी सामना होणार असेल तर खेळपट्टीवर रासायनिक पाण्याने फवारणी केली जाते त्यामुळे Pitch वर जास्त भेगा पडतात व खेळपट्टी गोलंदाजाला जास्त मदत करते.

Leave A Reply

Your email address will not be published.