Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

१० हजार गनिम विरुद्ध 300 मराठे, अंगाचा थरकाप उडवणारी लढाई

हॉलिवूडचा भासवलेला 300 पाहिला असेलच, पण मराठ्यांचा 300 वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

“राजं, आपण बोलवलत ?”

“शिवा, आलास ? ये ! शिवा, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी त्याला चकवा देऊन आम्ही आमची पालखी राजरस्त्याने सोडणार आहोत. पण त्यात दूसरा शिवाजी हवा. सिद्दीने ती पालखी पकडली तरी त्यात शिवाजीच आहे असे भासून तो फसेल आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याने विशाळगडाकडे जाऊ. पण, दूसरा शिवाजी हवा, आमच्या सारखा दिसणारा.” शिवराय आढेवेढे घेत म्हणाले.

baji prabhu deshpande, bajiprabhu deshpande history, bajiprabhu deshpande in marathi, bajiprabhu deshpande information in marathi, pawankhinda, Battle of Pavan Khind, baji prabhu deshpande photos, shivaji maharaj panhala sutka, panhala fort, siddi johar, shivaji maharaj in marathi, maratha sardar, बाजीप्रभू देशपांडे माहिती, पावनखिंडीची लढाई, शिवाजी महाराज, पन्हाळ्यावरुन सुटका, विशाळगड, pavankhind chi ladhai, baji prabhu and the memorable battle of ghodkhind, pavan khind history in marathi, ghodkhind, baji prabhu deshpande yanchi mahiti, pavankhind story in marathi
Shiva Kashid

शिवाने शिवरायांचे मन ओळखले, तो म्हणाला, “आवं राजे, मला सारं ठाव हाय, शिवाजी हवाय नं व्हं ? म्या हाई की !”

“अरे पण शिवा, शिवाजी होणं खेळ नाही, आम्ही निसटून जाऊ पण तुझा जीव जाईल.” राजे म्हणाले.

“व्वा ! काही गम न्हाई जी ! जीवंच जाईल नं व्हं, ते बी तुमच्यासाठी, अशी कामगिरी कोण सोडल व्हय ?” शिवा म्हणाला.

राजे थोडे संभ्रमात होते, परंतु शिवा आता मागे कसला जातोय, गडी भलताच खुशीत. शिवरायांनी स्वत: एकेक वस्त्र आणि अलंकार शिवाला चढवले, भवानीची माळ त्याच्या गळ्यात घातली, स्वतःचे आरशातले प्रतिबिंब आपण बघतोय असाच भास शिवरायांना झाला.

“शिवा, किती रे आम्ही अभागी, आमच्या जिवासाठी तुझा जीव जातोय आणि आम्हीच तुला अलंकाराने सजवून प्रती-शिवाजी करतोय, आमच्या स्वार्थासाठी.” राजे गहिवरून म्हणाले, आणि त्यांनी शिवाला मिठीत घेतले.

मिठी सोडवत शिवा म्हणाला, “राजे, चिंता नसावी ! सोंगातला का होईना पर म्या शिवाजी बनलो. शिवाजी म्हणून मरण घेतोय यापरीस काय लागतय, जीवनाचं सोनं झालं बगा.”

आपण प्रसंग बघतोय पन्हाळा गडाला सिद्दी जौहरचा वेढा पडला तेव्हाचा. हा गड या संकटात तग धरेल हे शिवरायांना (Chhatrapati Shivaji Maharaj) पक्के माहीत होते. जौहरला देखील याची जाणीव झाली आणि त्याने इंग्रजांची मदत घेऊन बंदुका आणि तोफा मागवल्या आणि गडावर तोफांचा मारा सुरू केला.

आता पन्हाळा तग धरणे कठीण आणि अशातच पुण्यावर शायिस्तेखानाने हल्ला केला, म्हणून अखेर नियोजन झाले आणि शिवरायांनी रात्री दुसऱ्या वाटेने विशाळगडाकडे रवाना व्हावे आणि सिद्दीला चकवा देण्यासाठी राजवाटेने शिवरायांची पालखी घेऊन जावी आणि त्यात प्रती-शिवाजी बसवावा म्हणजे सिद्दी; शिवाजी महाराज हातात आले म्हणून खुश होईल आणि दुसऱ्या वाटेने खरे शिवाजी महाराज जात आहे याकडे त्याचे सहज दुर्लक्ष होईल.

ठरल्याप्रमाणे शिवराय ६०० मावळे घेऊन गडउतार झाले आणि दुसऱ्या वाटेने शिवा काशिद शिवरायांचे सोंग घेऊन निघाला. शिवरायांना विशाळगडाकडे सुखरूप नेण्याची जबाबदारी पुर्णपणे बाजीप्रभु यांनी घेतली होती. बाजीप्रभु (Baji Prabhu Deshpande) यांचे घराणे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचे पिढीजात देशपांडे. सुमारे १६१५ साली बाजीप्रभुंचा जन्म झाला. शिवरायांनी बाजीप्रभुंना स्वराज्य मोहिमेत घेतले आणि बाजीप्रभु याच स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले आणि इतिहासात निष्ठेचा आदर्श बनले.

होता शिवा, म्हणून निसटला शिवा

इथे घोडखिंडीच्या मार्गाने शिवराय ६०० मावळे घेऊन रवाना झालेले होते. जुलै महिन्यातील पावसाचे दिवस, अंधारी रात्र आणि या अंधारात मावळे वाट काढत होते, रस्ता कठीण होता, नव्हे रस्ता नव्हताच, काटेकुटे तुडवत, मागे गनिम येतोय का हे बघत आणि पुढे काय वाढून ठेवलय याची चिंता करत मराठे चाललेत.

baji prabhu deshpande, bajiprabhu deshpande history, bajiprabhu deshpande in marathi, bajiprabhu deshpande information in marathi, pawankhinda, Battle of Pavan Khind, baji prabhu deshpande photos, shivaji maharaj panhala sutka, panhala fort, siddi johar, shivaji maharaj in marathi, maratha sardar, बाजीप्रभू देशपांडे माहिती, पावनखिंडीची लढाई, शिवाजी महाराज, पन्हाळ्यावरुन सुटका, विशाळगड, pavankhind chi ladhai, baji prabhu and the memorable battle of ghodkhind, pavan khind history in marathi, ghodkhind, baji prabhu deshpande yanchi mahiti, pavankhind story in marathi
Shivaji Maharaj Panhala Sutka

तिकडे सिद्दीने दुसरी पालखी पकडली, तो आनंदात उडालाच, त्याला वाटले शिवाजी माझ्या तावडीत आला. सिद्दी आणि शिवाजी समोर बसले, बोलणी चालू झाली.

“शिवाजी, भाग रहे थे ?” सिद्दीने विचारले. “हा ! प्रयत्न तरी हाच होता पण, फसला.” शिवा म्हणाला.

दोघांच्या बऱ्याच गप्पा चालू असताना अचानक दूसरा सरदार आत आला, सिददीच्या कानात काही सांगून तो गेला आणि सिद्दी व सोबत असलेला फाजलखान रागाने लालबुंद झाले आणि सिद्दी ओरडला,

“कौन है तू ?” “मी शिवाजी.” शिवा म्हणाला.
“सरासर झुट ! वो तो कबका भाग गया.” फाजल ओरडला. “हा ! हसून शिवा म्हणाला, हा ते पण खरचं आहे, राजे आणि इतक्या सहज तुझ्या हातात येतील व्हय रं, राजे गेले !”

संतापाने अनावर होऊन फाजलने तलवार उपसली आणि सरळ शिवाच्या छातीला टेकवली. “तो फिर तू है कोन?”

“मी शिवा काशिद.” शिवा गर्वाने म्हणाला.

हे ऐकून संतापाने, फाजलने शिवाला तिथेच संपवले. शिवा कोसळला, अखेरचे शिवरायांना स्मरून त्याने प्राण सोडला. लगेचच सिद्दीचे सैन्य शिवरायांच्या मागे धावले. इकडे, शिवराय सैन्यासहित वाट तुडवत होते. अखेर सारा जमाव घोडखिंडीशी आला. बाजीप्रभु थांबले आणि महाराजांना म्हणाले, राजे गनिम कोणत्याही वेळी मागून आपल्याला गाठेल.

“मग बाजी, काय आहे तुमच्या डोक्यात ?” राजांनी प्रश्न केला. “राजे, तिकडे विशाळगडावर वेढा पडल्याची बातमी आली आहे, तुम्ही ३०० मावळे घेऊन पुढे व्हा आणि मी इथे ३०० मावळ्यांना घेऊन थांबतो. मागून येणाऱ्या शत्रूला इथूनच यमसदनी पाठवतो.” बाजी म्हणाले.

“नाही, हे शक्य नाही. आपला जीव धोक्यात घालून आम्ही खुशाल पुढे जावं ? नाही, नाही बाजी नाही ! आम्ही पण थांबतो, आपण शेवटपर्यंत लढू, प्राण गेला तरी चालेल पण जे होईल त्याला सामोरे जाऊ.” राजे म्हणाले.

“राजे, मी काहीही ऐकणार नाहीये, आपल्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे, मला ती पूर्ण करुद्या. तुम्ही विशाळगडावर गेलात की संकेत म्हणून तोफेचे ५ बार करा, तोफेचे बार होत नाही तोपर्यंत या खिंडीतून एकही गनिम पलीकडे जाऊ देणार नाही, हा या बाजीप्रभुचा शब्द आहे. चला पुढे व्हा राजे, मी मेलो तर आठवण मात्र ठेवा.” हळव्या स्वरात बाजी म्हणाले.

महाराजांना अश्रु अनावर झाले, बाजीप्रभुंना मिठीत घेत राजांनी त्यांचा निरोप घेतला.

baji prabhu deshpande, bajiprabhu deshpande history, bajiprabhu deshpande in marathi, bajiprabhu deshpande information in marathi, pawankhinda, Battle of Pavan Khind, baji prabhu deshpande photos, shivaji maharaj panhala sutka, panhala fort, siddi johar, shivaji maharaj in marathi, maratha sardar, बाजीप्रभू देशपांडे माहिती, पावनखिंडीची लढाई, शिवाजी महाराज, पन्हाळ्यावरुन सुटका, विशाळगड, pavankhind chi ladhai, baji prabhu and the memorable battle of ghodkhind, pavan khind history in marathi, ghodkhind, baji prabhu deshpande yanchi mahiti, pavankhind story in marathi
Baji Prabhu and the memorable battle of Ghodkhind

हा बाजी मरतोच कसा ?

शिवराय रवाना झाले, बाजी (Baji Prabhu Deshpande) त्यांना बघत होते, क्षणात त्यांनी मान फिरवली, आपल्या सैन्यावर नजर टाकली, डोळ्यात अंगार घेऊन बाजी म्हणाले, आता बार होत नाहीत, तो पर्यंत एकही गनिम या खिंडीच्या पलीकडे गेलाच नाही पाहिजे. सैन्याची एक तुकडी गनिमाच्या स्वागतालाच उभी करा. गनिम आला रे आला की तुटून पडा. दुसरी फळी त्या सैन्याच्या मागे राहुदे, अशा तुकड्या बनवून लढत रहा. तुम्हा सर्वांना ओलांडून जरी कोणी पुढे आलाच तर खिंडीच्या तोंडाशी मी स्वत: उभा आहे.

१०,००० गनिमांची फौज विरुद्ध ३०० मराठे, अशी अंगाचा थरकाप उडवणारी ही लढाई होती.

किर्र अंधारात शत्रू आगेकूच करत होता, इथे शिवरायांचे मावळे सज्ज होते. शत्रू जो येत होता तो अगदी ताज्या दमाचा होता आणि मराठे कैक तासांपासून अंधारी वाट तुडवून दमलेल्या अवस्थेत. अचानक शत्रू नजरेच्या टप्प्यात आला आणि बघता अंगावर धावून आला. जराही वेळ न दवडता, हर हर महादेवच्या गर्जना करून मराठे असे काही तुटून पडले आणि केवळ एक मावळा सुद्धा शत्रूच्या १० सैनिकांना महागात पडला.

असेच हे युद्ध सुरू होते. मराठ्यांची एक फळी शत्रूला प्रतिकार करून मागे होई आणि मागून नवीन सैन्याची फळी येऊन शत्रूवर घाव घाली, असे सतत चालू होते. घनघोर लढाई सुरु झाली आणि शत्रू मावळ्यांची संख्या कमी करत होता. परंतु, लढाईत एक गोष्ट मात्र असामान्य होती, सिद्दी ही लढाई पाहात होता, आपले सैन्य मराठ्यांना मारून पुढे सरसावते आहे खरे पण खिंडीच्या पलीकडे मात्र कोणीही का जाऊ शकत नाहीये ?

त्याने पाहिले तर, खिंडीच्या मध्ये उभा होता एक पर्वत…६ फूट उंच, पिळदार शरीर, डोळ्यात अंगार आणि दोन्ही हातात दांडपट्टे. ते होते बाजीप्रभु, एखादा भोवरा जसा गरागरा फिरतो तसे बाजीप्रभु दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन फिरत होते आणि समोर येणाऱ्या शत्रूला संपवत होते. एकही माणूस बाजीप्रभुंना ओलांडून खिंडीपलीकडे जाऊ शकत नव्हता.

घमासान युद्ध सुरू आहे. अनेक मावळे जखमी आहेत, अंगावर इतक्या जखमा आहेत की नवी जखम होण्यास जागा उरली नाही. प्रत्येक जण तोफेचे बार ऐकण्यासाठी आतुर होऊन लढतोय. बाजीप्रभु तर साक्षात वादळ. अशातच, सिद्दीने इंग्रजांना बंदूक घेऊन बोलावले. इंग्रज माचीवर चढला, नेम धरला, बंदुकीतून आवाज झाला, वाऱ्याच्या वेगाने एक एक शत्रूला संपवणारे बाजी त्या गोळीच्या निशाण्यावर आहेत, क्षणार्धात हवेतून येणारी गोळी बाजींच्या शरीरातून आरपार गेली, बाजी पडले. सिद्दी आनंदला, बाजी पडले हे पाहून मराठे सुद्धा खचले.

baji prabhu deshpande, bajiprabhu deshpande history, bajiprabhu deshpande in marathi, bajiprabhu deshpande information in marathi, pawankhinda, Battle of Pavan Khind, baji prabhu deshpande photos, shivaji maharaj panhala sutka, panhala fort, siddi johar, shivaji maharaj in marathi, maratha sardar, बाजीप्रभू देशपांडे माहिती, पावनखिंडीची लढाई, शिवाजी महाराज, पन्हाळ्यावरुन सुटका, विशाळगड, pavankhind chi ladhai, baji prabhu and the memorable battle of ghodkhind, pavan khind history in marathi, ghodkhind, baji prabhu deshpande yanchi mahiti, pavankhind story in marathi
Baji Prabhu Deshpande Photos

बाजीप्रभुंनी धारातीर्थी पडलेल्या अवस्थेत डोळे उघडले, बाजुला उभ्या असलेल्या मावळ्याला बाजी विचारतात “अरे तोफेचे बार झाले का?”

“न्हाई जी !” उत्तर आले. “नाही ? अरे मग उठा ! तोफेचे बार होत नाही तोपर्यंत हा बाजी मरतोच कसा ? मृत्यूलाही थांबावे लागेलच.”

असं म्हणून बाजी पुन्हा उठले आणि त्याच ताकदीने पुन्हा दांडपट्टे घेऊन उभे राहिले. सिद्दीलाही प्रश्न पडला की गोळीनेही मेला नाही असा हा बाजीप्रभु आहे तरी काय ?

बराच वेळ गेला. आता मात्र शत्रूला प्रतिकार करणे मराठ्यांना अशक्य होत होते. उरला सुरला जीव एकवटून सगळे लढत होते. अशातच, तोफेचा पहिला बार झाला. बार ऐकून बाजी सुखावले, तरीही ते थांबायला तयार नव्हते. दूसरा, तिसरा चौथा आणि पाचवा बार झाला…आणि बाजी…बाजी हसले, हातातील शस्त्रे टाकून बाजी कोसळले. संपूर्ण शरीरावर मोजता येणार नाहीत इतक्या जखमा होत्या…चेहर्यावर मात्र होते केवळ समाधान, कामगिरी फत्ते केल्याचे समाधान. आपल्या मावळ्यांकडे बघत त्यांनी मृत्यूला कवटाळले…एका मावळ्याने बाजींचे डोळे झाकले.

तो दिवस होता १४ जुलै १६६०. बाजीप्रभु देशपांडे यांची पालखी विशाळगडावर नेण्यात आली, महाराज आले पण बघतात तर सारे मावळे शांत. “बाजी ! आलात आपण !” राजे उच्चारले.

एका सैनिकाने काहीही न बोलता पालखीकडे बोट केले, पडदा बाजूला सारला आणि मग महाराज सुद्धा स्तब्ध झाले. “बाजी, बाजी अहो हे काय ? हे कोणत्या अवस्थेत आलात इथे, काय करून ठेवलत बाजी ? स्वतःची काय समजूत घालावी आम्ही ? आपल्या सारख्या माणसांची मला गरज आहे, स्वराज्याला गरज आहे. आपल्याविना सारे अधुरेच.”

अश्रु आवरत, मागे बघत राजांनी उद्गार काढले, “बाजीप्रभु लढले, मृत्युलाही थांबवून लढले, आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने त्यांनी घोडखिंड पावन केली. आजपासून तिचे नाव पावनखिंड (Pavan Khind).”

मंडळी, शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पराक्रम केले आणि साऱ्यांनाच चकित केले. परंतु, काही वीर असे देखील होते ज्यांनी आपल्या पराक्रमाने खुद्द शिवरायांना चकित केले. आपल्याला पुढच्या काही तासात मरण येणार आहे हे माहीत असून हसत शिवरायांना मिठी मारून, शिवाजी महाराजांसाठी मरण्याचा आनंद घेऊन मृत्यूपूढे उभा राहणारा शिवा काशिद आणि मृत्यू आला तरी त्याला थांबावे लागेल हे ठामपणे सांगून, अंगावर नव्या जखमेला जागा नसतांना शिवरायांचा संदेश येईपर्यंत प्राण न सोडणारे बाजीप्रभु देशपांडे (Baji Prabhu Deshpande). अशा वीरांचे वर्णन करायला शब्द अपूर्णच !

baji prabhu deshpande, bajiprabhu deshpande history, bajiprabhu deshpande in marathi, bajiprabhu deshpande information in marathi, pawankhinda, Battle of Pavan Khind, baji prabhu deshpande photos, shivaji maharaj panhala sutka, panhala fort, siddi johar, shivaji maharaj in marathi, maratha sardar, बाजीप्रभू देशपांडे माहिती, पावनखिंडीची लढाई, शिवाजी महाराज, पन्हाळ्यावरुन सुटका, विशाळगड, pavankhind chi ladhai, baji prabhu and the memorable battle of ghodkhind, pavan khind history in marathi, ghodkhind, baji prabhu deshpande yanchi mahiti, pavankhind story in marathi
Pavan Khind history in Marathi, Ghodkhind

बाजीप्रभु आणि शिवा या दोघांनी इतिहासाला शौर्याची, निष्ठेची व्याख्या दिली, कामी आलेला प्रत्येक सैनिक म्हणजे साक्षात शौर्यच. अशा असंख्य वीरांनी शिवाजी आणि स्वराज्य घडविले आणि शिवरायांनी या सार्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता स्वराज्याचे सोने केले. अशा वीरांना मानाचा मुजरा.

लेखनाचे संदर्भ:

१. श्रीमान योगी, रणजीत देसाई. (मूळ लेखनात थोडा बदल करून)

२. पावनखिंड, रणजीत देसाई. (मूळ लेखनात थोडा बदल करून)

३. द हिस्टरी ऑफ द मराठा पिपल: खंड १, सी. ए. किंकेड आणि द. ब. परसनीस.

Leave A Reply

Your email address will not be published.