Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या खास व्यक्तीच्या आवडत्या रंगावरून स्वभाव ओळखा आणि परफेक्ट इम्प्रेस करा

एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या आवडत्या रंगावरून स्वभाव आणि बरच काही जाणून घेऊ शकता.

जर तुम्ही कधी कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली असेल, तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला तुमचा आवडता रंग कुठला असा प्रश्न विचारला जातो. खरंतर हा प्रश्न तुमचा स्वभाव जाणून घेण्यासाठी विचारला जातो. तुमच्या आवडत्या रंगावरून तुमचा स्वभाव तपासण्याची ही पद्धत खूपच जुनी आहे. काही नोकऱ्यांमध्ये ग्राहकांशी नेहमी हसतमुख बोलावे लागते त्यामुळेच तुमचा स्वभाव तपासण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. या लेखामध्ये आपण रंगाच्या आधारावरती मानवी स्वभाव कसा ओळखावा याबद्दल जाणून घेणार आहोत ?

चला तर बघुयात रंगावरून स्वभाव कसा ओळखायचा –

1) पांढरा रंग (White Colour)

सामान्यपणे ज्या व्यक्तींना पांढरा रंग प्रिय असतो ते अत्यंत शांत स्वभावाचे समजले जातात. त्यांना कधीच लवकर राग येत नाही. अशी लोकं अनोळखी लोकांशी पटकन मैत्री करत नाहीत. ज्यांना हा रंग आवडतो ती लोक अत्यंत दूर दृष्टी लाभलेल्या असतात. ते नेहमीच आशावादी दृष्टिकोण ठेवून वाटचाल करत राहतात. हि लोकं कुठलीही योजना तयार करण्यामध्ये पारंगत असतात आणि त्यामुळेच त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते.

2) लाल रंग (Red Colour)

लाल रंगाला ऊर्जेचा स्रोत म्हणून समजले जाते. प्रत्येक व्यक्ती या रंगाकडे लगेच आकर्षित होतो. म्हणूनच या रंगाला पसंत करणारे लोक गर्दीपासून स्वतःला लांब ठेवणंच पसंत करतात. पण या रंगाला पसंत करणारे लोक खूपच रागीट असतात. अशी मंडळी स्वतःचे काम खूपच जोशात पूर्ण करतात. सोबतच असे लोक दुसऱ्यांचा स्वभाव फारच लवकर समजून घेतात.

3) हिरवा रंग (Green Colour)

हिरवा रंग भरभराटीचा व संपन्नतेचा रंग आहे. या रंगाला पसंत करणारे लोक रचनात्मक स्वभावाचे असतात. या लोकांचे हस्ताक्षर खुपच छान असते. अशी लोकं फारच मनमिळावू स्वभावाची असतात. ही लोकं कुठल्याही मोठ्या पदावर जरी असली तरी अगदी शेवटच्या माणसापर्यंत तेवढ्याच शांतपणे बोलत असतात. अशा लोकांना दुःखामध्ये असणाऱ्या लोकांना मदत करण्यात आनंद मिळतो. अशी व्यक्ती स्वतःला भांडणापासून दूर ठेवते.

4) काळा रंग (Black Colour)

जसे की तुम्हाला माहिती आहे काळा रंग इतर कुठल्याही रंगाला ठळकपणे पुढे येऊ देत नाही. तसेच या रंगाला पसंत करणारे लोक इतरांच्या प्रगतीबाबत नेहमीच प्रतिकूल असतात. अशी मंडळी कुठल्याही परिवर्तनाला नेहमी विरोध करत असतात. या रंगाला पसंत करणारे लोक परंपरावादी विचारांचे असतात. हि लोक अत्यंत अभिमानी असतात, त्यांच्या कामात इतर कोणीही दखल दिली तर त्यांना ते पटत नाही. अशी मंडळी इतरांचा मान सन्मान खूपच लवकर दुखावतात.

5) गुलाबी रंग (Pink Colour)

असं म्हटलं जातं की हा रंग शक्यतो मुलींनाच जास्त आवडतो. या रंगाला पसंत करणारी लोकं खूपच भावनिक असतात. त्यांना गुलाबी रंग खूप पसंत असतो. ते नेहमीच हसतमुख असतात. या व्यक्ती अत्यंत हुशार आणि समजूतदार स्वभावाचे असतात.

6) निळा रंग (Blue Colour)

निळा रंग विलासीनतेचे प्रतीक असते. त्यामुळे साधारणपणे हा रंग आवडणारी व्यक्ती अत्यंत विलासी जीवन व्यतीत करणे पसंत करते. या व्यक्ती अत्यंत स्वाभिमानी स्वभावाच्या असतात. अशा व्यक्ती स्वतःच्या हिंमतीवर यश प्राप्त करणं योग्य समजतात. ही माणसं विश्वास ठेवण्यास योग्य असतात.

what is your favourite colour and why interview question, relationship between color and personality, favorite color meanings, color psychology, favorite color personality test, yellow color meaning & personality, do colors have meanings, Color psychology in marathi, आवडत्या रंगावरून ओळखा स्वभाव
Color psychology in Marathi

7) पिवळा रंग (Yellow Colour)

या व्यक्ती “जीयो और जीने दो” या विचारसरणीला मानणारे असतात. या व्यक्ती अत्यंत हसतमुख स्वभावाचे असतात. अशा व्यक्ती स्वतः ही अत्यंत आनंदी जीवन व्यतीत करतात आणि दुसऱ्यांनाही नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती नेहमीच जिवणाला एका सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात.

8) जांभळा रंग (Purple Colour)

हा रंग आवडणारे लोक अत्यंत दूरदर्शी विचाराचे असतात. प्रत्येक काम करायच्या आधी त्याचे फायदे आणि तोटे पडताळून पाहणे यांचा मूळ स्वभाव असतो. या व्यक्ती तेच काम करतात ज्याचा भविष्यात त्यांना फायदा असेल. ही लोकं प्रत्येक काम अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांना कलेची खूपच उत्तम जाण असते.


हिवाळ्यात कोरड्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Leave A Reply

Your email address will not be published.