Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा मेजर ध्यानचंद ह्यांनी हिटलरची ऑफर नाकारली होती

हॉकी या खेळामध्ये भारताला १९२८, १९३२ व १९३६ अशी सलग तीन वर्षे ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

२९ ऑगस्ट रोजी देशभरात खेळांचं आयोजन केले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. एवढंच नव्हे तर दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. यामागचं कारण म्हणजे २९ ऑगस्ट १९०५ रोजी हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्म झालेला.

मेजर ध्यानचंद हॉकी खेळात एवढे कुशल होते कि त्याच्या जवळ असलेला बॉल काढून घेणे कुणालाही जमत नसे. त्यांच्ये हॉकी बॉल वरील नियंत्रण बघून सगळेच दंग राहत आणि म्हणूनच जगातील काही हॉकी खेळातील अधिकाऱ्यांनी मेजर ध्यानचंद ह्यांची हॉकी तोडून त्यात मॅग्नेट आहे का तपासले होते. Major Dhyanchand ह्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये तब्बल ४०० गोल केले आहेत. म्हणूनच आपण Wizard of Hockey म्हणून ओळखतो.

Major Dhyanchand information in marathi, Major Dhyanchand and Hitler, National Sports Day, Major Dhyanchand birthday, major dhyan chand essay, berlin olympics 1936, picture of dhyan chand, मेजर ध्यानचंद माहिती, Wizard of Hockey, The Magician of hockey, dhayaanchand hockey, बर्लिन ऑलम्पिक्स १९३६, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद
Major Dhyanchand information in marathi, National Sports Day

हॉकी या खेळामध्ये भारताला १९२८, १९३२ व १९३६ अशी सलग तीन वर्षे ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. हॉकीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या माणसाचं आपल्या देशावर किती प्रेम होतं हे आपल्याला एका प्रसंगांमधून लक्षात येईल. तोच प्रसंग आता आपण बघणार आहोत.

ही गोष्ट आहे १९३६ सालच्या बर्लिन ऑलिम्पिक (Berlin Olympic 1936) स्पर्धेची. भारतीय संघ हा आपली सर्वोत्तम कामगिरी करत तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला होता जिथे त्यांचा अंतिम सामना हा जर्मनीशी होता. हा सामना बघण्यासाठी ४० हजार लोक मैदानावरती हजर होते. तसेच Adolf Hitler सुद्धा मैदानामध्ये सामना बघायला आला होता. अंतिम सामन्यामध्ये मेजर ध्यानचंद यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल सहा गोल मारले. हिटलर सामन्यामध्ये आपल्या देशाची इतकी धुलाई बघून सामना अर्धवट सोडून निघूल गेला. अंततः भारतीय संघाने हा सामना ८-१ अश्या मोठ्या फरकाने जिंकत तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले.

सामना संपल्यानंतर हिटलरने मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांना भेटण्याचे निमंत्रण दिले आणि निमंत्रणाचा स्वीकार करत ते भेटायला गेले. भेटीमध्ये हिटलरनी मेजर ध्यानचंद यांना प्रश्न केला कि “जेंव्हा हॉकी नाही खेळत तेंव्हा काय करता ? ध्यानचंद म्हणाले “मी भारतीय सेनेमध्ये एक जवान आहे.” पुन्हा हिटलरने प्रश्न केला “कोणत्या पदावर आहात ?” ध्यानचंद यांनी सांगितलं “मी लान्सनायक आहे.”

शेवटी हिटलर म्हणाला ‘जर्मनीला या मी तुम्हाला फील्डमार्शल बनवतो.’ यावर ध्यानचंद यांनी हिटलरला अतिशय नम्रपणे उत्तर दिल, “भारत हा माझा देश आहे आणि मी तिथे पूर्णपणे खुश आहे.”

Major Dhyanchand information in marathi, Major Dhyanchand and Hitler, National Sports Day, Major Dhyanchand birthday, major dhyan chand essay, berlin olympics 1936, picture of dhyan chand, मेजर ध्यानचंद माहिती, Wizard of Hockey, The Magician of hockey, dhayaanchand hockey, बर्लिन ऑलम्पिक्स १९३६, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद
When Major Dhyanchand met Hitler

हे अतिशय नम्र उत्तर ऐकून हिटलर सुद्धा स्तब्ध झाला आणि भारतीय देशभक्तीचं अतिशय उत्तम उदाहरण जगासमोर तसेच कुख्यात तानाशाह हिटलर समोर आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.