Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

‘दिल्ली’च भारताची राजधानी का आहे ?

सुरवातीला ब्रिटिशांनी कलकत्त्याला स्वतःच्या राजधानीची जागा निश्चित केली होती परंतु काही वर्षात हि राजधानी दिल्लीला हलवण्यात आली. भारताची दिल्ली राजधानी का ?

दिल्ली म्हणजे भारताचं ह्रदय (दिल). भारतासारख्या अतिप्राचीन संस्कृती आणि विविधतेत एकता असलेल्या देशाची राजधानी होण्याचा मान मिळाला तो दिल्लीला. दिल्लीत बसून संपूर्ण देशाचा कारभार चालवला जातो, गल्लीपासून सगळ्यांनाच त्या दिल्लीचे मोठे आकर्षण आहे. जगाच्या इतिहासात कोणताच प्रांत इतक्या वेळा उध्वस्त करण्यात आला नाही जितक्या वेळा भारताची राजधानी ‘Delhi’

दिल्ली हे एकूण ७ वेळा उध्वस्थ होऊन परत वसवण्यात आलेलं महाशहर आहे.

महाभारत काळात सुद्धा दिल्लीचे महत्व खूप होते, दिल्लीचे नाव तेव्हा इंद्रप्रस्थ नगरी असे होते असे म्हटल्या जाते. इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती. दिल्लीवर अनेक परकीय आक्रमणांचे आघात होत राहिले, अनेक परकीय राजांनी Delhi वर राज्य करायचं स्वप्न बघितले. पांडव, मौर्य, तुघलक वंश, लोधी वंश, सय्यद वंश, खिलजी वंश, मुघल, तोमर इत्यादी अनेक शासकांनी दिल्लीवर राज्य करणे पसंत केले. मराठ्यांना सुद्धा माहीत होतं की दिल्ली मिळवूनच संपूर्ण भारतात मराठ्यांचं वर्चस्व स्थापन करता येईल.

india, delhi, capital of india, kolkata, delhi became the capital of india in 1912, delhi history, which was the first capital of india, second capital of india, why was delhi chosen as the capital of india in marathi, kolkata was indias capital, British Raj, George V, भारताची पहिली राजधानी, दिल्ली, कोलकाता, Edwin Lutyens, Herbert Baker, दिल्ली राजधानी का
Delhi was destroyed 7 times in the history

अश्या या दिल्लीने अनेक शासकांचा उदय आणि अंत बघितलेला आहे, दिल्ली खऱ्या अर्थाने भारताच्या सोनेरी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यांचा जवळुन साक्षीदार असणार आहे.

कशी झाली दिल्ली भारताची राजधानी ? (How Delhi became India’s Capital ?)

शेवटचा मुघल बादशहा म्हणजेच बहादूर शहा जफर याला रंगूनला हाकलून देऊन ब्रिटिशांनी दिल्ली स्वतः च्या ताब्यात घेतली आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतावर British Raj स्थापन झाले. सुरवातीला ब्रिटिशांनी कलकत्त्याला स्वतःच्या राजधानीची जागा निश्चित केली होती परंतु काही वर्षात आशियाखंडात किंवा भारतीय महाद्विपात, सोव्हिएत रुस संघाचे वर्चस्व वाढायला सुरुवात झाली. अश्या वेळी Kolkata हे भारताच्या अगदी पूर्वेला असल्यामुळे अफगाणिस्तान इराण सारख्या ठिकाणी योग्य लक्ष ठेवणे ब्रिटिशांना अवघड चालले होते.

त्यामुळे जेव्हा, कॉरोनेशन पार्कमध्ये १२ डिसेंबर १९११ ला ब्रिटिश जॉर्ज पंचम (George V) यांचा भारताचे नवे सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला तेव्हा समारंभाच्या शेवटी जॉर्ज यांनी एक घोषणा केली आणि घोषणा ती म्हणजे, ‘भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीत हलवण्याचा निर्णय’

आधुनिक दिल्लीची निर्मिती

ब्रिटिशांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला आणली आणि ती आज पर्यंत तिथेच आहे. सुरुवातीला जेव्हा राजधानी दिल्लीत आणली तेव्हा १९११ च्या काळात दिल्लीची परिस्थिती फार चांगली नव्हती. दिल्ली हे एक जुनाट शहर होते. कोटांनी वेढले गेलेलं एक गाव, कुतुबनिजामुद्दीन दर्ग्याच्या जवळ काही तुरळकच वस्त्या होत्या, बाकी सगळं उध्वस्त आणि बकाल भाग.

त्यामुळे ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन लुटियंस आणि सर हर्बर्ट बेकर ह्या दोघांनी मिळून शहराचा एक आराखडा बनवला आणि पुढील काम आणि शहराच्या निर्मितीचे कंत्राट खुशवंत सिंग यांचे वडील शोभासिंग यांना दिले. शोभासिंग यांनी जुन्या दिल्लीच्या दक्षिण भागात नवी दिल्ली (New Delhi) ची स्थापना केली, नवीन शहर बसवलं, अनेक शासकीय इमारती आणि सोई सुविधा नव्याने उभारण्यात आल्या.

india, delhi, capital of india, kolkata, delhi became the capital of india in 1912, delhi history, which was the first capital of india, second capital of india, why was delhi chosen as the capital of india in marathi, kolkata was indias capital, British Raj, George V, भारताची पहिली राजधानी, दिल्ली, कोलकाता, Edwin Lutyens, Herbert Baker, दिल्ली राजधानी का
Edwin Lutyens and Herbert Baker designed structure to built New Delhi

इंडिया गेट, राष्ट्रपती भवन व दक्षिण अँव्हीन्यू, कॅनॉट प्लेस यासारख्या अनेक महत्वाच्या इमारती उभारण्यात आल्या. नवी दिल्लीला भव्यदिव्य रूप मिळाले. १९११ ते १९३० अशी तब्बल १९ वर्षे हि आधुनिक दिल्ली तयार करायला लागले.

एकूण आठ शहरांचे एकत्रीकरण करून ही आधुनिक दिल्ली तयार झालेली आहे. आज आधुनिक दिल्लीला वसवून सुमारे ११० वर्षांपेक्षा जास्त होत आहेत. दिल्ली सर्व जगासाठी सांस्कृतिक वारश्याचे शहर आहे. प्रसिध्द इतिहासतज्ज्ञ, प्रो. रिझवान कैसर म्हणतात, दिल्ली कायम जगातील सांस्कृतिक मिलाफाचे शहर आहे. अनेक भाषा, संस्कृती, जाती, धर्माचे लोक एकत्र ह्या अफाट नगरीत राहतात. यमुना नदी व अरावली रांगा यांच्या मधोमध वसलेल्या या शहराचे अनेक व्यापारी शहरांशी दृढ नाते आहे.

१९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावरही, दिल्लीलाच राजधानी ठेवण्यात यावे असा ठराव झाला, देश स्वतंत्र झाल्याचं भाषण सुद्धा ह्याच दिल्लीच्या प्रसिध्द लाल किल्ल्यावरून नेहरूंनी दिले, स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज पहिल्यांदा इथेच फडकला !

Leave A Reply

Your email address will not be published.