गरिबीच्या खाईत असलेला सिंगापूर एवढा श्रीमंत कसा झाला ?

0
1182

४० – ५० वर्षांपूर्वी सिंगापूर म्हणजे गरिबीच्या खाईत लोटलेले एक बेट होत, लोंकाना राहायला नीट घरेही नव्हती. मग हा चमत्कार झालाच कसा ?

सिंगापूर हा ६३ छोट्या मोठ्या बेटांनी बनले आहे. १९६० साली गरिबीच्या खाईत असलेलं शहर एवढ्या लवकर श्रीमंत कसं? या देशातील प्रत्येक सहाव्या माणसामागे एकजण करोडपती कसा? इन्फोबझ्झ सांगत आहे तुम्हाला सिंगापूर देशाची गोष्ट.

४०-५० वर्षांपूर्वी गुंडागर्दीने डबडबलेलं असणारं सिंगापूर शहर वजा देश होता. येथील लोकांना ना राहायला चांगलं घर होत ना चांगल्या सुविधा. १९६५ ला सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाले आणि देश उभारणीला सुरवात झाली. सिंगापूर स्वतंत्र झाला त्यावेळी या देशासमोर मोठमोठ्या समस्या आ वासून उभ्या होत्या, त्यातील बेरोजगारी, मुबलक घराची सोय नसणे आणि बरंच काही.

१९७० पासून देशाची आर्थिक घडी चांगल्या रीतीने बसायला सुरवात झाली. सिंगापूर सरकारने सर्व नागरिकांना जिम्मेदारीची जाणीव करून देत असताना शासकीय कर भरण्यावर जास्त प्रोत्साहित करण्यात आलं. कर भरणाऱ्या नागरिकाने सरकारला जमा केलेला कर हा तो किती जमा आहे हे पाहण्याची सुविधा पण सिंगापूर सरकारने उपलब्ध केली. त्या बरोबरच जर करदात्या नागरिकाला गरजेनुसार वैद्यकीय सुविधा, घर खर्च किंवा पेन्शन साठी वापरण्याची मुभा दिली. त्यामुळे नागरिकांना आपण सरकारला पैसे देतोय याची जाणीवच होत नाही, त्यांना वाटतं कि ते पैसे ते स्वतःसाठीच जमा करत आहेत.

Source – pixabay

दुसरी गेमचेंजर योजना ठरली ती म्हणजे प्रत्येक नागरिकांना घर उपलब्ध करून देणे. यासाठी त्यांनी हौसिंग डेव्हलपमेंट बोर्ड बनवला ज्याचे उद्दिष्टच होते कि ५ वर्षांत नागरिकांना ५० हजार नवीन घर नागरिकांना बनवून देणे. १९६१-६२ च्या दरम्यान सिंगापूर मधील झोपटपट्टी परिसरात आग लागली अन त्या आगीत जवळपास सगळ्याच नागरिकांचे कच्या स्वरूपात असणारे घरे जळून खाक झाली. तेंव्हा त्या लोकांना सिंगापूर सरकारने एका वर्षात या लोकांना नवीन फ्लॅट वजा घरे बांधून दिली. पण हि घरे कायमस्वरूपी न देता ती भाड्याने देण्यात आली. २-३ वर्षांनंतर हि घरे सरकारने नागरिकांना खरेदी साठी उपलब्ध करून देण्यात आली. २०१६ पर्यंत जवळपास ९०% नागरिकांची स्वतःची घरे झाली. यातील ८०% घरे हि नागरिकांनी किंवा खाजगी बांधकाम करणाऱ्या कंपनीने बांधली नव्हती तर हि घरे स्वतः सरकारने बनवली होती.

सरकार घरे बनवत राहिली आणि लोक खरेदी करत गेले त्यामुळे लोकांना कमी किमतीत चांगली घरे मिळू लागली. यामुळे लोकांचा राहण्याचा प्रश्न सुटला व या खरेदी-विक्रीच्या पैशातून सरकारी तिजोरी भरत गेली. याबरोबरच सिंगापूर सरकारने देशात विकास करत गेला यामुळे विविध कंपन्या सिंगापूर मध्ये आल्या अन त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत गेले. नोकरी मिळत गेल्याने येथील आर्थिक वृद्धी होण्यास मदत होत गेली अन नागरिक श्रीमंत होत गेले.

Source – pixabay

सागरी मार्ग आणि व्यापार वृद्धी

सिंगापूरच्या या जडणघडणीमध्ये सागरी मार्ग आणि त्यामुळे होणार्या व्यापाराचाही मोठा वाटा आहे. सिंगापूरला मिळालेल्या सागर किनाऱ्याचा उपयोग करत त्यांनी शहराला एक सागरी केंद्र तयार केले ज्यामुळे वाहतूक करणारी अनेक जहाजे तिथे थांबू लागली. येथील सागरी बंदर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर आहे. जे बंदर १२३ देशातील जवळपास ६०० बंदरांना जोडलेले आहे. त्यामुळे हे एक सागरी मार्गासाठी एक महत्वाचे स्थान असून सागरी वाहतुकीचे मोठे हब आहे. याबरोबरच सिंगापूर एक स्मार्ट शहर असून येथील ९०% लोकांकडे मोबाईल फोन आहेत.

पर्यावरण पूरक निर्णय आणि सार्वजनिक वाहतुकीवर भर

सिंगापूर हौसिंग बोर्डाने घर व रस्ते बांधताना त्या ठिकाणी कमी तापमान होण्यासाठी व हवामान नागरिकांना अनुकूल राहण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बसवले आहेत. जे कि तापमान वाढले कि आपोआप ते सक्रिय होऊन तापमान कमी करून वातावरणात समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर जे नागरिक स्वतःची वाहने न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात त्या नागरिकांना सिंगापूर सरकार वेगळा भत्ता व काही रिवॉर्ड्स देते. जेणेकरून लोकांनी जास्तीत सार्वजनिक वापर करावा. सिंगापूर मध्ये मोठंमोठ्या इमारती बरोबरच पर्यावरण संतुलित राखण्यासाठी विशेष भर दिला जातो. ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल आणि हरित क्षेत्र वाढीस मदत होईल अशी रचना करण्यात आली आहे.

Source – pixabay

पर्यटन विकासावर भर

सिंगापूरला असा म्हणावा तसा ऐतिहासिक वारसा नाही. त्यामुळे तिकडे पर्यटन असं काही नव्हतं पण २००५ नंतर सिंगापूर सरकारने विविध वेगवेगळ्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी उभारून शहराला आकर्षक बनविले त्याबरोबरच स्वच्छतेवर भर दिला. त्यामुळे जगभरातील पर्यटक या देशाकडे आकर्षित होऊ लागले अन एक पर्यटन स्थळ म्हणून सिंगापूर नावारूपास आले.

सुरुवाती पासून घेतलेले निर्णय, शून्य भ्रष्टाचार, सागरी वाहतूक, पर्यटन विकास यामुळे सिंगापूरची आर्थिक घडी चांगली बसली व श्रीमंत देशाच्या यादीत सिंगापूर जाऊन बसले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here