संजय गांधींच्या मृत्यूनंतर ‘मेनका गांधी’ गांधी परिवारापासून वेगळ्या का झाल्या ?

0
381

गांधी व नेहरू परिवाराचे भारतीय राजकारणावर असलेले वर्चस्व आपण सर्वच जाणतो. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी ह्या सुद्धा पंतप्रधान राहिलेल्या आहेत. राजीव गांधी त्यांची पत्नी सोनिया गांधी व मुलगा राहुल यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे पण इंदिरा गांधी यांचे कनिष्ठ पुत्र संजय यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही, तर आज आपण त्यांचा विषयी व त्यांचा परिवार यांचाविषयी जाणून घेवूया.

इंदिरा गांधींना 2 मुले राजीव व संजय. संजय गांधी हे इंदिराजींचे अत्यंत लाडके व खूपच जवळचे होते म्हणजे आणीबाणीच्या काळात देशाची व्यवस्था संजय गांधीनीच पाहिली असे म्हणतात. म्हणजेच संजय हे राजकरणात आधीपासूनच सक्रिय होते हे स्पष्ट होते.

कसा झाला संजय व मेनका यांचा विवाह ? कशी झाली या दोघांची भेट ?

या दोघांची भेट नेमकी कधी व कशी झाली याआधी आपण मेनका यांचाबद्दल थोडे जाणून घेवू. मेनका यांचा जन्म 26 ऑगस्ट 1956 ला झाला. त्यांचे शिक्षण लॉरेन्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज मध्ये झाले. लेडी श्रीराम कॉलेज मध्ये प्रथमच मिस लेडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि याच स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या मेनका.

ही स्पर्धाच मेनका यांचा पुढील आयुष्याला दिशा देणारी ठरली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर मेनका यांना जाहिरातींचे अनेक प्रस्ताव येऊ लागले आणि त्यांनी अनेक जाहिरातीत काम सुद्धा केले. याच दरम्यान त्यांनी डेली क्लास मिल्स या टॉवेल उत्पादक कंपनीसाठी सुद्धा काम केले व या जाहिरातींचे फलक शहरात अनेक ठिकाणी लावले गेले आणि याच जाहिरातीच्या फलकातील मेनका यांचा फोटो पाहून संजय मेनकावर मोहित झाले आणि योगायोग असा झाला की संजय हे मेनकांच्या चुलत बहिणीचे मित्र होते. मेनकांच्या याच चुलत बहिणीच्या लग्नातच मेनका व संजय यांची प्रथम भेट झाली.

sanjay gandhi, maneka gandhi, indira gandhi, rashtriya sanjay manch, maneka gandhi family history, why maneka gandhi joined bjp, sanjay gandhi death, sanjay gandhi love story, maneka gandhi modelling, maneka gandhi ad, मेनका गांधी, संजय गांधी, इंदिरा गांधी, संजय गांधी विवाह, राष्ट्रीय संजय मंच
Maneka Gandhi’s towel ad (Source – twojdoktor)

संजय आणि मेनका यांच्या गाठीभेटी त्यानंतर वाढू लागल्या व दोघे एकमेकांत गुंतत गेले. संजय यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले तेव्हा मेनका त्यांना भेटायला रोज हॉस्पिटल मध्ये येत असत. आता दोघांनाही हे जाणवले होते की त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. संजयने मेनकांच्या वडिलांची भेट घेतली व त्यांचासमोर आपल्या व मेनकांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला तो त्यांनी आनंदाने स्वीकारला. पण एक बाब जरा चिंतेची होती ती म्हणजे संजय आणि मेनकांचा वयातील अंतर.

जेंव्हा इंदिरांना ही बातमी समजली की संजय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला पण त्याचबरोबर संजय व मेनकांचा वयातील अंतर याबद्दल चिंता वाटू लागली कारण त्या दोघांचा वयातील अंतर 11 वर्ष होते. संजय मेनकापेक्षा 11 वर्षानी मोठे होते.

अखेर दोन्ही परिवारांचा संमतीने 29 सप्टेबर 1974 ला संजय व मेनका यांचा विवाह संपन्न झाला. लग्न समारंभ मोहम्मद युनूस या इंदिरा गांधी यांच्या मित्राच्या घरी आयोजित केला गेला व यापासून मीडिया व पत्रकार यांना लांब ठेवण्यात आले होते. लग्नानंतर संजय व मेनका यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी वरुण ठेवले.

sanjay gandhi, maneka gandhi, indira gandhi, rashtriya sanjay manch, maneka gandhi family history, why maneka gandhi joined bjp, sanjay gandhi death, sanjay gandhi love story, maneka gandhi modelling, maneka gandhi ad, मेनका गांधी, संजय गांधी, इंदिरा गांधी, संजय गांधी विवाह, राष्ट्रीय संजय मंच
Maneka Gandhi with Varun Gandhi (Source – Awaaz Nation)

सर्व काही सुरळीत चालले होते पण एक दिवस एक बातमी आली ज्यामुळे मेनका व वरुण यांचावर दुःखाचा डोंगर कोसळला. संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आली. एका क्षणात आनंदाची जागा शोक व दुःख यांनी घेतली आणि संजय यांच्या निधनानंतरच गांधी कुटुंबामध्ये कलहास सुरवात झाली. याचे कारण असे की इंदिराजींना सतत असे वाटायचे की मेनकांची आई मेनकांना संजयची जागा घ्यायला लावेल व राजकरणात सक्रिय होण्यास उद्युक्त करेल, जे इंदिरांना नको होते. त्यांना संजय गांधी यांची जागा राजीव यांनी घ्यावी असे वाटत होते पण इकडे मेनका यांना सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा होती.

इंदिरा व मेनका यांच्यातील कलगितूर्‍याची सुरवात खुशवंतसिंग यांच्या एका लेखमुळे झाली अर्थात हे केवळ निमित्त ठरले इतकंच.

खुशवंत सिंग हे गांधी परिवाराचे निकटस्थ होते त्यांनी मेनकांच्या समर्थनार्थ एक लेख लिहला ज्यात त्यांनी मेनका यांना सिंहारूढ दुर्गेची उपमा दिली ज्यामुळे इंदिरा नाराज झाल्या होत्या कारण ही उपमा त्याकाळी फक्त इंदिरांनाच मिळाली होती ती 1971 च्या युद्धानंतर.

खुशवंतसिह यांनी या लेखात अजून एक मुद्दा मांडला ज्यात ते म्हणतात की मेनकांनीच संजय यांचा राजकीय वारसा पुढे चालवायला हवा आणि अर्थातच इंदिरांजींना हे मंजूर नव्हते. पुढे या वादाचा दूसरा अंक घडणार होता. निमित्त होते संजय यांचे निकटस्थ अकबर अहमद यांनी सभा आयोजित करण्याचे.

1982 साली अकबर अहमद यांनी एक सभा आयोजित केली व त्याचे आमंत्रण मेनका यांना दिले, इंदिरांना हे नको होते.

इंदिराजींनी मेनका यांना त्या सभेत भाषण न करण्याची सूचना केली जी मेनकांनी साफ दुर्लक्षित केली व त्या सभेत भाषण केले ज्यामुळे इंदिरा प्रचंड भडकल्या व त्यांनी मेनकांना घर सोडून निघून जाण्याचा आदेश दिला.

sanjay gandhi, maneka gandhi, indira gandhi, rashtriya sanjay manch, maneka gandhi family history, why maneka gandhi joined bjp, sanjay gandhi death, sanjay gandhi love story, maneka gandhi modelling, maneka gandhi ad, मेनका गांधी, संजय गांधी, इंदिरा गांधी, संजय गांधी विवाह, राष्ट्रीय संजय मंच
(Source – Amazon)

मेनका यांनी कुठलाही प्रतिवाद न करता मुलगा वरुण यांना घेवून सासरचे घर सोडले. पुढे त्यांनी राष्ट्रीय संजय मंचची स्थापना केली व काही काळानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. सध्या त्या भारतीय जनता पार्टीत असून खासदार व मंत्री आहेत. संजय यांचे पुत्र वरुण हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार आहेत.

गांधी घराण्याचे भारतीय राजकरणावर गेले कित्येक दशके वर्चस्व आहे. मागील काही वर्षांचा अपवाद वगळता बहुतकरून भारतीय राजकरणावर याच परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. राजकीय स्पर्धा व महत्वाकांक्षा यामुळे गांधी परिवारातील मेनका व वरुण यांना गांधीपरिवारापासून वेगळे व्हावे लागले. भविष्यात काय होईल ते आपण आत्ताच सांगू शकत नाही पण सध्या तरी मेनका व वरुण हे गांधी परिवाराचा हिस्सा नाहीत हेच खरे.

मित्रांनो, राजीव गांधी व त्यांचा परिवाराविषयी आपल्याला माहिती असेलच पण या लेखाद्वारे आम्ही संजय व मेनका गांधी यांचा आयुष्यावर राजकीय प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आशा करतो की हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here