Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्याच्या वाहनांची नंबर प्लेट वेगळी का असते ?

एखादे मुल जन्माला आल्यावर त्याचे नामकरण करून जशी त्याला ओळख देण्याचे काम आईबाप करतात, अगदी त्याचप्रमाणे एखादी नवीन गाडीला नंबर देऊन ओळख देण्याचे काम देशाच्या प्रत्येक राज्यातील RTO करतात.

एखाद्या व्यक्तीच्या नावावरून त्याचे आईवडील कोण, त्याचे घराणे कुठले ही माहिती मिळते. त्याचप्रमाणे गाडीच्या नंबर प्लेटवरून गाडीचा मालक कोण, ती कधी खरेदी केली याची माहिती मिळते. आपल्या आजूबाजूला नीट नजर फिरवली तर विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या नंबरप्लेट असलेल्या गाड्या दृष्टीस पडतात.

कधी या नंबर प्लेट स्थानिक भाषेत असतात तर कधी इंग्रजीत. काही अतिशय रोचक असतात तर काही अतिशय साध्या. पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात, त्या म्हणजे मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट. मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट आपल्या साध्या गाड्यांच्या नंबर प्लेटपेक्षा पूर्णतः वेगळ्या असतात. किंबहुना आपल्यापैकी कित्येकांना त्या वाचताही येत नाहीत. इतर गाड्यांप्रमाणे त्यांची नोंदणी देखील RTO ला होत नाही.

military vehicle numbers meaning, military vehicle registration numbers, army vehicle number plate in marathi, भारतीय सैन्याच्या गाड्या, आर्मीच्या गाड्या
Army vehicle number plates

मिलिटरी गाड्यांची नोंदणी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत होते. या गाड्यांच्या नंबर प्लेटच्या सुरवातीला ऊभा बाण असतो. हा बाण लावण्यामागे हेतू हा असतो की चुकीने नंबर प्लेट उलट लागल्यास किंवा ती नंबर प्लेट असणारी गाडीच उलटी झाल्यास, तो नंबर योग पद्धतीने वाचता यावा. हा बाण फक्त मिलिटरीच्या गाड्यांवरच नाही तर संरक्षण खात्याच्या प्रत्येक मालमत्तेवर असतो.

या बाणाच्या पुढे जे दोन आकडे असतात, ते ती गाडी कोणत्या वर्षी बनवण्यात आली किंवा आयात करण्यात आली हे दर्शवतात. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादी मिलिटरीची गाडी २००५ साली तयार झाली असल्यास किंवा आयात केली असल्यास उभ्या बाणाच्या पुढे ०५ असे लिहिले जाते. त्यांनतर गाडीचा बेस कोड असतो. बेसकोडला धरूनच पुढे गाडीचा सिरीयल क्रमांक आणि सर्वात शेवटी ती गाडी कोणत्या वर्गातली आहे हे दर्शवणारे अक्षर असते.

मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट या काळ्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. केवळ संरक्षण खात्यातील अधिकारीच या गाड्यांचा वापर करू शकतात, ते ही केवळ सरकारी कामासाठी. आपल्या वाहनांना लागू होणारे MVA (Motar Vehicle Act) चे बहुतेक नियम या वाहनांना लागू होत नाहीत, जसे की सिग्नल पाळण्याचे बंधन या गाड्यांना नाही. एवढंच नाही तर गाड्यांमध्ये काही बदल करायचे झाल्यास CMVR (Central Motar Vehicle Act) चे नियमही या गाडयांना पाळावे लागत नाहीत.

नंबर प्लेटवर असणारे स्टार्स

अनेकदा या गाड्यांच्या नंबर प्लेटवर आपणास स्टार्स सुद्धा लावलेले दिसतात. ती गाडी ज्या अधिकाऱ्याची असेल त्याच्या हुद्द्यानुसार हे स्टार्स लावले जातात. उदाहरणार्थ जर गाडी लष्करातील दलप्रमुखाची (Chief Of Staff) असेल, तर नंबर प्लेटच्यावरती एक लाल प्लेट लावली जाते, ज्यावर चार स्टार्स असतात. आणि जर गाडी नौदल किंवा हवाईदलातील दलप्रमुखाची असेल तर नंबर प्लेटच्यावरती निळी प्लेट लावली जाते, ज्यावर देखील चारच स्टार्स असतात.

लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदल प्रमुख यांच्या गाड्यांवरती ५ स्टार्स असतात. हे स्टार्स असे दर्शवतात की संबंधित अधिकारी रिटायर म्हणजेच निवृत्त झाल्यावरही त्याचा युनिफॉर्म घालू शकतो आणि हो यासोबत तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट अजून, देशाचे राष्ट्रापती आणि राज्याचे राज्यपाल यांच्या गाडीवरती नंबर प्लेट नसून सोनेरी अशोक स्तंभ असतो.

military vehicle numbers meaning, military vehicle registration numbers, army vehicle number plate in marathi, भारतीय सैन्याच्या गाड्या, आर्मीच्या गाड्या

हा लेख वाचल्यानंतर एखादी लष्कराची गाडी नजरेस पडल्यास तिची नंबर प्लेट वाचायची कशी याबद्दल तुमच्या चेहऱ्यावर अजिबात प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही एवढं मात्र नक्की !

Leave A Reply

Your email address will not be published.