संत्रे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

0
152
संत्रे खाण्याचे आरोग्यदायी फायदे, संत्रे, पोषणतत्वे, Anti oxidants, Benefits of eating an orange, Carbohydrates

आपल्याकडे तीन ऋतू आहेत. या ऋतुमानानुसार वेगवेगळ्या वातावरणात आपल्या विविध प्रकारची फळे बाजारात मिळत असतात. सध्या कडाक्याच्या थंडीचा मौसम आहे. थंडी म्हणलं की आपसूक आठवण येते नागपुरी संत्र्याची. संत्रे खाल्ल्याशिवाय हिवाळा जात नाही. पण त्याची आंबट गोड चव आहे म्हणून संत्रं खाणं इतकंच आपल्याला माहीत आहे. पण संत्र्यामध्ये चांगले गुणधर्म ही आहेत. कोणते आहेत ते जाणून घेऊयात,

संत्र्यामध्ये कोणती पोषणतत्वे असतात? –

संत्रे हा पोषण मूल्यांचा खजिना आहे. यामध्ये जीवनसत्व, क्षार आणि अँटीऑक्सिडंट्स (Anti oxidants) चा भरणा आहे. तज्ज्ञांच्या मते, संत्राच्या नियमित सेवनाने आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो (Benefits of eating an orange).

  • संत्र्यामध्ये बहुतांश भाग पाणी (Water) आहे. पाण्याचं प्रमाण ८६% च्या आसपास असतं.
  • यानंतर सगळ्यात जास्त म्हणजे १४.८% इतकी कर्बोदके (Carbohydrates) असतात. शर्करेचं (Sugar) प्रमाणही अधिकच असतं, म्हणजे १२% इतकी शर्करा असते. पण ती रक्तात सहज विरघळून जाते.
  • आपल्या शरीराला रोज जेवढ्या प्रमाणात क जीवनसत्व (Vitamin C) लागतं, त्याची गरज संत्र्याच्या सेवनाने भागवली जाते.
  • केवळ क च नाहीतर जीवनसत्व ब-९ (Vitamin B9) हे ही संत्र्यामध्ये आढळून येतं, यालाच फॉलेट (folate) या नावानंही ओळखलं जातं. याचं प्रमाण साधारणतः ९% इतकं असतं. याच्या कमतरतेमुळे आपल्याला हृदय विकार, अर्धांगवायू व कर्करोग यांचा धोका वाढू शकतो.
  • या नंतर कॅल्शियम (Calcium) आढळतं. याचं प्रमाण ५% आहे. हाडं मजबूत करण्याचं काम हे पोषणतत्व करतं हे आपल्याला माहीत असेलच.
  • त्याचबरोबर पोटॅशियम ही आढळून येतं. त्याचं प्रमाणही ५% इतकंच आहे. याच्यामुळे शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राहते. तसेच स्नायूंचं आकुंचन करण्याचं काम करण्यास मदत होते. हे चेतापेशींच्या संदेश वहनामध्येही मुख्य काम करते.
  • संत्र्यामध्ये साधारपणे २% प्रथिने आढळतात. प्रथिनांना प्रोटिन्स (Proteins) ही म्हणलं जातं. हे पोषणतत्वामधील मुख्य घटक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढणे, तसेच चयापचय क्रियेला उद्युक्त करणे अशी महत्वाची कार्ये प्रथिने करतात.
  • याच्यानंतर संत्र्यामध्ये तंतूमय पदार्थही आढळतात. यालाच फायबर (Fiber) ही म्हणलं जातं. फायबर म्हणजे एक प्रकारचं कर्बोदकच आहे जे मानवी शरीर पचवू शकत नाही. याचं प्रमाण २.८ % इतकं आहे. हे खाल्ल्यामुळं रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. आपली भूक वाढवतं.
  • यानंतर संत्र्यामध्ये सगळ्यात कमी प्रमाणात जो घटक आहे तो म्हणजे स्निग्ध पदार्थ. ज्याला फॅट्स (Fats) म्हणतात. स्निग्ध पदार्थांचं प्रमाण ०.२% इतकं आहे.
  • त्याचबरोबर संत्री खाल्ल्यामुळं कॅलरीही मिळतात ज्याचं मूल्य ६६ इतकं आहे. कमी स्निग्ध पदार्थ आणि कॅलरी असल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढत नाही.

पोषणाच्या दृष्टीने इतकं उपयुक्त असणारं फळ असं हे संत्रं आहे. आवडत असेल तर तुम्ही नक्की खाणारच पण आवडत नसेल तरी पोषण होण्यासाठी खात रहा, असा प्रेमाचा सल्ला आहे. हा सल्ला तुम्ही नक्की ऐकाल.


हे ही वाचा –

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here