फिल्म करिअरमधील जेनेलियाच्या सर्वात बेस्ट फिल्म्स, तुम्ही किती बघितल्या आहेत ?

दिसायला एकदम क्यूट असणाऱ्या जेनेलियाचे आपण सगळेच फॅन आहोत पण तिच्या किती फिल्म्स तुम्ही बघितल्या आहेत. काही फिल्म्स मध्ये तर जेनेलिया खूपच सुंदर दिसते.
५ ऑगस्ट १९८७ रोजी जन्म झालेल्या जेनेलियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जेनेलिया डिसूझाचे साऊथ मध्ये जेवढे फॅन्स आहेत कदाचित त्याहून अधिक फॅन्स बॉलिवूड मध्ये आहेत. जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुख सोबत लग्न केले आणि त्यानंतर मात्र ती सिनेमांपासून दूरंच गेली. परंतु आपल्या करिअरमध्ये Genelia D’Souza ने दिलेल्या बेस्ट फिल्म्सची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Na Ishtam
२०१२ साली प्रदर्शित झालेला Na Ishtam हा एक तेलगू चित्रपट आहे. ह्या सिनेमात जेनेलिया आणि राणा डगुबत्ती मुख्य भूमिकेत आहेत. जेनेलियाची हि फिल्म बघायची असल्यास तुम्ही Youtube अथवा MX Player वर बघू शकता.
Uthama Puthiran
२०१० साली प्रदर्शित झालेला Uthamaputhiran तामिळ भाषेतील सिनेमा असून ह्या सिनेमात जेनेलिया आणि धनुष लीड रोल मध्ये आहेत. हा चित्रपट बघायचा असल्यास तुम्ही Youtube आणि JioCinema वर बघू शकता.
Happy
Happy हा जेनेलियाचा सर्वात प्रसिद्ध सिनेमांपैकी एक. जेनेलियाच्या फॅन्सने हा सिनेमा बघितला नाही असं शक्यच नाही. ह्या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत आहेत. हि फिल्म तुम्ही Youtube वर बघू शकता.
Chance Pe Dance
चान्स पे डान्स हा जेनेलियाचा हिंदी सिनेमा आहे. ज्यांना डान्स आणि ऍक्टिंगची आवड आहे त्यांनी हा सिनेमा नक्की बघावा. Chance Pe Dance मधील शाहिद कपूर आणि जेनेलियाची जोडी सगळ्यांनाच आवडली.
Jaane tu ya Jaane Na
‘जाने तू या जाने ना’ हा जेनेलियाचा सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक. ह्या फिल्म मध्ये जेनेलिया सोबत इरफान खान सुद्धा आहे. ए आर रहमानच्या संगीताने ह्या चित्रपटाला चार चांद लावलेत.
Bommarillu
खरं तर Bommarillu ह्या फिल्म पासूनंच जेनेलियाने चाहते मोठ्या संख्येने वाढले. सिद्धार्थ आणि जेनेलियाची प्रेम कहाणी तरुणाईला चांगलीच भावली. ब्लॉकबस्टर ठरलेला हा सिनेमा तुम्ही Zee5 वर बघू शकता.
Orange
२०१० साली प्रदर्शित झालेला ऑरेंज हा सिनेमा जरी ब्लॉकबस्टर ठरला नसला तरी क्युट दिसणाऱ्या जेनेलियाने मात्र आपल्या अदाकारीने चाहत्यांना नक्कीच घायाळ केले. रामचरण तेजा आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत असणारा हा सिनेमा तुम्ही हॉटस्टारवर बघू शकता.
Dhee
Dhee हा एक तेलगू चित्रपट असून ह्या सिनेमात विष्णू मांचू आणि जेनेलिया लीड रोल मध्ये आहे. हा रोमँटिक सिनेमा तुम्ही Amazon Prime आणि Youtube वर बघू शकता.
Boys
कॉलेज लाईफवर आधारित असलेला Boys हा सिनेमा तरुणाईने नक्की बघावा. ह्यात देखील सिद्धार्थ आणि जेनेलियाच्या जोडीने कमाल केली आहे. S Shankar ह्या प्रसिद्ध दाक्षिणात्य डायरेक्टरने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून तुम्ही हा सिनेमा Youtube आणि Zee5 वर बघू शकता.
Force
जॉन अब्राहम आणि जेनेलियाचा Force हा हिंदी चित्रपट बघितला नाही असे फार कमी लोक असणार. जेनेलियाच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी सिनेमांपैकी फोर्स हा एक सिनेमा. Hotstar वर हा सिनेमा तुम्ही बघू शकता.
Santhosh Subramaniyam
जेनेलिया आणि जयम रवी लीड रोल मध्ये असलेला Santhosh Subramaniyam हा तामिळ भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. हा सिनेमा तुम्ही MX Player वर बघू शकता.