Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेनरिक औषधं म्हणजे काय ? जेनरिक औषधी एवढी स्वस्त कशी मिळतात ?

औषधांचे प्रकार बघता सर्वसाधारणपणे ब्रँडेड आणि जेनेरिक असे २ प्रकार आहेत. ब्रँडेड औषधे म्हणजे काय ? Generic Medicineम्हणजे काय ?

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तसेच त्याला जोडून औषध हे ही त्याच क्रमात चौथं आलेलं आहे. सध्या घर सामानाची आपण वाण्याला जशी यादी देतो, तशी मेडिकल दुकानदारालाही औषधांची यादी दिलेली असते. कारण कधी उतार वयात तर कधी तिशीतच विकार लागलेले असतात तर त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी घ्यावी लागणारी औषधं ही आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. याच्यासाठी आपल्या मासिक बजेटमध्ये एक वेगळा हिस्सा असतो. तसेच ऋतुबदलानुसारही आजारपणे चालूच असतात.

सर्वसामान्य लोकांच्या चेहेर्‍यावर रोग बरा झाला याच्या आनंदापेक्षा खिशाला लागलेली कात्री याचंच टेन्शन जास्त असतं कारण औषधांच्या किंमती तितक्या जास्त आहेत. त्या मानाने जेनेरिक औषधे बरीच स्वस्त असतात. काय आहे जेनेरिक औषधं हे प्रकरण ? जाणून घेऊया त्याची समग्र माहिती.

जेनेरिक औषधे म्हणजे काय, generic meaning in marathi, generic medicine information in marathi, generic vs brand name drugs, difference between generic and branded medicine, generic vs branded generic medicine, ip bp usp specification, Pharmacopoeia, Branded Generic Medicine in marathi, Why Generic Medicines are cheaper, generic medicine vs branded medicine
Difference between Generic Medicine and Brand Name Medicine

ब्रँडेड औषधी आणि जेनेरिक औषधीतला फरक (Difference between Generic Drugs and Branded Drugs)

औषधांचे प्रकार बघता सर्वसाधारणपणे ब्रँडेड आणि जेनेरिक असे २ प्रकार आहेत. ब्रँडेड औषधे म्हणजे काय ? औषधं बनवणं आणि त्याची विक्री करणं इतकंच कंपन्यांचं काम नाही नसून एखाद्या आजारावर इलाज म्हणून औषध तयार करण्यासाठी त्या कंपन्यांकडून बरीच वर्षे संशोधन सुरू असतं, या घेतलेल्या कष्टातून सापडलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे औषधाचं उत्पादन केलं जातं. बरं याचा उत्पादन खर्च कमी असेल पण संशोधनावर जो खर्च झाला आहे, तो भरून काढायला हवा म्हणून ते शोधलेलं औषध निर्माण करण्याचा हक्क काही वर्षे (साधारणतः १५ ते २० वर्षे) त्याच कंपनीला दिलेला असतो, याला पेटंट म्हणतात.

त्यानुसार कंपनी त्या औषधला ठराविक नाव देते, ज्याला ब्रॅंड नेम असं म्हणतात. तर हे झालं ब्रॅंडेड औषध. जोवर पेटंटचा कालावधी आहे तोवर ही कंपनी संशोधनावर झालेला खर्च आणि नफा मिळवून घेते व त्यानंतर ते औषध बाकीच्या कंपन्या बनवू शकतात. औषध बनवण्यासाठी आवश्यक घटक व त्यांचं प्रमाण या बद्दलची म्हणजे त्याच्या फॉर्म्युलाबद्दलची सखोल माहिती एका पुस्तकामध्ये नोंद केलेली असते, त्याला फार्माकोपिया (Pharmacopoeia) म्हणतात.

औषधाच्या पाकिटावर IP, BP, USP लिहिलेलं असतं त्याचा अर्थ काय ? (What is meaning of IP, BP, USP written on tablets ?)

जर एखाद्या औषधाच्या बाटली किंवा बॉक्सवर पाहिलं असता औषधामध्ये असलेले घटक लिहिलेले असतात आणि मुख्य घटकापुढे IP, BP, USP असं लिहिलेलं असतं. हे फार्माकोपिया पुस्तक विविध देश छापत असतात, त्यांच्या नावाच्या आद्याक्षराबरोबर फार्माकोपियाचा पी ही येतो, उदा. IP – इंडियन फार्माकोपिया, BP – ब्रिटिश, USP – अमेरिकन इ.

जेनेरिक औषधी स्वस्त का ? (Why Generic Medicines are cheaper ?)

पेटंटचा काळ संपला आहे म्हणून बाकी कंपन्या ब्रँडेड औषधी सारखी औषधं बनवतात. म्हणजे समजा ब्रॅंडेड औषध २०० मिलिग्राम आहे तर हे नवीन बनवलेलं औषधही २०० मिलिग्रामच असावं, एकाचं इंजेक्शन आणि दुसरं तोंडावाटे असं न करता दोन्ही तोंडावाटे पाण्यासोबतच घ्यावयाची असावीत, त्यांची काम करण्याची क्षमताही सारखीच असेल तरच यांना जेनेरीक औषधं (Generic Medicine) म्हणता येतं. तर ब्रॅंडेड औषधांपेक्षा ही जेनेरीक औषधं स्वस्त असतात. कारण खर्च कुठे होतो याची माहिती वर दिलेली आहे.

पुन्हा एकदा सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जेनेरिक औषधी बनवणाऱ्या कंपन्यांना संशोधनाची आणि प्रयोगशाळा उभारण्याची गरज पडत नाही तसेच ह्या कंपन्या जेनेरिक औषधांची जाहिरात देखील करत नाहीत परिणामी जेनेरिक मेडिसिन स्वस्त दरात उपलब्ध होतात.

ब्रँडेड जेनेरीक औषधी म्हणजे काय ? (What is meant by Branded Generic Medicine ?)

भारतामध्ये बहुतांश अशाच प्रकारची औषधं बनवली जातात पण त्यांना बनवणार्‍या कंपन्या त्यांना काही नावं देतात, आता हे काय ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. या वर्षी कोरोनाने सर्व जगामध्ये हाहाकार उडवलेला आहे. त्याच्या उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला गेला, अमेरिकेमधूनही मागणी होती, तसा त्याची निर्यातही केली गेली. (यामुळे कोरोना बरा होतो असा दावा केलेला नाही.)

जेनेरिक औषधे म्हणजे काय, generic meaning in marathi, generic medicine information in marathi, generic vs brand name drugs, difference between generic and branded medicine, generic vs branded generic medicine, ip bp usp specification, Pharmacopoeia, Branded Generic Medicine in marathi, Why Generic Medicines are cheaper, generic medicine vs branded medicine
Generic Medicine information in Marathi

तर हे औषध दुकानात हायड्रोक्वीन (Hydroquin), झक्वीन (Zhquine), प्लाकुएनील (Plaquenil) या आणि अन्य नावांनी मिळते. याला ब्रँडेड जेनेरीक (Branded Generic) असं म्हणतात. तर फक्त हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (जेनेरीक सॉल्ट) या नावावर मिळणारं म्हणजे जेनेरिक औषध असतं. याचा उपयोग मलेरियाच्या उपचारासाठी केला जातो.

ब्रँडेड जेनेरीक व जेनेरिक औषधांच्या किंमतीमध्ये फरक का आहे ? (Why there is price difference bet Generic and Branded Generic Medicines)

वर दिलेल्या ब्रँडेड जेनेरीक व फक्त हायड्रोक्सीक्लोरोक्वीन असं लिहीलेल्या औषधाच्या किंमतीमध्ये फरक असतो. बाकीही औषधांच्या बाबतीत हे असंच आहे. या भारतीय कंपन्या अमेरिकेत ही कमी किंमतीमध्ये तयार झालेली जेनेरीक औषधं पाठवतात पण भारतात मात्र ब्रॅंड नेम देऊन जास्त भावाने विकतात. याला कारणही तसंच आहे, अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासन विभाग हा भारतीय विभागपेक्षा जास्त सक्रिय आहे. औषधा बरोबरच बनवणार्‍या कंपनीचंही मूल्यांकन त्यांच्याकडून होतं, केवळ अमेरिकेतीलच नव्हे इथे भारतीय कंपन्यांचं परीक्षण (Audit) हे ठराविक कालावधीनंतर USFDA कडकपणे करते. काही भारतीय कंपन्यांच्या उत्पादनावर त्यांचा दर्जा नीट सांभाळला जात नाही म्हणून USFDA मार्फत बंदीही आलेली आहे.

भारतीय कंपन्यांच्या या चढ्या किंमतीत विकण्याच्या धोरणामुळे गरिबांची आर्थिक स्थिती कोलमडते. बरं आधीच्या यूपीए सरकारनेही याच्या विरोधात पाऊलं उचलली होती, त्यांनी सरकारी दवाखाने व डॉक्टरांना जास्तीतजास्त जेनेरीक औषधे पेशंटला दिली जावीत असं सांगितलं तर २०१२ मध्ये Drug and Cosmetic act 1940 च्या कायद्यामध्ये सुधारणा करून परवाना त्याच कंपनीला दिला जाईल जी जेनेरीक औषधे बनवेल. त्याच्यापुढे जाऊन एनडीए सरकारने पंतप्रधान भारतीय जनौषधी योजना आणली, याद्वारे जनौषधी स्टोअर्स उघडण्यात आली त्यामध्ये स्वस्त जेनेरीक औषधे मिळतील. आपण आपल्या स्मार्ट फोन वरूनही जवळची जेनेरीक औषधे देणारी दुकाने शोधू शकतो. त्याचबरोबर MyDawaai, MediIndia, JanAushadhi यासारख्या वेबसाइटस् जेनेरीक औषधांबद्दल व्यवस्थित माहिती देतात.

हे इतकं उपलब्ध असूनही ब्रँडेड जेनेरीक औषधींचाच बोलबाला जास्त आहे. एक तर या खाजगी कंपन्या ब्रँडेड जेनेरीक औषधांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतात. यांचे मार्केटिंग करणारे लोक ज्यांना Medical Representative म्हणतात ते दवाखान्यांमध्ये जाऊन आपल्या कंपनीची डॉक्टरसमोर, मेडिकल दुकानदारासमोर छान जाहिरात करतात. आता डॉक्टरना जेनेरीक सॉल्टचं नाव लिहिणं बंधनकारक असतानाही ठराविक कंपन्यांच्या औषधांना प्राधान्य देतात. समजा चिठ्ठीवर जेनेरीक सॉल्टचं नाव असेल तर डॉक्टर किंवा मेडिकल दुकानदार ज्या कंपनी कडून जास्त फायदा होतो त्याला महत्व देतात, यासाठी या कंपन्यांची जोरदार चढाओढ रंगलेली दिसते.

जेनेरिक औषधे म्हणजे काय, generic meaning in marathi, generic medicine information in marathi, generic vs brand name drugs, difference between generic and branded medicine, generic vs branded generic medicine, ip bp usp specification, Pharmacopoeia, Branded Generic Medicine in marathi, Why Generic Medicines are cheaper, generic medicine vs branded medicine
Bhartiy Jan Aushadhi Kendra

डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार असं का करतात ?

तर आपल्याकडे मोठ्या प्रसिद्ध औषध कंपन्यांबरोबर काही स्थानिक-छोट्या कंपन्याही जेनेरीक औषधं (Generic Medicine) बनवतात पण त्यांचा दर्जा त्यांची कार्यक्षमता तपासली जाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. कारण आपल्याकडे त्याच्यासाठीच्या पायाभूत सुविधा किती भक्कम आहेत, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे डॉक्टर याबद्दलचा धोका पत्करू इच्छित नसतात, पेशंटचं जर काही बरं-वाईट झालं तर त्याचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करण्याचं प्रमाणही आजकाल वाढलेलं आहे. बरं आपल्याकडे ही औषध दुकाने, स्थानिक कंपन्या याची तपासणी करण्यासाठी जे Drug Inspectors असतात, दुकाने व कंपन्यांच्या संख्येच्या तूलनेत यांची संख्याही अतिशय कमी आहे.

त्याच बरोबर भारतीय अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हा सक्षम, भ्रष्टाचाररहीत आहे का ? नसेल तर त्याला तसं केलं गेलं पाहिजे. केवळ रोग बरा करून चालत नाही तर त्याचं मूळ शोधून समूळ नायनाट करावा लागतो, त्याचप्रमाणे नुसत्या चांगल्या योजना सरकारतर्फे खूप येतात पण अंमलबजावणी होताना त्यात अडथळे-अडचणी येतात त्या दूर करायला हव्यात. त्याशिवाय बहुसंख्य जन सामान्यांना त्या चांगल्या योजनांचा लाभ उठवता येणार नाही हेच खरं !.!.!

Leave A Reply

Your email address will not be published.