Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय वायुसेनेकडे असलेले १० सर्वात शक्तिशाली लढाऊ विमाने

भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य बघून शत्रूच्याही मनात धडकी भरेल

“नभ: स्पृश्यम दीप्तम” हे भारतीय वायुसेनेचे बोधवाक्य (Motto) आहे. गीतेतील ११व्या अध्यायातून घेतलेले हे वाक्य भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धावेळी सांगितले होते. याचा अर्थ नभाला स्पर्श करणारा दैदिप्यमान असा आहे ! नभाला स्पर्श करण्यासाठी असलेली भारतीय वायुसेनेतील आयुधे म्हणजे तिच्याकडे असलेल्या अमूल्य लढाऊ विमानांबद्दल आपण जाणून घेऊ.

भारतीय वायू सेना (Indian Air Force) ही १,४०,००० सक्रिय कर्मचारी आणि सुमारे १८२० सक्रिय विमान (Fighter Jets) असलेली जगातील चौथी सर्वात मोठी वायुसेना आहे. IAF ची मुख्य जबाबदारी म्हणजे भारतीय वायुक्षेत्र सुरक्षित राखणे आणि हवाई युद्ध करणे तसेच Indian Army आणि Navy ह्यांना सहकार्य करणे. सध्या जे भारतीय वायुसेनाद्वारे वापरात असलेले मुख्य १० विमानं आहेत त्यांची माहिती जाणून घेऊ या.

भारतीय वायुसेनेची १० शक्तिशाली लढाऊ विमाने (Indian Air Force Top 10 Fighter Planes)

सुखोई सु -३० एम.के.आय (Sukhoi Su-30MKI)
indian air force planes, indian air force fighter planes list, indian air force strength, sukhoi su-30mki, top 10 fighter planes in india, best fighter jet in india, fastest fighter jet in india speed, tejas speed, aircrafts with indian air force, indian air force motto, indian air force information in marathi, भारतीय वायुसेनेची ताकद, इंडियन एअर फोर्स माहिती, भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने
Sukhoi Su-30MKI

Sukhoi Su-30MKI हे रशियामध्ये सुखोई डिझाइन ब्यूरो कडून विकसित केलेलं एक बहुपयोगी Fighter Jet आहे. भारतीय वायुसेनेत सध्या २६० Su-30MKI जेट विमाने सक्रिय आहेत. या जेटला दोन Lyulka-Saturn AL-31FP turbofans द्वारे चालविण्यात येते, जे प्रत्येकी २७,५६० पौंड क्षमतेचा वेग निर्माण करतात. जेट २१०० कि.मी प्रति तास पर्यंत सर्वोच्च गती मिळविण्यास सक्षम आहे. हे टेक्नॉलॉजी दृष्टीने सर्वोत्कृष्ट जेट आहे आणि आपल्या वायुसेनाचा मुकुट आहे.

डेसॉल्ट राफेल (Dassault Rafale)

Dassault Rafale हे डेसॉल्ट एविएशन कंपनीने विकसित केले असून फ्रेंच ट्विन-इंजिन मल्टिरोल असलेले लढाऊ विमान आहे. हे कॅनडा अप-फ्रंट तसेच डेल्टा-विंग डिझाइनच्या अद्वितीय टेक्नॉलॉजीमुळे ओळखले जाते. २०१२ मध्ये, भारतीय वायुसेनेने डेसॉल्ट राफेलची निवड सगळ्यात आवडते लढाऊ विमान म्हणून केली. या विमानात १९२० किमी/तास पेक्षाही जास्त वेगाने उडण्याची क्षमता आहे.

मिकॉयन मिग -२९ (Mikoyan MiG-29)
indian air force planes, indian air force fighter planes list, indian air force strength, sukhoi su-30mki, top 10 fighter planes in india, best fighter jet in india, fastest fighter jet in india speed, tejas speed, aircrafts with indian air force, indian air force motto, indian air force information in marathi, भारतीय वायुसेनेची ताकद, इंडियन एअर फोर्स माहिती, भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने
Mikoyan MiG-29

MiG-29 सोव्हिएत युनियन अंतर्गत मिकॉयन ने बनवलेले जेट लढाऊ विमान आहे. मिग-२९ ह्या मॉडेलची भारतीय वायुसेना ही पहिली आंतरराष्ट्रीय खरेदीदार आहे. १९९९ च्या कारगिल युद्ध काळात हे विमान काश्मीर भागात IAF ने मोठ्या प्रमाणात वापरले होते. जास्तीत जास्त २४०० किमी / तास ह्या वेगाने हे फायटर प्लॅन उड्डाण घेऊ शकते.

डेसॉल्ट मिराज २००० (Dassault Mirage 2000)

Dassault Mirage 2000 म्हणजे डॅसॉल्ट एव्हिएशनमध्ये तयार झालेल्या फ्रेंच मल्टीरोल चौथ्या पिढीचे लढाऊ जेट आहे. १९८० मध्ये भारतीय वायुसेनेने ४९ मिराज-२००० खरेदी केले होते. त्यापैकी ४२ सिंगल सीटर्स आणि ७ विमाने २ सीटर क्षमतेचे आहेत. २००४ मध्ये, सरकारने आणखी १० मिराज खरेदी करायला वायुसेनेला मान्यता दिली. मिरज २३३६ किमी/तास ह्या सर्वोच्च गतीने उड्डाण भरू शकते. जरी जुनी टेक्नॉलॉजी असली तरी ते IAF मधील सर्वात शक्तिशाली Fighter Plane पैकी एक आहेत.

एच.ए.एल. तेजस (HAL Tejas)
indian air force planes, indian air force fighter planes list, indian air force strength, sukhoi su-30mki, top 10 fighter planes in india, best fighter jet in india, fastest fighter jet in india speed, tejas speed, aircrafts with indian air force, indian air force motto, indian air force information in marathi, भारतीय वायुसेनेची ताकद, इंडियन एअर फोर्स माहिती, भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने
HAL Tejas, Tejas speed

HAL Tejas एअर फोनेटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल ह्या दोघांनाही उपयोग करता येईल ह्या हिशोबाने तयार केले आहे. तेजस हे एक सिंगलसीट मल्टि-रोल तरीही लाइटवेट असलेले फाइटर जेट आहे. तेजस विमान २,२०५ किमी/तास वेगाने उडू शकते व १५,२०० मीटरच्या जास्तीत जास्त उंचीपर्यंत वर जाऊ शकते.

सेपेकैट जग्वार (SEPECAT Jaguar)

Jaguar हे SEPECAT कडून तयार करण्यास आलेलं एंग्लो-फ्रेंच लढाऊ विमान आहे. भारतीय वायुसेनेने जग्वार फायटर जेट बनवायला दिलेल्या ऑर्डरमध्ये युरोपमध्ये निर्मित ४० जग्वार आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून स्थानिक शमशेर नावाने १२० परवाना-निर्मित विमानांचा समावेश होता. हे विमान ११,००० मीटर पर्यंत उंच आणि १६९९ किमी/तास वेगाने उडण्यास सक्षम आहे.

मिकॉयन-ग्युरविच मिग -२१ (Mikoyan-Gurevich MiG-21)
indian air force planes, indian air force fighter planes list, indian air force strength, sukhoi su-30mki, top 10 fighter planes in india, best fighter jet in india, fastest fighter jet in india speed, tejas speed, aircrafts with indian air force, indian air force motto, indian air force information in marathi, भारतीय वायुसेनेची ताकद, इंडियन एअर फोर्स माहिती, भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने
Mikoyan-Gurevich MiG-21, Aircrafts with Indian Air Force

MiG-21 हे एक सुपर-सॉनिक फायटर जेट असून ते सोव्हिएत युनियन मधील मिकॉयन-ग्युरविच डिझाइन ब्यूरोने डिझाइन केलेले आहे. भारतीय वायुसेना ही मिग -२१ ची जगातील सर्वात जास्त वापर करणारी सेना आहे जी सुमारे ११३ मिग -२१ विमानाचा ताफा बाळगून आहे. हे जेट विमान २,१७५ किमी/तास वेगाने भरारी घेऊ शकते. मिग-२१ हे जगातील सर्वात भरभक्कम लढाऊ विमानांपैकी एक आहे.

बोईंग सी -१७ ग्लोबमास्टर १११ (Boeing C–17 Globe Master 111)

१९८९ च्या दशकात अमेरिकेच्या वायुसेनेसाठी मॅकडोनल डगलस ह्याने विकसित केलेले C–17 Globe Master हे तिसरे सगळ्यात मोठे सैन्य वाहतूक करणारे विमान आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये भारतीय वायुसेना (IAF) आणि बोईंग १० ह्यांच्यात सी -१७ विमानांच्या खरेदी साठी करार झाला तो आणि भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात हे लढाऊ विमाने शामिल झाले. हे विमान ८२९ किलोमीटर/तासाच्या गतीने उडण्यास सक्षम आहे. शस्त्रे आणि सैन्याच्या वाहतूक करण्याच्या दृष्टीने हे भारतात असणाऱ्या सर्वोत्कृष्ट विमानांपैकी एक मुख्य विमान आहे.

लॉकहीड मार्टिन सी-१३०जे. सुपर हरक्यूलिस (Lockheed Martin C-130J Super Hercules)
indian air force planes, indian air force fighter planes list, indian air force strength, sukhoi su-30mki, top 10 fighter planes in india, best fighter jet in india, fastest fighter jet in india speed, tejas speed, aircrafts with indian air force, indian air force motto, indian air force information in marathi, भारतीय वायुसेनेची ताकद, इंडियन एअर फोर्स माहिती, भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने
Lockheed Martin C-130J Super Hercules

C-130J Super Hercules हे अमेरिकेमधील लॉकहीड मार्टिनने बनविलेले एक वाहतूक विमान आहे. २००८ च्या सुरुवातीला भारतीय वायुसेनेने खास आपल्या सैन्यासाठी ६ विमाने खरेदी केली. डिलिव्हरी झाल्यानंतर IAF ने काही स्वदेशी उत्पादित उपकरणे बसवून हे विमान अपग्रेड केले. हे विमान चार रोल्स-रॉयस ए.ई.२१०० डी३ टर्बो प्रॉप इंजिन वापरून बनवले आहे. हे एक वाहतूक विमान असल्याने जास्तीत जास्त ६७१ किमी/तास वेगाने उडू शकते.

इलीशिन आयएल -७८ (Ilyushin Il-78)

Ilyushin Il-78 हे सोव्हिएतने निर्माण केलेले एरियल रिफुयलींग टँकर आहे म्हणजे आकाशात विमान उडत असताना ह्या विमानाद्वारे दुसऱ्या विमानात फ्युएल/इंधन भरता येते. Indian Air Forceने २००३ मध्ये पहिल्या सहामाहीत असे दोन विमान खरेदी केले. ८ ऑक्टोबर, २००३ रोजी वायुसेना दिवस परेडमध्ये पहिले सार्वजनिक प्रदर्शन ह्या विमानाचे केले. हे विमान ८५० किमी/तास गतीने उडू शकते. हे फक्त Air to Air Refueling (आकाशात उडत असताना इंधन भरण्यासाठी)साठीच वापरले जाते आणि भारतीय वायुसेनेमध्ये उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्वच विमान आणि हेलिकॉप्टर ह्या द्वारे इंधन भरणी करू शकतात.

अशी सशक्त आणि सशस्त्र वायू सेना आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी कायम सजग आहे. शत्रूच्या मनात धडकी भरेल अशी विराट वायू सेना देशावर आलेल्या संकटाला परतवून लावू शकते यात तिळमात्र शंका नाही !

Leave A Reply

Your email address will not be published.