Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सदाशिवराव भाऊंकडून त्या ‘चुका’ झाल्या नसत्या तर पानीपतची लढाई मराठे जिंकले असते

एक मोठी लढाई मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर लढली, जिने मराठी मनावर पराक्रमाची आणि दुःखाची दुहेरी मोहोर उमटवली.

भारताचा इतिहास मराठ्यांच्या पराक्रमी आणि गौरवशाली इतिहासाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. जुलमी मुघली सत्तेचे उच्चाटन करून लोकांचे राज्य स्थापित करावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राजे शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचे रोप मोठ्या जिद्दीने लावले. पुढे याच रोपाचे वटवृक्ष करण्याचे काम स्वराज्याच्या शिलेदारांनी अगदी प्राणपणाने केले.

मराठ्यांनी स्वराज्याच्या रक्षणा व प्रसाराकरिता अनेक धाडसी लढाया लढल्या. या लढायांची ख्याती आणि व्याप्ती एवढी विशाल होती की आजही संपूर्ण देश खासकरून मराठी माणूस त्यांचे स्मरण केल्याशिवाय राहत नाही. अफजलखानाचा केलेला पराभव असो किंवा पावन खिंडीतील लढाई असो. या सर्वच लढायांमध्ये मराठ्यांनी पराक्रमाची अशी काही पराकाष्टा केली की या लढायांच्या इतिहासाचे स्मरण केल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अशीच एक मोठी लढाई मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर लढली, जिने मराठी मनावर पराक्रमाची आणि दुःखाची दुहेरी मोहोर उमटवली.

मराठ्यांच्या राज्यविस्तार

भारताच्या इतिहासात हरियाणातील पानिपत या स्थानाला महत्वपूर्ण स्थान आहे. या पानिपतावर तीन मोठ्या लढाया भारतीयांनी पाहिल्या. मात्र आजपर्यंत सर्वात जास्त चर्चिली गेली ती मराठे आणि अफगाणांमधील पानिपतावरील तिसरी लढाई. दिल्लीवरील विशेषतः पंजाबवरील वर्चस्वासाठी मराठे व अहमदशाह अब्दाली यांच्यातील स्पर्धेचा परिणाम म्हणजे ही लढाई होती.

पेशवा बाजीराव प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी नर्मदोत्तर प्रदेशात स्वराज्य विस्तार करण्यास सुरवात केली. आपल्या असीम पराक्रमाच्या जोरावर आणि बुद्धिचातुर्यावर मराठ्यांनी माळवा, बुंदेलखंड व गुजरातमध्ये यश मिळवले. एवढेच नाही तर यमुनेपर्यंत मराठी सत्तेचा वचक निर्माण करत प्रथम बाजीरावाने आपल्या वडिलांचे म्हणजेच बाळाजी विश्वनाथांचे राज्यविस्ताराचे धोरण पुढे सुरु ठेवले.

third battle of panipat, ahmad shah abdali, sadashivrao bhau in marathi, vishwasrao peshwa, panipat in marathi, information on battle of panipat, maratha empire, panipat movie story, पानिपत युद्ध, सदाशिवराव भाऊ, अहमद शाह अब्दाली, मराठा साम्राज्य, पानीपतची लढाई
maratha empire, information on battle of panipat (Source – Quora)

पानिपतच्या तिसऱ्या लढाईची पार्श्वभूमी

नादिरशहाला ठार केल्यानंतर अफगाणिस्थानचा शासक बनलेल्या अहमदशहा अब्दालीने पंजाब प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी १७४८ पासून भारतावर धडका देण्यास सुरवात केली. तोपर्यंत मुघलांची ताकद अतिशय क्षीण होऊन दिल्लीच्या मुघल सम्राटपेक्षा त्याच्या दरबारातील सरदार वर्गच प्रबळ होत होता. मुघलांचा वजीर सफदरजंग आणि दुआबमधील रोहिल्यांच्या संबंध बिघडल्याने सफदरजंगने मराठ्यांकडे मदतीसाठी याचना केली. त्यामुळे रोहिले आणि मराठ्यांमध्ये झालेल्या संघर्षात मराठ्यांनी रोहिल्यांना पराभवाची धूळ चारल्याने रोहिल्यांचा पुढारी नजीबखानने आपल्या मदतीसाठी अहमदशाह अब्दालीला पाचारण केले.

१७५१ मध्ये अब्दालीने पंजाबमध्ये येऊन लाहोर जिंकून घेताच त्याची दिल्लीवरील आक्रमनाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली. दिल्ली मुघल सत्तेचे केंद्र असल्याने अब्दालीच्या आक्रमणापासून

दिल्लीला वाचवण्यासाठी मुघल वजीर सफदरजंगने १७५२ साली मराठ्यांशी एक करार केला. या करारानुसार मराठ्यांना ५० लाख रुपयांचे पंजाब, सिंध व दुआबाचे चौथाईचे अधिकार तसेच आग्रा व अजमेरीची सुभेदारी मिळाली.

मात्र एकीकडे मुघल वजीर मराठ्यांशी करार करत असतानाच दुसरीकडे मुघल सम्राटाने दिल्लीवरील हल्ल्याच्या भिती पोटी अब्दालीला पंजाब देऊन टाकला आणि दिल्लीवरील संभाव्य आक्रमण टाळले.

third battle of panipat, ahmad shah abdali, sadashivrao bhau in marathi, vishwasrao peshwa, panipat in marathi, information on battle of panipat, maratha empire, panipat movie story, पानिपत युद्ध, सदाशिवराव भाऊ, अहमद शाह अब्दाली, मराठा साम्राज्य, पानीपतची लढाई
ahmad shah abdali, अहमद शाह अब्दाली (Source – Wikibio)

अशाप्रकारे मराठे दिल्लीच्या राजकारणात प्रत्यक्षरित्या गुरफटल्याने पंजाबवर अधिकार नेमका कोणाचा ? मराठ्यांचा की अहमदशाह अब्दालीचा हा प्रश्न उभा ठाकला. १७५२ च्या करारानुसार रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य उत्तरेत आले. याचवेळी मराठे व जाट यांच्यात संघर्ष होऊन मराठ्यांनी आपला एक चांगला मित्र गमावला. यानंतर पंजाबमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे अब्दाली नोव्हेंबर १७५६ मध्ये पंजाबमध्ये आला व तेथून थेट दिल्लीवर चालून गेला.

अहमदशहा अब्दालीच्या सैनिकांनी दिल्लीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांच्या या विध्वंसाची झळ जवळच्या मथुरा, वृंदावन, गोकूळ या ठिकाणांनाही सोसावी लागली. हे सर्व होत असताना अब्दालीच्या सैन्यात अचानक कॉलराची साथ पसरल्याने अब्दाली अफगाणिस्थानात निघून गेला. मात्र जाताजात नजीबखान रोहिल्यास मीरबक्षी बनवून गेला.

अहमदशहा अब्दालीने माजवलेल्या दहशतीस लगाम घालण्यासाठी व विशेषतः दिल्ली व पंजाबवर पुन्हा मराठा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथरावांना पुन्हा उत्तरेकडे रवाना केले. लवकरच मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवत नजीबखान रोहिल्यास पकडले. मात्र मल्हारराव होळकरांनी मध्यस्थी केल्याने रघुनाथरावांनी नजीबखानास क्षमा केली व पुढे हीच क्षमाशिलता मराठ्यांना चांगलीच महागात पडली.

third battle of panipat, ahmad shah abdali, sadashivrao bhau in marathi, vishwasrao peshwa, panipat in marathi, information on battle of panipat, maratha empire, panipat movie story, पानिपत युद्ध, सदाशिवराव भाऊ, अहमद शाह अब्दाली, मराठा साम्राज्य, पानीपतची लढाई
sadashivrao bhau in marathi, सदाशिवराव भाऊ (Source – Lallantop)

दिल्ली जिंकल्यानंतर मराठ्यांनी कुंजपुरा, सरहिंद व लाहोर घेऊन पंजाबवर नियंत्रण प्रस्थापित करत थेट अटकेपार झेंडे रोवले. मात्र यांनतर लगेचच (मे १७५८) रघुनाथराव दक्षिणेत परतल्याने नजीबखानाने संधी साधत अहमदशहा अब्दालीला पुन्हा आपल्या मदतीसाठी बोलावून घेतले.

अब्दाली पंजाबमध्ये येताच त्याने साबाजी शिंदेंचा पराभव करून मराठ्यांपासून पंजाब हिसकावून घेतला. त्याला रोखण्याच्या प्रयत्नात मराठ्यांचे शूर सरदार दत्ताजी शिंदे १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीजवळच्या बरारघाटीच्या लढाईत वीरगतीस प्राप्त झाले.

सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वात मराठा सैन्य पानिपतावर

पंजाब व दिल्ली प्रदेशावरील मराठ्यांचे नियंत्रण संपुष्टात आल्याची तसेच दत्ताजी शिंदे मारले गेल्याची बातमी कळताच नानासाहेब पेशव्यांनी विशाल सैन्य सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वात उत्तरेत पाठवले. भाऊंच्या सोबत नानासाहेब पेशव्यांचा थोरला मुलगा विश्वासराव आणि तोफखाना प्रमुख इब्राहिम गारदी होता. उत्तरेत गेल्यावर या सैन्याला होळकर व शिंदे येऊन मिळाले आणि ऑगस्ट १७६० मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकून घेतली. तेथून पंजाबवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मराठा सैन्य यमुनेच्या किनाऱ्याने उत्तर दिशेला निघाले. पलीकडील तीरावरून अब्दाली मराठ्यांवर लक्ष ठेवून होता.

ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी कुंजपूरा जिंकून घेतले. या संधीचा फायदा घेऊन अब्दाली नदी ओलांडून अलीकडील तीरावर आला. अशाप्रकारे मराठा सैन्य व दिल्ली यामध्ये अब्दालीचे सैन्य आल्याने मराठ्यांचा दिल्लीशी संपर्क तुटला आणि मराठ्यांना कोठूनही मदत मिळेनाशी झाली. अन्नधान्य संपल्याने मराठा सैनिकांचे व जनावरांचे अतोनात हाल झाले. परिस्थिती पाहून सदाशिवराव भाऊंनी लढण्याचा निर्णय घेतला व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे व अहमदशहा अब्दालीमध्ये युद्ध होऊन मराठ्यांचा पराभव झाला.

third battle of panipat, ahmad shah abdali, sadashivrao bhau in marathi, vishwasrao peshwa, panipat in marathi, information on battle of panipat, maratha empire, panipat movie story, पानिपत युद्ध, सदाशिवराव भाऊ, अहमद शाह अब्दाली, मराठा साम्राज्य, पानीपतची लढाई
पानीपतची लढाई, third battle of panipat (Source – TOI)

सदाशिवराव भाऊंच्या झालेल्या चुका

१) मराठ्यांची मुख्य शस्त्रे भाले व तलवारी होत्या. शिवाय इब्राहिमखान गारदीच्या नेतृत्वात चांगला तोफखानाही होता. मात्र सदाशिवराव भाऊंनी सैन्याची रचना बदलल्याने तोफखान्याचा प्रभावी उपयोग होऊ शकला नाही.

२) सूरजमल जाटाने भाऊंना मराठा सरदारातील बायकामुलांना तसेच अवजड सामान, तोफा व ऐश्वर्यपूर्ण सामग्रीला झाशी किंवा ग्वाल्हेरला ठेवण्याचा सल्ला दिला. कारण मराठ्यांचे सैन्य शीघ्रगामी असले तरी अब्दालीचे सैन्य अधिक शीघ्रगामी होते. त्यामुळे मल्हारराव होळकरांनी सुद्धा अशाच प्रकारचा सल्ला देत भाऊंना म्हंटले की, अवजड तोफखाना शाही सैन्याला अनुरूप होता पण मराठ्यांचा भर गनिमी काव्याच्या युद्धात असल्याने आपण ज्या पद्धतीशी अधिक परिचित आहोत त्याच पद्धतीचा अवलंब करावा. भाऊंना असाही सल्ला देण्यात आला की पावसाळ्यापर्यंत युद्ध लांबवावे जेणेकरून अब्दालीला परत फिरणे भाग पडेल. परंतु भाऊंनी कोणाचेच न ऐकल्यामुळे सुरजमल जाट मराठ्यांना सोडून निघून गेला व मराठे एकाकी पडले.

३) युद्धात विश्वासराव घायाळ होऊन पडल्याचे पाहताच सदाशिवराव भाऊ कसलाही विचार न करता हत्तीवरून उतरत मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडले. हत्तीवर बसलेला सेनापतीच दिसेनास झाल्याने आपला सेनापती मारला तर गेला नाही ना ? या एका विचाराने मराठा सैन्याचे मनोबल खचले व याच संधीचा फायदा घेत अफगाण सैन्य मराठ्यांवर आणखी जोमाने तुटून पडले.

या आणि अशा अनेक लहानमोठ्या कारणांमुळे मराठे पानिपतची लढाई हरले. मात्र अतिशय बिकट परिस्थितीत सुद्धा हार न मानता, शत्रूला शरण न जाता पराक्रमाची शर्थ करत शेवटच्या श्वासापर्यंत मराठे लढल्याने त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली आणि पानिपतावरील मराठ्यांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर झाले.

6 Comments
 1. Dinesh Mahajan says

  Chukichi mahiti ahe hi

  1. SHUBHAM says

   Chukichi mahiti ahe ki bhau sarkha dusra senapati zala nahi

 2. दीपक वेलणकर says

  माहिती चुकीची नि फोटो ही चुकीचा.हा श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा फोटो आहे

 3. Maratha says

  Movie aata nighali panipat, aani hee loka chukya sangtat. Ladhait shahid jhala to maratha hota. Mag tumi tya veer chya Chaka kadnare hote long.

 4. Shrikant landge says

  Information is right I know the maratha lost their kingdom but abdula said while he was going to his native place that the it was biggest war between them and he said that he hasn’t seen such “yodha” “bhavurav peshva” . After that abdula never came again in hindustan.

 5. वैभव सावंत says

  रघुनाथरावांनी नजीब खान ला पकडले आणि मल्लालराव होळकरांनी मध्यथी करून त्याला सोडवले ह्याचा काही पुरावा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More