Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Operation Gibraltar : पाकिस्तानने भारता विरोधात आखलेलं सर्वात मोठं सिक्रेट मिशन

या सिक्रेट मिशनसाठी पाकिस्तानने आपल्या ५ हजार सैनिकांना काश्मीरमध्ये साध्या वेशात पाठवले होते व ४० हजार पाक सैनिकांना विशेष तालीम देऊन तयार केले होते.

भारत आणि पाकिस्तान नेहमीच एकमेकांसाठी प्रतिद्वंदी राष्ट्र म्हणून पुढे आलेले आहेत. या दोन राष्ट्रांमध्ये एवढा द्वेष एकमेकांबद्दल पसरवण्यात आलेला आहे की भारत पाक क्रिकेटचा सामना जरी होत असेल तरी त्याला युद्धाचे स्वरूप प्राप्त होते. भारत पाकिस्तान मध्ये आजपर्यंत चार मोठी युद्ध होऊन गेलेली आहेत आणि आपल्यासाठी गर्वाची गोष्ट म्हणजे ही चारही युद्ध भारताने जिंकलेली आहेत.

भारत आणि पाकिस्तान मध्ये पहिले युद्ध 1948 मध्ये झाले होते. या युद्धाचे कारण म्हणजे काश्मीरचे विलीनीकरण होय. काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान आजही भारतावर टीका करताना दिसून येतो. त्यानंतर 1965 मध्ये परत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले, 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी भारताला पाकिस्तानच्या विरोधात उभे रहावे लागले होते आणि 1999 साली कारगिलचे युद्ध झाले.

1965 साल झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात ऑपरेशन जिब्राल्टर (Operation Gibraltar) चर्चेचा विषय होता. संपूर्ण गोष्ट लक्षात घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे फार गरजेचे आहे. खरं तर भारतीय मुसलमानांमध्ये अशी मान्यता आहे की काश्मीर मधील हजरत दर्गामध्ये पैगंबर मोहम्मद यांचा केस ठेवला ठेवलेला आहे आणि या 1965 च्या काळामध्ये अशी अफवा पसरवण्यात आली की तो केस कुणीतरी गायब केला आहे. अर्थातच धार्मिक भावनेमुळे तिथल्या काही लोकांमध्ये रोष उत्पन्न झाला.

indo-pakistani war of 1965, Operation Gibraltar in marathi, what was operation gibraltar, kashmir, india pak war stories, भारत पाकिस्तान १९६५ युद्ध, ऑपरेशन जिब्राल्टर, काश्मीर
5000 Pak soldiers tried to infiltrate Kashmir during Operation Gibraltar

या उद्वीग्नतेचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या निवडक पाच हजार सैनिकांना साध्या वेशामध्ये काश्मीरमध्ये राहण्यास सांगितले. हे सैनिक काश्मीरमध्ये राहून तेथील लोकांना भारताविरोधात भडकावत असत. ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याला काश्‍मीर खोऱ्यामध्ये अशांतता निर्माण करायची होती.

पाकिस्तानने या ऑपरेशनला Operation Gibraltar असे नाव देण्याचे कारण म्हणजे जिब्राल्टर नावाचे एक बंदर स्पेनपासून काहीच अंतरावरती स्थित आहे. जेव्हा युरोप जिंकण्याच्या उद्देशाने अरबी सेना पश्चिम दिशेकडून आगेकूच करत होती तेव्हा अरबी सेनेने जिब्राल्टर या बंदराचा पाडाव करून युद्ध सुकर बनवले होते. या बंदरामुळे त्यांना पूर्ण युरोपमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हतं आणि म्हणूनच जर पाकिस्तानने काश्मीर जिंकले तर त्यांचे असे म्हणणे होते की संपूर्ण भारत जिंकण्यासाठी त्यांना काहीच वेळ लागणार नाही.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने अशा प्रकारच्या कारवाईची तयारी 1950 पासून चालू केली होती पण त्यांना योग्य संधीची वाट बघावी लागत होती आणि त्या अफवेमुळे त्यांना ती संधी आपसूकच चालून आली होती. Operation Gibraltar साठी तत्कालीन पाकिस्तान विदेश मंत्री झुल्फीकार अली भुट्टो यांचे समर्थन प्राप्त होते. या ऑपरेशनसाठी पाकिस्तानने 40 हजार सैनिकांना विशेष तालीम देऊन हल्ला करण्याची विविध तंत्रे शिकवली होती.

या ऑपरेशन बद्दल बोलताना सेवानिवृत्त पाकिस्तानी जनरल अख्तर हुसेन मलिक म्हणतात की,

“या ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरची समस्या नेहमीसाठी सोडवण्याचा प्रयत्न करत होता. खरंतर आम्हाला भारतासोबत युद्ध करण्याची इच्छा नव्हती.”

ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी पाकिस्ताने पहिल्यांदा संपूर्ण गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. पण भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे कुठलेही ऑपरेशन पूर्ण होऊ शकले नाही आणि याचं कारण म्हणजे कश्मीरमधील सामान्य नागरिकांनी भारतीय सैन्याला केलेली मदत. जेव्हा भारतीय सैन्याला Operation Gibraltar ची भनक लागली त्यावेळी सैन्याने मिलिटरी ऍक्शन न घेता कमांडोंच्या मदतीने या सर्वांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली, पण जेव्हा पाकिस्तानच्या लक्षात आले की त्यांचे सैनिक पकडले जात आहेत तेव्हा त्यांनी लष्करी कारवाईला सुरुवात केली. भारतीय हद्दीमध्ये तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला आणि त्यानंतर मात्र 1965 च्या भिषन युद्धाला सुरुवात झाली. अशाप्रकारे ऑपरेशन जिब्राल्टर एक प्रकारे 1965 च्या भारत-पाक युद्ध जबाबदार होते.

खरतर हे India Pakistan War फक्त सतरा दिवसच चालू होते. या युद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धातील सामग्री वापरण्यात आली होती. १९६५ च्या भारत पाक युद्धात (India Pakistan 1965 War) पाकिस्तानला भारतीय सैन्याने करारी हार पत्करण्यास भाग पडले होते. या युद्धादरम्यान घाबरलेले पाकिस्तानी सैन्य २० रणगाडे भारतीय हद्दीमध्येच सोडून पळून गेले होते. पण हे युद्ध थांबविण्यासाठी भारत पाकिस्तान मध्ये ताश्कंदचा करार करण्यात आला. या करारानुसार भारताने जिंकलेल्या पाकिस्तानच्या जागा त्यांना वापस दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.