Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अपराजित हर्षवर्धनला पराभवाचे पाणी पाजनारा पराक्रमी राजा

महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याचा उदय आणि याच काळात महाराष्ट्राने प्रगती करण्यास सुरवात केली याबाबत आपण पूर्वीच्या लेखात माहिती घेतली आहे. या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुन्हा यो लेख वाचू शकता. सातवाहनांच्या तब्बल 460 वर्षाच्या सत्तेनंतर महाराष्ट्र प्रदेशावर वाकाटक घराण्याचा उदय झाला. इतिहासातील नोंदींनुसार या काळात महाराष्ट्राने सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती केली आहे. वाकाटक साम्राज्यामध्ये फार पराक्रमी ज्याने राज्याचा इतिहास दुसऱ्या प्रदेशात केला अश्या राजाचा उदय झाल्याचा नोंदी नाहीत. वाकाटक नंतर महाराष्ट्रामध्ये चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्तापित झाली.

या घराण्यातील पहिला राजा जयसिंग आहे पण बदामीच्या चालुक्यांच्या झेंडा देशभर फडकवला तो पहिला पुलकेशी. अश्वमेध यज्ञ करून साम्राज्याची राजधानी वातापी म्हणजेच बदामी पहिल्या पुलकेशीनेच केली. यानंतर इतिहासात नोंद घेण्यासारखा पराक्रमी राजा झाला तो कीर्तीवर्मन, याने आपल्या फक्त 11 वर्षाच्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला. कदंब आणि नल या पराक्रमी राजाचा पराभव करू आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.

Chalukya dynasty in its peak.
Source – Wikipedia

पण खऱ्या अर्थाने बदामी चालुक्यांच्या झेंडा वाऱ्याच्या वेगाने फडकवणारा राजा म्हणजे ‘दुसरा पुलकेशी’. बदामी चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ आणि पराक्रमी राजा. वारसा हक्कात निर्माण झालेल्या अस्थिर मध्येही त्याने सामंत आणि मांडलिक राजांवर आपली घट्ट पकड निर्माण केली आणि सैन्याव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. दुसऱ्या पुलकेशी इतका पराक्रमी होता की आपल्या काळातील जवळपास सगळ्याच राजांना त्याने पराभवाचे पाणी पाजले आहे. उत्तरेत मौर्य, कलचुरी, नाल, राष्ट्रकूट, कदंब, आलूप अश्या राजांचा पराभव करत त्याने सगळं प्रदेश आपल्या साम्राज्याखाली आणला. विशेष करून महाराष्ट्रातील भाग याच काळात चालुक्यांच्या अधिपत्याखाली आला. यामध्ये मावळ, कोकण आणि विदर्भाचा समावेश आहे.

त्या काळात आपल्या पराक्रमाच्या कथांनी दुसरा पुलकेशी श्रेष्ठ ठरला होता पण हर्षवर्धन पेक्षा नाही, कारण त्या काळात हर्षवर्धन हा वर्धन साम्राज्याचा राजा महापराक्रमी समजला जायचा. त्याने चालुक्यांच्या उत्तरेतील भागावर आक्रमण केले यावेळी दुसरा पुलकेशी आणि हर्षवर्धन समोरासमोर आले. या युद्धात पुलकेशीने हर्षवर्धनला पराभवाचे पाणी पाजून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. एहोळ येथे असलेल्या एक शिलालेखात पुलकेशीच्या या विजयाची माहिती मिळते. पुलकेशीने कोसल आणि कलिंग ही मोठी राज्ये जिंकली आणि यानंतर पुलकेशीच्या अधिपत्याखाली चालुक्य साम्राज्य शिखरावर पोचले.

पुढे पल्लव राजा नरेंद्र वर्मा याने दुसरा पुलकेशीचा पराभव केला, याच युद्धात हा पराक्रमी पुलकेशी मारला गेला. पुढे झालेले राजे त्याच्याइतके पराक्रमी नसल्याने चालुक्यांच्या राज्याला उतरती लागली आणि हळूहळू सत्ता संपुष्टात आली.


Leave A Reply

Your email address will not be published.