Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Operation Lal Dora : मॉरिशस मध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी RAW ने चालवलेलं एक सिक्रेट मिशन

हिंदूंच्या रक्षणासाठी इंदिरा गांधी मॉरिशस मध्ये मिलीटरी ऑपरेशन घडवून आणणार होत्या पण हे काम RAW च्या केवळ एका गुप्तहेराने पूर्ण केलं

पार्श्वभूमी

रिटायरमेंटच्या वेळी अचानक गायब झालेले रॉ प्रमुख संतूक (RAW Chief Naushervan Framji Suntook), त्यानंतर उठलेले राजकीय वादळ, ते कुठे आहेत याचे इंदिरा सरकारने न दिलेले उत्तर, संतूक यांचे २ दिवसांनी अचानक झालेले आगमन, मॉरिशियस मधील हिंदूंच्या रक्षणासाठी इंदिरा गांधीचे प्रयत्न…. या सर्व गोष्टी आपण ‘जेव्हा रिटारमेंटच्या दिवशीच RAW चे प्रमुख गायब होतात ! या लेखात पहिल्या. आता हे ऑपरेशन लाल दोरा नेमकं होतं काय ? मॉरिशस मधील हिंदूंच्या रक्षणासाठी इंदिरा गांधींनी कसे डावपेच आखले ? रॉ प्रमुख संतूक यांनी मॉरिशस मध्ये काय हालचाली केल्या ? ऑपरेशन लाल दोरा बद्दल जाणून घेण्याअगोदर तुम्हाला मॉरिशस बद्दल काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील.

मॉरिशसची सामाजिक जडघडण

मुंबईपासून ४ हजार ८८८ किलोमीटर आणि विमानाने ६ तास १० मिनिटे एवढ्या अंतरावर हिंदी महासागरात आफ्रिका खंडाला खेटून असणार हा २ हजार ४० चौरस किलोमीटरचा बेटसमूह एकेकाळी निर्मनुष्य होता. ही बेटे निर्मनुष्य असल्याने तेथे स्थानिक नागरिक नव्हते. त्यामुळे तेथे उसाचे मळे पिकवण्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणि भारतातून कंत्राटी मजूर नेण्यात आले. साधारणतः १८३५ ते १९०७ या कालावधीत भारतातील विविध प्रांतातून सुमारे साडेचार लाख मजूर Mauritius ला नेण्यात आले. त्यातले बहुतेक मजूर बिहारचे भोजपुरी भाषिक होते.

म्हणूनच आजही तेथील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात बिहारी हिंदूचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्या खालोखाल ख्रिश्चन ३१ टक्के तर मुस्लिम १५ टक्के आहेत.

Operation Lal Dora in Marathi, रॉ च्या गोष्टी, ऑपरेशन लाल दोरा, रॉ चे ऑपरेशन, Operation Red Thread, raw stories, raw missions, RAW कथा, RAW गुप्तहेर, red line in mauritius, Indias Aborted Military Intervention in Mauritius, Anerood Jugnauth, Indira gandhi, Paul Berenger, Nowsher F Suntook
Indias Aborted Military Intervention in Mauritius

मॉरिशसची सामाजिक परिस्थिती पाहिली तर भारतीय, आफ्रिकी आणि गोऱ्या फ्रेंचांच्या या देशात आजही आर्थिक सत्ता चालते ती ‘फ्रँको मॉरिशियन’ कुटुंबांचीच. त्यांना ‘ग्रँड ब्लॅक्स’ म्हणून ओळखले जाते. तसेच भाषेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फ्रेंच, इंग्रजी आणि Mauritian Creole या तेथील भाषा आहेत.

मॉरिशसचा स्वातंत्र्यलढा आणि भारताने केलेली मदत

ब्रिटिशांच्या जोखडातून मॉरिशसला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तेथील लोकांनीही संघर्ष केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेत शिवसागर रामगुलाम यांनी मोठी स्वातंत्र्य चळवळ उभारली आणि अखेर १९६८ साली मॉरिशस स्वतंत्र झाला. Shivsagar Ramgulam यांच्या स्वांतत्र्य लढ्यातील योगदानामुळे पुढे त्यांचीच मॉरिशियन लेबर पार्टी तेथे सत्तेवर आली.

भौगोलिक दृष्ट्या हा देश महत्वाचा असल्याने भारताने त्याच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली. १९७४ साली भारत आणि मॉरिशस मध्ये लष्करी करार झाला. त्यानुसार भारताने मॉरिशसला काही गस्तीनौका आणि हेलिकॉप्टर्स दिले. एवढंच नाही तर मॉरिशियन तटरक्षक दलाचे काम भारताने स्वीकारले.

मॉरिशस मध्ये झालेला सत्ताबदल आणि जगन्नाथ-बेरेंजर यांना इंदिरा गांधींनी केलेली मदत

विचारांनी प्रागतिक, समाजवादी आणि लोकशाहीवादी असलेले रामगुलाम स्वातंत्र्यानंतर जवळपास १४ वर्षे सत्तेवर होते. मात्र ८० च्या दशका अखेरीस त्यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आणि मॉरिशियन लेबर पार्टीच्या विरोधात मुव्हमेंट मिलीटंट मॉरिशियन नावाचा पक्ष जोर धरू लागला. अनिरुद्ध जगन्नाथ हे या पक्षाचा चेहरा होते.

मूळ भारतीय वंशाचा असलेला हा तरुण देशातील बदलेल्या हवेवर चांगलाच स्वार झाला आणि त्यांना साथ लाभली पॉल बरेंजर नावाच्या एका लढाऊ समाजवादी नेत्याची.

मॉरिशस मधील या बदलत्या राजकीय परिस्थितीवर इंदिरा गांधी सरकार बारकाईने लक्ष ठेवून होते. तेथील भारतीय मिशनला होणाऱ्या सत्तापालटाची चाहूल लागल्याने त्यांनी १९८० व ८१ मध्ये Anerood Jugnauth आणि Paul Bérenger यांना दिल्लीला आणून इंदिरा गांधींशी त्यांची भेट घडवून आणली. इंदिरा गांधींनीही भारताचा पाठिंबा या दोघांच्या पारड्यात टाकला.

परिणामी मॉरिशस मधील १९८२ सालच्या निवडणुकीत जगन्नाथ – बेरेंजेर या जोडगोळीने रामगुलाम यांच्या पक्षाला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. जगन्नाथ मॉरिशसचे नवीन पंतप्रधान झाले तर बेरेंजर यांनी अर्थमंत्री पदाची धुरा आपल्या हाती घेतली.

जगन्नाथ आणि बेरेंजर यांच्यात आलेली कटुता आणि त्यामागील कारणे

मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. सत्तास्थापून काही काळ जात नाही तोच जगन्नाथ आणि बेरेंजर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. बरेंजेर यांनी आपली कट्टर समाजवादी धोरणं पुढे रेटण्यास सुरवात केली. परराष्ट्र धोरण बदल्याणाचाही ते प्रयत्न करू लागले. मॉरिशसने सोव्हिएत रशिया आणि मुहम्मर गडाफिच्या लीबियाशी संबंध दृढ करावेत असे त्यांचे मत होते.

याच काळात लीबियातून मॉरिशियस हिंदूंच्या धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागला. वरील गोष्टींमुळे जगन्नाथ आणि बरेंजर यांचे पटेनासे झाले आणि त्यात ठिणगी पडली ती बेरेंजर यांच्या भाषेविषयीच्या प्रयोगाने. मॉरिशसचा सांस्कृतिक राष्ट्रवाद जागा करण्याचे हेतूने तेथील Creole भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची मागणी बेरेंजर (Paul Bérenger) यांचा गट करु लागला. भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावरून काय संघर्ष होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे किंबहुना भारताने ते अनुभवले सुद्धा आहे. बेरेंजर यांच्या या मागणीने तेथे संघर्ष पेटला.

Operation Lal Dora in Marathi, रॉ च्या गोष्टी, ऑपरेशन लाल दोरा, रॉ चे ऑपरेशन, Operation Red Thread, raw stories, raw missions, RAW कथा, RAW गुप्तहेर, red line in mauritius, Indias Aborted Military Intervention in Mauritius, Anerood Jugnauth, Indira gandhi, Paul Berenger, Nowsher F Suntook

एकीकडे जगन्नाथ यांच्या वर्चस्वाने देशात हिंदूचे सांस्कृतिक वर्चस्व निर्माण होईल अशी भीती बिगर हिंदू नेत्यांना वाटत होती. तर दुसरीकडे बेरेंजर यांच्या धोरणांमुळे देशात पुन्हा एकदा ग्रँड ब्लॅक्सचे वर्चस्व निर्माण होईल अशी चिंता हिंदू नेत्यांना सतावत होती. या सर्व परिस्थितीमुळे मॉरिशियसवर राजकीय अस्थिरतेचे ढग दाटून आले.

जगन्नाथ यांच्या पाठीमागे बेरेंजर यांनी उचललेले पाऊल

१९८३ साली अलिप्ततावादी देशांच्या शिखर परिषदेसाठी जगन्नाथ (Anerood Jugnauth) भारतात आले होते. ७ ते १२ मार्च हा परिषदेचा कालावधी असल्याने ते भारतातच मुक्कामी राहिले. त्यांच्या याच अनुपस्थितीचा फायदा घेत १२ मार्च या मॉरिशसचा स्वातंत्र्यदिनी बेरेंजर यांनी क्रेओल भाषेला नवी राष्ट्रभाषा म्हणून जाहीर करून टाकले. एवढंच नाही तर टीव्हीवरून मॉरिशसचे राष्ट्रगीत क्रेओल भाषेत वाजवण्याचेही आदेश दिले. हा सारा प्रकार कळताच जगन्नाथ यांनी इंदिरा गांधींकडे मदत मागितली.

शिखर परिषदेवरून जगन्नाथ मायदेशी परतताच बेरेंजर यांनी त्यांच्यासमोर घटनाबदलचा प्रस्ताव ठेवला. या घटनाबदलाने पंतप्रधानाचे बरेचसे अधिकार कमी होणार असल्याने जगन्नाथ यांनी त्यास नकार दिला. परिणामी पक्ष फुटला. जगन्नाथ यांच्यासोबत मोजकेच हिंदू नेते आणि कार्यकर्ते राहिले. तर दुसरीकडे बेरेंजर यांच्या कार्यकर्त्यांनी देशात हिंसाचार सुरू केला.

इंदिरा गांधी आणि रॉ ने आखलेले ‘Operation Lal Dora’

इंदिरा सरकार या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. जगन्नाथ यांना हटवून बेरेंजर सत्तेवर आल्यास हिंदूचे जगणे मुश्किल होईल. बेरेंजर यांचे सरकार क्रेओल आणि मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या बाजूने उभे राहील. पर्यायी हिंदूंकडे तेथून पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही. तेव्हा या हिंदूंच्या मागे आपण ठामपणे उभे राहिलेच पाहिजे ही Indira Gandhi यांची भूमिका होती.

याला एक दुसरा पदर असाही होता की बेरेंजर सत्तेवर आल्यास हिंदी महासागरातील भारताच्या प्रभावाखालील हा मित्रदेश दूर जाईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही बेरेंजर यांचे सत्तेवर येणे भारतासाठी अनुकूल नव्हते. अशातच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तेथील संघर्ष अधिकच तीव्र झाला. कधीही बंड होईल अशी शक्यता निर्माण झाली.

अलिप्ततावादी परिषदेला भारतात येण्यापूर्वी जगन्नाथ यांना बेरेंजर लष्कराच्या साहाय्याने बंड करणार असल्याची आणि लीबिया व सोव्हिएत रशिया त्यांना मदत करणार असल्याची कुणकुण लागली होती व ती त्यांनी इंदिरा गांधीच्या कानावर घालूनही ठेवली होती.

Operation Lal Dora in Marathi, रॉ च्या गोष्टी, ऑपरेशन लाल दोरा, रॉ चे ऑपरेशन, Operation Red Thread, raw stories, raw missions, RAW कथा, RAW गुप्तहेर, red line in mauritius, Indias Aborted Military Intervention in Mauritius, Anerood Jugnauth, Indira gandhi, Paul Berenger, Nowsher F Suntook
Anerood Jugnauth, Indira gandhi

त्यामुळे अशी काही परिस्थिती मॉरिशस मध्ये निर्माण झाल्यास तातडीने हस्तक्षेप करता यावा यासाठी इंदिरा गांधींनी भारतीय लष्कराला आणि नौदलाला तयार राहण्याचे आदेश दिले. या मोहिमेला हिंदू प्रतिकात्मकता असलेले नाव दिले ते म्हणजे ‘ऑपरेशन लाल दोरा’ (Operation Lal Dora).

RAW प्रमुख संतूक मॉरिशसला रवाना आणि त्यांनी तिथे केलेले काम

मुंबईत भारतीय सैन्याची तयारी सुरू होती. Indira Gandhi यांच्या अंतिम आदेशाची ते वाट पाहत होते. मात्र इंदिरा गांधी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या रामनाथ काव यांनी एक वेगळीच चाल खेळली. रॉ प्रमुख संतूक (Naushervan Framji Suntook) यांना अतिशय गोपनीयतेने मॉरिशसला पाठवण्यात आले.

तोवर भारतीय सेना मॉरिशसला घेरण्यासाठी येत आहे अशी बातमी बंडाच्या तयारीत असलेल्या नेत्यांपर्यंत अलगद पोहचवण्यात आली. या बातमीनेच त्यांच्या बंडाची अर्धी हवा निघाली.

मॉरिशसला पोहचताच संतूक कामाला लागले. हरीश बुधू हे तेथील हिंदूंचे एक बडे नेते होते. त्यांच्यासह इतर हिंदू मुस्लीम नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास संतूक यांनी सुरवात केली. साम-दाम-दंड-भेद या साऱ्यांचा वापर करत संतूक यांनी हिंदू मुस्लीम नेत्यांची फळी जगन्नाथ यांच्यापाठी उभी केली. ‘पार्टी सोशलिस्टे मॉरिशियन’ या हरीश बुधूंच्या पक्षासह एक नवी हिंदू आघाडी तयार करवून संतूक १२ एप्रिलला भारतात परतले.

शेवटी जगन्नाथ पुन्हा सत्तेवर

त्याच दिवशी जगन्नाथ यांनी मिलीटंट सोशलिस्ट मुव्हमेंट नावाचा आपला नवा पक्षा काढला व बुधू यांचा पक्ष या नव्या पक्षात विलीन झाला. संसदेत काही विरोधी गटांशी हातमिळवणी करत जगन्नाथ यांनी बहुमत प्राप्त केले. एवढंच नाही तर १९८३ ची ऑगस्ट महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकही त्यांनी जिंकली.

Operation Lal Dora in Marathi, रॉ च्या गोष्टी, ऑपरेशन लाल दोरा, रॉ चे ऑपरेशन, Operation Red Thread, raw stories, raw missions, RAW कथा, RAW गुप्तहेर, red line in mauritius, Indias Aborted Military Intervention in Mauritius, Anerood Jugnauth, Indira gandhi, Paul Berenger, Nowsher F Suntook

अशाप्रकारे रॉ च्या साहाय्याने इंदिरा गांधींनी जगन्नाथ यांचा राजकीय पटलावर अस्त न होवून देता मॉरिशस मधील हिंदूंचे रक्षण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.