Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा रिटारमेंटच्या दिवशीच RAW चे प्रमुख गायब होतात!

एखाद्याला गायब करणे,प्रकट करणे हा गुप्तचर संस्थांच्या डाव्या हाताचा खेळ. मात्र जेव्हा संस्थेचा प्रमुखच गायब होतो तेव्हा ?

एखाद्याला अचानक गायब करणे किंवा एकाएकी प्रकट करणे हा गुप्तचर संस्थांच्या डाव्या हाताचा खेळ. मात्र जेव्हा गुप्तचर संस्थेचा प्रमुखच गायब होतो तेव्हा ? एकायला विचित्र वाटत असेल ना ? पण असं झालंय, ते ही आपल्या भारतात !

१० एप्रिल १९८३ ची मुंबईतली ती सकाळ पूर्णतः वेगळी होती. एका नावाजलेल्या इंग्रजी वृत्तपत्रात ‘फ्रंट पेजवर’ छापून आणलेल्या बातमीने सारेच चाट पडले.

त्या बातमीचं शीर्षक होतं ‘India’s Top Spy Missing’ (भारताचा वरिष्ठ गुप्तहेर बेपत्ता)

अशीच एक बातमी एक दिवस आधी म्हणजे ९ एप्रिलला कोलकात्यातील एका प्रतिष्ठित दैनिकात पहिल्या पानावर छापून आली होती.

रॉ च्या गोष्टी, भारताची गुप्तचर संस्था रॉ चे मिशन, रॉ चे ऑपरेशन, ऑपरेशन लाल दोरा, रॉ चे प्रमुख संतुक बेपत्ता, एन एफ संतुक, नौशेरवान फ्रामजी संतुक, raw operations, operation lal dora in marathi, raw chief suntook missing, indira gandhi, RAW Chief Naushervan Framji Suntook, Operation Red Thread, raw stories, raw missions, RAW कथा, RAW गुप्तहेर
RAW Chief Naushervan Framji Suntook reported missing

‘आपल्या निवृत्तीच्या आदल्या दिवशी संतूक गूढरीत्या बेपत्ता, सरकारला न कळवताच गेले देशाबाहेर’ अशा आशयाची ही बातमी होती. या बातमीने गल्लीपासून दिल्ली हादरली. दिल्लीचा साऊथ ब्लॉक, संसद, गुप्तचर संस्थाची कार्यालयं, लष्करी मुख्यालयामध्ये एकच वादळ उठले. अशातच देशाच्या आर्थिक राजधानीत ही बातमी येऊन धडकल्याने राजकीय वादळ घोंगवले नसते तर नवलच.

कोण होते ‘रॉ’ चे प्रमुख एन. एफ. संतूक ? (Who was RAW Chief Naushervan Framji Suntook ?)

Research and Analysis Wing (R&AW) चे प्रमुख आणि मास्टर स्पाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन. एफ. संतूक (Naushervan Framji Suntook) यांच्या कारकिर्दीची सुरवात भारतीय नौदलात ‘इमरर्जन्सी कमीशंड ऑफिसर’ म्हणून झाली, नंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. नेहरूंनी अंदमान निकोबार आणि ईशान्य भारताच्या प्रशासनासाठी ‘भारतीय सीमावर्ती प्रशासकीय सेवे’ची स्थापन केली होती. पुढे संतूक यामध्येही सामील झाले. अंदमान निकोबारच्या जारवा आदिवासींमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दाद आजही दिली जाते.

त्यांच्या या आणि अशा अनेक उल्लेखनीय कामांमुळे ते रामेश्वर नाथ काव यांच्या नजरेत भरले. रॉ ची स्थापना झाल्यानंतर काही दिवसातच काव यांनी संतूक यांना बोलावणं धाडत त्यांच्यावर रॉ च्या प्रशासनाची तसेच आफ्रिका विभागाची जबाबदारी सोपवली. RAW मध्ये सक्रिय झाल्यावर संतूक यांनी आपल्या कामाची झलक तेथेही दाखवायला सुरवात केली.

पाकिस्तानमध्ये भुट्टो यांना फाशी दिल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा घेत संतूक यांनी पाकिस्तानमध्ये रॉ ची गुप्त कारवाया करण्याची क्षमता वाढवली. एवढंच नाही तर ‘रॉ’च्या तांत्रिक हेरगिरीच्या क्षमेततही चांगलीच वाढ केली. त्यांच्या याच कार्यामुळे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर बारकाईने लक्ष ठेवण्याची क्षमता वाढवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. ते आफ्रिका तज्ञ म्हणूनही ओळखले जायचे.

संतुक खरंच फितूर झालेले का ?

रॉ मधील आपल्या या उज्ज्वल कामगिरीनंतर हा पारशी जंटलमन निवृत्तीच्या वेळी अचानक गायब झाल्याने चर्चांना मोठं उधाण आलं. त्यांच्या गायब होण्याच्या बातम्यांमधून ते अमेरिकेला गेल्याचे सांगण्यात येत होते. अर्थ स्पष्ट होता की ते CIA ला फितूर झाले असावेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात होता.

पुढे हे प्रकरण अधिकच तापलं. इंदिरा सरकार यामुळे चांगलंच अडचणीत आलं. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लावून धरला. केंद्रीय गृहमंत्री पी. सी. सेठी सांगत होते की संतूक हे अधिकृत कामासाठी परदेशी गेले आहेत. मात्र या उत्तराने विरोधकांच समाधान काही होत नव्हतं. टोकाचे आरोप आणि टीका सुरू झाल्या. संसदेत नुसता गदारोळ मात्र तरीही इंदिरा सरकार त्यांचा ठावठिकाणा सांगू शकत नव्हत्या.

रॉ च्या गोष्टी, भारताची गुप्तचर संस्था रॉ चे मिशन, रॉ चे ऑपरेशन, ऑपरेशन लाल दोरा, रॉ चे प्रमुख संतुक बेपत्ता, एन एफ संतुक, नौशेरवान फ्रामजी संतुक, raw operations, operation lal dora in marathi, raw chief suntook missing, indira gandhi, RAW Chief Naushervan Framji Suntook, Operation Red Thread, raw stories, raw missions, RAW कथा, RAW गुप्तहेर
Operation Lal dora in marathi

अशातच १२ एप्रिलला म्हणजे गायब झाल्यापासून दोनच दिवसांनी संतूक भारतात परतले. त्यांच्यामागे झालेला हा प्रकार त्यांना समजला. आपल्याला फितूर, गद्दार अशी विशेषण लावली गेल्याचे कळल्यावर त्यांना तीव्र दुःख झाले. मात्र एक गोष्ट इथे ध्यानात घेण्यासारखी आहे. संसदेत एवढा गदारोळ सुरू असताना, टोकाच्या टीकेला तोंड द्यावे लागत असतानाही इंदिरा गांधी का सांगत नव्हत्या की RAW Chief Suntook कुठे आहेत म्हणून ? अशी काय गरज येऊन ठेपली होती की रिटायरमेंटच्या दिवशी संतूक यांना परदेशी पाठवावे लागले ? संतूक अशा कोणत्या अधिकृत कामासाठी परदेशी गेले होते ?

इंदिरा गांधी सरकार हे सर्व यासाठी सांगू शकत नव्हते कारण हा भाग होता ‘ऑपरेशन लालदोरा’चा.

एक असे ऑपरेशन ज्यामुळे मॉरिशयस मधील सरकार वाचणार होते. एवढंच नाही तर हिंदूंचे रक्षण होवून त्यांचे राजकीय प्रभुत्वही अबाधित राहणार होते. काय होते ‘Operation Lal Dora’, हिंदूंच्या रक्षणासाठी इंदिरा गांधींनी कशी सूत्र हलवली? संतूक यांनी मॉरिशियस मध्ये जाऊन कसे डावपेच आखले ? हे जाणून घेण्यासाठी Operation Lal Dora : मॉरिशस मध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी RAW ने चालवलेलं एक सिक्रेट मिशन हा लेख नक्की वाचा !

Leave A Reply

Your email address will not be published.