Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

खतरों के खिलाड़ी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधींचा मृत्यू कसा झाला ?

संजय गांधी (Sanjay Gandhi)यांचं व्यक्तिमत्त्व देखील त्यांच्या राजकारणासारखंच रोखठोक होतं, त्यांनी कधीही धोक्यांचा विचार करून आपले निर्णय बदलले नाही किंवा जगण्याची शैली बदलली नाही

मृत्यू हा प्रत्येकाच्या प्रवासाचा शाश्वत शेवट आहे. परंतु काही व्यक्ती त्यांच्या मृत्युनंतर देखील नेहमीच आठवणीत राहतात कारण त्यांनी आपल्या आयुष्यात असे काही निर्णय घेतलेले असतात ज्यामुळे त्यांच्या मृत्युची चर्चा अनेक वर्ष होत राहते. भारतीय राजकारणात देखील अशी एक व्यक्ती आहे तिच्या मृत्यूबद्दल आजही चर्चा होत राहते ती व्यक्ती म्हणजे संजय गांधी. संजय गांधी यांनी भारताच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यू बद्दल आजही सर्वसामान्यांमध्ये चर्चा होताना दिसून येते….

माजी पंतप्रधान आणि भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींचे सुपुत्र म्हणून संजय गांधी (Sanjay Gandhi) यांच्याकडे आपसूकच राजकीय जबाबदारी येऊन पडली, त्यातही संजय गांधी यांचे मोठे बंधू राजीव गांधी यांना राजकारणात स्वारस्य नव्हतं. राजीव गांधी Indian Airlines मध्ये पायलट म्हणून कार्यरत होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या नंतर सर्व राजकीय जबाबदारी संजय गांधी यांना स्वीकारावी लागली. संजय गांधी तसे राजकारणातील एक मुरब्बी नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होते. काँग्रेस जेव्हा कमकुवत होती अशा काळात त्यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद दाखवत काँग्रेसला अनेक राज्यांमध्ये परत सत्ता मिळवून देण्यासाठी मोठं काम केलेलं दिसून येतं.

Sanjay Gandhi

आणीबाणी नंतर Indira Gandhi ना परत सत्तेत आणण्यामागे Sanjay Gandhi यांचा मोठा वाटा

संजय गांधी यांच्या राजकारणाबद्दल जर कोणी जाणून घेतलं तर त्यांच्या लक्षात येईल संजय गांधी हे रोखठोक निर्णय घेणारे राजकारणी होते. त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तरुण नेत्यांना संधी दिली, तरुणांना दिलेल्या या संधीमुळे संजय गांधी खूप कमी कालावधीमध्ये काँग्रेस पक्षात सर्वात शक्तिशाली नेते झाले. त्यांनी अनेक राज्यात तरुण मुख्यमंत्र्यांना काम करण्याची संधी प्राप्त करून दिली.

आणीबाणी नंतर 1980 ला Indira Gandhi परत सत्तेत आल्या. असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी परत सत्तेत आल्या याचं संपूर्ण श्रेय संजय गांधी यांच्या नियोजनाला जाते.

सत्तेत आल्यानंतर लगेचच ज्या ९ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेली होती तिथली विधानसभा केंद्र सरकारने बरखास्त केली आणि परत निवडणुका जाहीर करण्यात आल्या. या राज्यात झालेल्या निवडणुकांपैकी आठ राज्यातील सत्ता काँग्रेसने परत हस्तगत केली आणि याचे संपूर्ण श्रेय संजय गांधी यांच्या नेतृत्वाला जाते. संजय गांधी अमेठी या जिल्ह्यातून आधीच खासदार म्हणून नियुक्त झाले होते पण या विजयानंतर इंदिरा गांधी यांनी संजय गांधींना काँग्रेसचे महासचिवपद सुद्धा बहाल केलं. 1977 मध्ये जेव्हा संजय गांधी अमेठी मतदारसंघातून खासदारकीसाठी इलेक्शन लढले होते तेव्हा त्यांना जनता पार्टीच्या विरेंद्र सिंग यांनी तब्बल 56 हजार मतांनी पराभूत केलं होतं.

खतरों के खिलाड़ी

संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचं व्यक्तिमत्त्व देखील त्यांच्या राजकारणासारखंच रोखठोक होतं, त्यांनी कधीही धोक्यांचा विचार करून आपले निर्णय बदलले नाही किंवा जगण्याची शैली बदलली नाही. संजय गांधी यांच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याबद्दल अनेक किस्से आहेत, असं म्हटलं जातं की ते एवढ्या वेगात कट मारत की एखादा तरुण सुद्धा त्यांच्यासमोर लाजेल. संजय गांधी यांना विमान उडवायची देखील प्रचंड हौस होती आणि विमान चालवताना देखील ते अशाच प्रकारे कलाबाजी सादर करायचं प्रयत्न करत असत म्हणूनच लोक त्यांना ‘खतरोके खिलाडी’ म्हणत असत.

संजय गांधी यांच्या विमान चालवण्याविषयी देखील अनेक किस्से आहेत. एकदा इंदिरा गांधी यांचे जुने सहकारी आणि त्या काळातील सुप्रसिद्ध संत धीरेंद्र ब्रह्मचारी कश्मीर वरून दिल्ली एअरपोर्टवर परतले असताना संजय गांधी आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांची भेट झाली. त्यावेळी संजय गांधी त्यांना म्हणाले, “चला स्वामीजी परत एकदा संजय गांधी स्टाइल तुम्हाला विमानाची सफर घडवून आणतो”, त्यावर स्वामीजी म्हणाले,

“मी तुमच्या विमान प्रवासाचे अनेक किस्से ऐकलेले आहेत, त्यामुळे मला माफ करा मी तुमच्या सोबत विमान प्रवास करायला येऊ शकत नाही.”

Sanjay Gandhi

त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 जून 1980 ला संजय गांधी यांनी इंदिरा गांधी यांचे दुसरे सहकारी आर के धवन यांना घेऊन दिल्ली फ्लाइट क्लबमधील एका विमानाची सैर करायला घेऊन गेले. हवेमध्ये काही मिनिटं व्यतीत केल्यानंतर जेव्हा आर. के. धवन सायंकाळी इंदिरा गांधी यांना भेटले तेव्हा त्यांना म्हणाले, “मॅडम प्राईम मिनिस्टर मी यापुढे कधीच संजय गांधींसोबत विमान प्रवास करणार नाही.”

इंदिरा गांधींसाठी हे शब्द नवीन नव्हते अनेक अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी याआधी देखील इंदिरा गांधी यांना हे सांगितलं होतं, परंतु इंदिरा गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना या दुर्लक्ष करण्याचा नक्कीच पश्चात्ताप झाला असेल.

संजय गांधींचा मृत्यू (Sanjay Gandhi’s Death)

दुसर्‍या दिवशी सोमवारी 23 जून 1980 रोजी Sanjay Gandhi नेहमीप्रमाणे तयार होऊन कार स्वतः चालवत सफदरजंग एअरपोर्टवर पोहोचले कारण त्यांना Delhi Flying Club चे एक नवीन विमान उडवायची संधी मिळणार होती. त्यामुळे ते प्रचंड खूश होते. S-2A Pitts हे लाल रंगाचे विमान त्याकाळी हवेमध्ये कलाबाजी करण्यासाठी प्रसिद्ध होतं आणि आज आपण तेच विमान उडणार म्हणून संजय गांधी देखील उत्सुक होते. त्यांना हवेमध्ये कलाबाजी करणे प्रचंड आवडत असे. यावेळी संजय गांधी यांच्या सोबत सुभाष सक्सेना (Subhash Saxena) होते, जे दिल्ली फ्लाईंग क्लबचे मुख्य इन्स्ट्रक्टर होते.

काहीच वेळात एअरपोर्टवरून हे विमान आकाशात उंचावल. त्यानंतर या विमानाने काहीवेळ अशोका हॉटेलवर कलाबाजी दाखवली पण थोड्याच वेळात संजय गांधी यांचं विमानावरील नियंत्रन गेलं आणि काही क्षणांतच विमानाने काम करायचे बंद केले. त्यामुळे काहीच वेळात आवाज करत विमान जमिनीवर कोसळले. या विमान अपघातातच सुभाष सक्सेना आणि संजय गांधी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली.

काही वर्षांपासून संजय गांधी काँग्रेसच्या अनेक आघाड्यांवर काम करत होते. इंदिरा गांधी आता फक्त आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष देत असत. जिंकलेल्या आठही राज्यांचे मुख्यमंत्री देखील संजय गांधी यांनीच निवडले होते. संजय गांधी यांच्या या दुर्दैवी निधनाने काँग्रेस हतबल झाली होती कारण राजीव गांधी यांना राजकारणात काहीही स्वारस्य नव्हतं. संजय गांधी यांचा मृत्यू झाला तेव्हा देखील राजीव गांधी इटलीमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवत होते. त्यामुळेच संजय गांधी यांच्यावर दोन दिवसांनंतर अंतिम संस्कार करण्यात आला.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.