Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

…. तर काजोलचं नाव ‘मर्सिडीज देवगण’ असतं

चित्रपट सुरु होतो आणि कलाकारांची नावे येतात, हिरोचे नाव येते ‘शाहरुख खान’ आणि हिरोईनचे नाव येते ‘मर्सिडीज’, चकित झालात ना ?

विचार करा तुम्ही ९० च्या शतकात आहात आणि सुपरहिट फिल्म “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” ही फिल्म थिएटर मध्ये बघत बसला आहात. चित्रपट सुरु होतो आणि कलाकारांची नावे येतात, हिरोचे नाव येते ‘शाहरुख खान’ आणि हिरोईनचे नाव येते ‘मर्सिडीज’. चकित झालात ना ? कारण ह्या दोन्ही सिनेमांची आणि अशा अनेक सिनेमांची मुख्य नायिका तर काजल आहे. मग ही मर्सिडीज कोण ? तर ही मर्सिडीज दुसरी तिसरी कुणी नसुन स्वतः काजोलच आहे.

हो, जर तिचे नाव काजल नसते तर आपल्याला ह्या सिनेमाच्या कलाकारांच्या नावात मर्सिडीज हेच नाव दिसले असते आणि हिंदी सिनेमातल्या लोकप्रिय जोड्यांपैकी शाहरुख-मर्सिडीज ही एक जोडी असती.

पण “थॅंक गॉड असे झाले नाही” असे स्वतः काजललाच वाटते. काजलचे वडील आणि बंगाली चित्रपट दिग्दर्शक शामो मुखर्जी हे कारचे चाहते होते. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या कार होत्या. काजलला देखिल आपल्या वडीलांप्रमाणे कारचे वेड आहेच. त्यांच्या सर्वांची आवडती कार म्हणजे मर्सिडीज. तिच्या कुटुंबाच्या आणि खासकरून वडीलांच्या कारप्रेमाबद्दल तिने करण थापरच्या “Face to Face” ह्या कार्यक्रमात सविस्तर सांगितले.

करण थापरने तिच्या वडीलांच्या कारप्रेमाविषयी विचारले असता काजल म्हणाली “हो माझ्या वडिलांना कार फार आवडायच्या, मर्सिडीजवर त्यांच विशेष प्रेम होते, इतकं की एकदा त्यांनी आम्हाला सांगितले की माझे नाव ते मर्सिडीज ठेवणार होते आणि मी म्हणाले, कम ऑन डॅड, तुम्ही माझं नाव मर्सिडीज कस काय ठेवु शकता ? म्हणजे तुम्ही घरात मला आवाज दिला असता ड्रायव्हर कार घेऊन हजर खाला असता. पण ते म्हणाले नाही मी सिरीअसली हेच नाव ठेवणार होतो. मी म्हणाले थॅंक गॉड असे झाले नाही” आणि असे झाले असते तर ‘Mercedes Devgn’ हेच नाव हिंदी सिनेमात प्रचलित असते.

पण इथे तुमच्या माहितीसाठी सांगतो की याआधी एका माणसाने आपल्या मुलीचे नाव मर्सिडीज ठेवले होते. त्या माणसाचे नाव आहे इमिल जेलिनेक. हा ऑस्ट्रियन कार विक्रेता होता. त्याला रेसिंगचे वेड होते आणि त्याने DMG Automobile सोबत रेसिंगचा करारही केला होता. डीएमजी सोबतच्या करारात त्याने स्वतःसाठी स्पेशन इंजिन असलेल्या कार बनवून घेतल्या. त्या इंजिनच्या कारला त्याने आपल्या मुलीचे म्हणजे मर्सिडीज जेलिनेक हे नाव दिले.

Kajol, Shomu Mukherjee, Mercedes, Kajol name story, Emil Jellinek, Mercedes Devgn, मर्सिडीज, काजोल, काजोलच्या नावामागची कहाणी
Emil Jellinek with his daughter Mercedes

म्हणजे एका मुलीच्या नावावरून त्या इंजिनला नाव देण्यात आले. नंतर त्या कारच्या मागणीत वाढ झाली म्हणून त्या कारचेच नाव मर्सिडीज असे ठेवले गेले आणि आपल्याकडे मर्सिडीज नावाची काजल ही पहीलीच मुलगी ठरली असती आणि त्या नावानंतर तिच्या ज्या चाहत्यांनी स्व्तःच्या मुलींचे नाव आता काजल ठेवले आहे त्यांचेही नाव मर्सिडीज असते. आहे ना गमतीशीर ?


बॉलिवूड मधील फेमस डायरेक्टर एका सिनेमासाठी किती पैसे घेतात ?

Leave A Reply

Your email address will not be published.