Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भाजपचे राम-लक्ष्मण म्हणजेच अडवाणी-वाजपेयी यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली ?

विचारांमध्ये मतभेद असतानाही अडवाणी-वाजपेयी ६५ वर्ष एकत्र राहिले, म्हणून आजही ही राम लक्ष्मणाची जोडी सर्वांच्याच लक्षात आहे

आयुष्य असो वा राजकारण, दोन्हीही ठिकाणी जोडीदार फार महत्वाचा. कारण तो जोडीदारंच असतो, जो आपल्या चढउताराच्या काळात आपली साथ देतो. तो जोडीदारच असतो, जो संकटसमयी पळून न जाता आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहतो. तो जोडीदारचं असतो, जो आपल्या सुखासह दुःखातही भागीदार होतो. त्यामुळे जोडीदाराचं आपल्या आयुष्यातील स्थान अनन्यसाधारण आहे.

आजवरचा राजकीय इतिहास पाहिला, तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंढे, नरेंद्र मोदी व अमित शहा यांसारख्या कित्येक जोड्या आपल्याला अशा सापडतील, ज्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चिले जातात.

अशीच एक जोडी आजही संपूर्ण देशाच्या स्मरणात आहे, ज्यांनी अनेक मतभेद असतानाही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. आणि ती जोडी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी.

Lal Krishna Advani, Bharatiya Janata Party, lal krishna advani age, atal bihari vajpayee, Lal Krishna Advani kisse, lk advani in marathi, advani vajpayee friendship, bjp, rss, atal bihari vajpayee in marathi, Lal Krishna Advani story, Lal Krishna Advani biography, Lal Krishna Advani information in marathi, Ram Laxman of bjp, भाजपचे राम लक्ष्मण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मैत्रीचे किस्से, भाजपा, आरएसएस, लालकृष्ण अडवाणी माहिती, political kisse, राजकीय किस्से
Atal Bihari Vajpayee, Lal Krishna Advani

जेव्हा जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित एखाद्या प्रसंगाचा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांचं नाव आल्यावाचून राहत नाही. दोघांपैकी कोणाचही नाव घेतलं, तरी दुसऱ्याचा उल्लेख झाल्याशिवाय ती गोष्टच पूर्ण होत नाही, एवढी घट्ट मैत्री या दोघांची होती.

हे दोघे भेटले कसे ? विचारांमध्ये मतभेद असतानाही त्यांची मैत्री टिकली कशी ? का त्या दोघांना राम लक्ष्मणाची जोडी म्हंटले जायचे ? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायची असतील. मग चला तर…जराही विलंब न करता त्यांच्या या घट्ट मैत्रीचा उलगडा करुया.

लालकृष्ण अडवाणींचा पाकिस्तानातील कराचीत जन्म

लालकृष्ण अडवाणींचा जन्म फाळणी आधीच्या भारतात कराची येथे ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. त्यावेळी आजचे पाकिस्तानातील कराची भारतात होते. लालकृष्ण आडवाणींचे सिंधीतील नाव म्हणजे लाल किशनचंद आडवाणी.

कराचीतील सेंटर पॅट्रिक्स हायस्कुल आणि सिंधमधील डीजी नॅशनल कॉलेजमधून शिक्षण घेणाऱ्या आडवाणी यांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजातून डिग्री संपादित केली.

लालकृष्ण अडवाणींना १९४७ मध्ये कराचीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव बनवण्यात आले. १९५१ मध्ये जेव्हा शामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली, तेव्हा आडवाणींना त्याचे सदस्यत्व स्वीकारत जनसंघासाठी काम करण्यास सुरवात केली.

जनसंघात विविध पदं भूषवताना आडवाणींनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवत उत्तम कामगिरी केली आणि त्यांच्या याच कार्याचे फळ म्हणून १९७२ साली जनसंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

अशी झाली अडवाणी – वाजपेयी यांची पहिली भेट

एकदा अटलजी १९५२ साली जनसंघाचे संस्थापक शामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत राजस्थानातील कोटाहून ट्रेनने जात होते. त्यावेळी आडवाणी संघाचे प्रचारक होते. ट्रेनमध्येच दोघांची पहिली भेट झाली.

शामा प्रसाद मुखर्जी यांनी वाजपेयी आणि आडवाणींची ओळख करुन दिली. त्यानंतर जवळपास ६५ वर्षे दोघांनी एकत्रित काम केले आणि काळानुरूप त्यांची मैत्री अधिकच बहरत गेली.

लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयी यांनी मिळून जनसंघाला मजबूत केले. दोघांची प्रतिमा ही हिंदुत्ववादीच होती. पण त्यांचे विचार एकमेकांशी जुळणारे नव्हते. असे असले तरी दोघांमध्ये मनभेद मात्र कधीच झाले नाहीत.

Lal Krishna Advani, Bharatiya Janata Party, lal krishna advani age, atal bihari vajpayee, Lal Krishna Advani kisse, lk advani in marathi, advani vajpayee friendship, bjp, rss, atal bihari vajpayee in marathi, Lal Krishna Advani story, Lal Krishna Advani biography, Lal Krishna Advani information in marathi, Ram Laxman of bjp, भाजपचे राम लक्ष्मण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मैत्रीचे किस्से, भाजपा, आरएसएस, लालकृष्ण अडवाणी माहिती, political kisse, राजकीय किस्से, अडवाणी-वाजपेयी

अटलजी अधिकतर निर्णय अडवाणींचा सल्ला घेऊनच घ्यायचे. आणीबाणीच्या वेळीही दोन्ही नेते एकत्रित जेलमध्ये होते. दोघांनी एकत्रच १९७७ साली जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक देखील लढली.

जनता दल सरकारमध्ये वाजपेयी परदेश मंत्री झाले तर अडवाणींनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. दोघांनी जनता पार्टी सोडल्यावर भारतीय जनता पक्षाचे गठन केले आणि अटलजी भाजपचे पहिले अध्यक्ष झाले.

विचारांमध्ये मतभेद असूनही अडवाणी-वाजपेयी जोडीत कधीच पडली नाही फूट

आडवाणी आणि वाजपेयी दोघेही अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा पुरस्कार करणारे होते. मात्र अटलजी कट्टर हिंदुत्वाच्या राजकारणाला योग्य मानायचे नाही. अशातच ८० दशक असे होते, जेव्हा आडवाणींचे भाजपमधील स्थान हळूहळू अटलजींहून मोठे झाले. मात्र तरीही दोघांमध्ये मनभेद कधीच झाले नाहीत.

१९९२ चे बाबरी प्रकरण अटलजींना खटकले होते. हा तो काळ होता, जेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींमधील संबंध काहीसे ताणले गेले होते.

मात्र १९९५ पर्यंत दोघांची मैत्री पुन्हा एकदा घट्ट झाली. एवढंच नाही तर मुंबईतील भाजप अधिवेशनात लालकृष्ण अडवाणींनी ही घोषणादेखील करुन टाकली की, १९९६ च्या निवडणुकांमध्ये भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा अटल बिहारी वाजपेयी असतील.

लालकृष्ण आडवाणी नेहमीच अटलजींची स्तुती करायचे. ते अटलजींना अतिशय प्रभावी वक्ता मानायचे. आडवाणी एका मुलाखतीमध्ये इथपर्यंत देखील बोलले होते की, जेव्हा अटलजींना त्यांनी पहिल्यांदा बोलताना पाहिले. तेव्हा त्यांना वाटले की, ते चुकीच्या पक्षात तर नाही आले ना.

२००५ साली लालकृष्ण अडवाणींनी सोडले पक्षाचे अध्यक्षपद

२००४ साली अटलजींनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर आडवाणी भाजपचे सर्वात मोठे आणि प्रमुख नेते झाले. २००५ च्या डिसेंबर महिन्यात मुंबईत आयोजित भाजपच्या सिल्वर जुबली कार्यक्रमात आडवाणींनी पक्षाचे अध्यक्षपद सोडून दिले आणि राजनाथ सिंह यांना भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले.

एकेकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना भाजपचे राम तर लालकृष्ण आडवाणींना लक्ष्मण म्हटले जायचे. २००२ ते २००४ या काळात अडवाणींनी देशाचे उपपंतप्रधान पद भूषवले. आडवाणींना कधी पक्षाचे कर्णधार, कधी लोहपुरुष, तर कधी पक्षाचा खरा चेहरा म्हटले गेले.

मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता एकेकाळी भाजपचे कर्णधार समजले जाणारे आडवाणी आज मात्र भाजपच्या संघात दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नाहीत!


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.