Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

इंडियन आर्मीच्या ह्या ५ अधिकाऱ्यांवर तयार होत आहेत सिनेमे

ह्या अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा वाचून तुमच्या अंगावर शहारे येतील आणि तुमची छाती अभिमानाने भरून येईल

भारतीय सैन्याच्या शौर्यावर याआधी देखील अनेक चित्रपट तयार झालेले आहेत. “बॉर्डर” हा तर अजरामर असा चित्रपट आहे. फक्त भारतीय सैन्यच नव्हे तर भारतीय सैन्यातील बहादुर सैन्य अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या कर्तबगारीवर देखील या चित्रपटांमधून प्रकाश पडलेला आहे. येत्या काळात देखील अशाच काही अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या कर्तबगारीवर बॉलिवूडमध्ये चित्रपट जाहीर झालेले आहेत. आज आम्ही याच चित्रपटांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

भारतीय सेना अधिकाऱ्यांवर बनणारे ५ चित्रपट (5 Films to be made on life of Indian Army Officers)

गुंजन सक्सेना (Gunjan Saxena)

upcoming indian army movies, upcoming patriotic movies bollywood, war films, Gunjan Saxena The Kargil Girl, Captain Vikram batra Shershah, Field Marshal Sam Manekshaw, Bhuj The Pride of India, Arun Khetarpal, इंडियन आर्मी सिनेमे
Gunjan Saxena: The Kargil Girl, Janhvi Kapoor playing the lead

गुंजन सक्सेना ह्या भारतीय सैन्यात एयरफोर्स पायलट म्हणून जबाबदारी पार पाडत होत्या. कारगिल युद्धादरम्यान गुंजन आणि त्यांच्या साथी श्रीविद्या राजन यांच्यावर जखमी भारतीय सैन्याला परत आणायची जबाबदारी सोपवली गेली होती, यासोबतच कारगिल मधील भारतीय सैनिकांना मेडिकल फॅसिलिटी आणि जेवण देखील त्याच पोहोचवत असत. त्यासोबतच त्या पाकिस्तानच्या वार झोन देखील लक्ष ठेवत असत. युद्धादरम्यान War Zone मध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला पायलट होत्या. त्यांच्या याच शौर्यामुळे त्यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या ह्याच कामगिरीवर येत्या काही दिवसांमध्ये चित्रपट येत आहे. ह्या चित्रपटाचं नाव “गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल” (Gunjan Saxena: The Kargil Girl) असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करीत असून या चित्रपटात मुख्य भूमिका जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), पंकज त्रिपाठी, विनीत कुमार आणि अंगद बेदी यांची असणार आहे.

कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra)

1999 चे कारगील वार हिरो विक्रम बत्रा यांचे नाव आपण नक्कीच ऐकले असेल, त्यांच्या शौर्यावर देखील बॉलिवूड मध्ये चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटाचं नाव “शेरशाह” (Shershah) असं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन करत असून, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), कियारा अडवणी, जावेद जाफरी आणि निकेतन धीर यांच्या मुख्य भूमिका असणारा आहेत.

कारगिल युद्धादरम्यान कॅप्टन विक्रम बत्रा (Capt Vikram Batra) यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं. युद्धा दरम्यान त्यांना दिलेली पहिली कामगिरी त्यांनी चोख बजावली त्यानंतर “ये दिल मांगे मोर” असे म्हणत त्यांनी कमांड पोस्ट करून दुसरी जबाबदारी घेतली ही जबाबदारी पूर्ण करताना एका साथीदाराचा जीव वाचवताना ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तान सैन्यातील सैनिक कॅप्टन विक्रम बत्रा यांना “शेरशाह” या कोड नावाने संबोधत असत. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर सर्वोच्च परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Field Marshal Sam Manekshaw)

upcoming indian army movies, upcoming patriotic movies bollywood, war films, Gunjan Saxena The Kargil Girl, Captain Vikram batra Shershah, Field Marshal Sam Manekshaw, Bhuj The Pride of India, Arun Khetarpal, इंडियन आर्मी सिनेमे
Movie on Field Marshal Sam Manekshaw, Vicky Kaushal playing Sam Manekshaw

भारताच्या स्वातंत्र्य पूर्वी दुसऱ्या महायुद्धात प्रचंड पराक्रम गाजवणाऱ्या या सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. चित्रपटाचे नाव सॅम (Sam) असं घोषित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणारा असून यात विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत असणार आहे. भारताचे पहिले फिल्ड मार्शल अशी त्यांची ओळख आहे.

आईएएफ विंग कमांडर विजय करनिक (Wing Commander Vijay Karnik)

1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातर युद्ध झालं होतं. पाकिस्तानने युद्धादरम्यान प्रचंड बॉम्ब वर्षाव करून ह्या भुज एअरपोर्टचा रणवे (Bhuj Airstrip) उध्वस्त करून टाकला होता. हा रणवे व्यवस्थित असणे भारतीय एअर फोर्ससाठी अत्यंत गरजेची गोष्ट होती, त्यामुळे आपल्या काही मोजक्या सैनिकांच्या मदतीने आणि काही लोकल महिलांच्या सहाय्याने विंग कमांडर विजय कर्णिक (Wing Commander Vijay Karnik) यांनी अवघ्या 72 तासात भुज रणवे व्यवस्थित केलेला होता ज्यामुळे भारतीय सैन्याला वायुसेनेची वेळेत मदत पोहोचू शकली.

या कथेवर तयार होणाऱ्या चित्रपटाचा नाव “भुज द प्राइड ऑफ इंडिया” (Bhuj : The Pride of India) असं जाहीर करण्यात आलेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधिया करणार असून या चित्रपटामध्ये अजय देवगन (Ajay Devgn), संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, प्रणिता सुभाष आणि शरद केळकर यांच्या मुख्य भूमिका असणारा आहेत.

सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल (Second Lieutenant Arun Khetarpal)

upcoming indian army movies, upcoming patriotic movies bollywood, war films, Gunjan Saxena The Kargil Girl, Captain Vikram batra Shershah, Field Marshal Sam Manekshaw, Bhuj The Pride of India, Arun Khetarpal, इंडियन आर्मी सिनेमे
Varun Dhawan as Arun Khetrapal

1971 भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान शंकरगढ येथे भारतीय सैन्याला मदतीची नितांत आवश्यकता होती. अशावेळी आपल्या काही सिनियर्स सोबत केवळ २१ वर्षांचे अरुण खेत्रपाल आपल्या टॅंक रेजिमेंट सोबत रणगाडा घेऊन सैन्याच्या मदतीला गेले. या युद्धादरम्यान भारतीय सैन्याच्या रणगाड्यांच मोठं नुकसान झालं, Arun Khetrapal यांच्या रणगाड्यावर देखील हल्ला झाला. त्यांच्या रणगाड्यांना आग लागलेली असताना देखील त्यांनी त्यातून बाहेर न पडता पाकिस्तानी रणगाड्यांवर हल्ला चालूच ठेवला. त्यांचा पराक्रम येवढा मोठा होता की पाकिस्तानचा फक्त एकच रणगाडा त्या ठिकाणी शिल्लक होता. परंतु दुर्दैवाने अरुण खेत्रपाल यांचा रणगाडा तांत्रिक कारणांमुळे बंद पडला आणि त्या शिल्लक राहिलेल्या एका रणगाड्याने अरुण खेत्रपाल यांना त्यांच्या रणगाड्या सोबत‌ संपवले.

अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर तयार होत असलेल्या चित्रपटात सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका वरून धवन (Varun Dhawan) करत आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करणार आहे. त्या चित्रपटाचं नाव अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

या चित्रपटासोबतच इतरही अनेक चित्रपट भारतीय सैन्याच्या शौर्यावर तयार होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. यामध्ये भारतीय एअर फोर्सचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर देखील चित्रपट येणार असल्याचे बोलले जात आहे.


जगभरात धुमाकूळ घालणारे ’75 हार्ड चॅलेंज’ एकदा करून बघाचं

Leave A Reply

Your email address will not be published.