Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सगळ्या दुकानांमध्ये घड्याळाची वेळ १० वाजून १० मिनिटंच का दाखवली जाते ?

घड्याळ विकत घ्यायला दुकानात गेल्यावर, ते दुकान अगदी जुनाट गल्लीतले असो किंवा ब्रँडेड घड्याळाचे शोरूम असो, दुकानातील प्रत्येक घड्याळाचे काटे आपल्याला सतत १०:१० हीच वेळ दाखवतात. एकदा घडयाळ पसंत केलं की दुकानदार चालू वेळेप्रमाणे घड्याळ लावुन देतो, पण तोपर्यंत सगळीच घड्याळं १० वाजून १० मिनिटे हीच वेळ दाखवतात. आपल्या डोक्यात सहजच हा प्रश्न येतो की, हाच पॅटर्न जगभरात सगळीकडे का दिसतो ?

काय खास आहे ह्या वेळेत, म्हणजे १० वाजून १० मिनिटं ह्या वेळेला असे काय विशेष महत्व आहे ? जाणून घेऊया १०:१० ह्या वेळेच्या बाबतीत असलेले काही खास महत्त्वाचे मुद्दे. लहानपणी कोणालाही हा प्रश्न विचारला की प्रत्येक जण सांगायचा की, १०:१० वाजता ज्या मनुष्याने घड्याळाचा शोध लावला त्याचा मृत्यु झाला होता म्हणून हीच वेळ नवीन घड्याळात दाखवतात. पण आम्ही काढलेल्या माहितीप्रमाणे ही एक अफवा होती असे समजले. मग, आता ह्या बद्दल जाणून घ्यायचं चंगच बांधल्याने आम्हाला खालील खास माहिती मिळाली, ती अशी.

१) हास्य मुद्रा

Timex, Rolex नावाच्या प्रसिद्ध कंपन्या आपल्या घड्याळात ८ वाजून २० मिनिटे ही वेळ दाखवत असत, त्याचे कारण असे होते की त्यामुळे घड्याळावरील निर्मिती कंपनीचे नाव स्पष्ट दिसायचे. पण एक सर्वेक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात आले की घड्याळात ८ वाजून २० मिनिटे अशी वेळ दिसली कि एखाद्या रडकुंडीला आलेल्या चेहऱ्याकडे पाहत असल्याचा आभास होऊ शकतो आणि त्याचा परिणाम ग्राहकाच्या मनावर होतो. रडका चेहेरा बदलून हसरा चेहरा आणि त्यात सुध्दा कंपनीचे नाव स्पष्ट दिसायला हवे. ह्या दोन्ही महत्वाच्या अटींची पूर्तता करणारी वेळ म्हणजे १० वाजून १० मिनिटे. जेव्हा घड्याळाच्या काट्यात १०:१० असतात तेव्हा हास्य मुद्रा बनते.

clock time 10 10 meaning, facts about 10 10, why do watch pictures always show 10 10, 10 10 time history in marathi, why clock shows 10 10, १० वाजून १० मिनिटे

२) विजयाचे प्रतीक

जेव्हा आपण घड्याळात १०:१० हि वेळ बघतो तेंव्हा घड्याळातील दोन काट्यांमुळे तयार होणारी आकृती म्हणजे इंग्रजी अक्षर ‘V’. V चा आकार म्हणजे विजयी चिन्ह. हाताच्या दोन बोटांनी आपण V बनवतो. V चा अर्थ Victory म्हणजेच विजय. असे सकारात्मक V चिन्हं बनते ते फक्त १० वाजून १० मिनिटे हि वेळ घड्याळात दाखविल्याने, म्हणून ह्या वेळेची निवड केली गेली, असेही कयास बरेच लोक लावतात.

३) निर्मात्याचे नाव दिसण्यासाठी

प्रत्येक निर्माता त्याचे नाव आणि ब्रँड लोगो हा घड्याळाच्या मधोमध म्हणजे बारा वाजता जसे काटे येतात त्याच्या खाली छापतो. ह्याचे कारण तो लोगो आणि ब्रँड नेम स्पष्ट ग्राहकांना दिसण्यासाठी हि एकदम योग्य वेळ आहे. पण १०:१० ह्या वेळेमुळे जी आकृती बनते, त्यामुळे ब्रँडचे नाव V आकाराच्या मध्ये येते, त्यामुळेच त्याकडे लगेच लक्ष जाते व ते अधिकच आकर्षक दिसते. हे एक कारण असू शकेल असा अंदाज आहे.

clock time 10 10 meaning, facts about 10 10, why do watch pictures always show 10 10, 10 10 time history in marathi, why clock shows 10 10, १० वाजून १० मिनिटे

४) हिरोशिमा व नागासाकी

काही लोकांच्या मते हिरोशिमा, नागासाकीवर अणू हल्ला १० वाजून १० मिनिटे ह्या वेळात झाला होता. म्हणून मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी ही वेळ निवडली आहे. पण तिथले स्थानिक लोक ह्या गोष्टीला विरोध करतात, कारण हा हल्ला हिरोशिमा व नागासाकीच्या स्थानिक वेळेनुसार ८ वाजून १० मिनिटे या वेळी झाला होता असे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे हे पूर्णपणे खरं मानता येणार नाही. त्यामुळे ही सुद्धा एक अफवाच असेल असं म्हणण्यास वाव आहे.

५) पहिले घड्याळ तयार झाल्याचा वेळ

काही लोक सांगतात कि ही वेळ म्हणजे जगातले पहिले घड्याळ तयार झाले ती वेळ आहे, त्यामुळे तिला महत्व आहे, पण ह्यात सुध्दा काही तथ्य नाही. कारण मनुष्य हजारो वर्षांपासून सूर्यप्रकाशाचा वापर करून वेळ बघत आला आहे, त्यामुळे हे सुद्धा आपल्या तर्कबुद्धीला पटण्यासारखे नाही. आज दिसत आहेत त्या स्वरूपाची घड्याळं जरी आधी नसली, तरी ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही कि पूर्वीच्या काळी घड्याळे नव्हतीच. त्यामुळे हेही कारण योग्य असेल असे वाटत नाही.

६) सगळ्या शक्यता तपासून बघता, दिसायला आकर्षक, ग्राहक मनावर चित्र आणि ब्रॅण्ड बिंबवण्याचा हा एक मार्केटिंग फंडा आहे इतकाच निष्कर्ष ह्यातून आपण काढु शकतो. एका राजकीय पक्षाने सुद्धा हे १०:१० हि वेळ दाखवणारे घड्याळ हे आपले राजकीय चिन्ह म्हणून निवडले आहे. ह्याचाच अर्थ ह्या वेळेचा इतका खोलवर परिणाम समाज मनावर झाला आहे, हे मात्र निश्चितपणे आपण सांगू शकतो. चालू वेळेबरोबरच बंद घड्याळ सुद्धा अनेक उपयोगी कामं करते हेच ह्यातून आपल्या लक्षात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.