अभिनेत्री गौतमी देशपांडे बद्दल संपूर्ण माहिती
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची छोटी बहीण असलेली Marathi Actress म्हणजे गौतमी देशपांडे. गौतमीने (Gautami Deshpande) आपल्या पहिल्याच मालिकेतून महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली आहेत. मृण्मयी देशपांडेची छोटी बहिण असली तरी तिने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गौतमीचा जन्म 31 जानेवारी 1992 रोजी पुण्यामध्ये वडील विवेक देशपांडे आणि आई प्रतिभा देशपांडे यांच्या पोटी झाला. पुण्यातूनच Gautami Deshpande ने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातूनच इंजीनियरिंगची पदवी देखील संपादित केली.
फार कमी लोकांनाच हे माहिती आहे की गौतमी देशपांडे एक इंजिनियर आहे. या सोबतच तिला फॉरेन लॅंग्वेज देखील अवगत आहेत. गौतमीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची खूप आवड होती.
लहानपणा पासूनच या क्षेत्राचे आकर्षण असल्यामुळे तिने लहान असताना अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. कॉलेज पूर्ण केल्यावर तिला इंजिनियरिंगची पदवी मिळाली मग तिने जॉब करण्यास सुरुवात केली परंतु आपल्यामध्ये असलेली ॲक्टींगची आवड तीला काही गप्प बसू देईना.
मग काय तिने नोकरीला राजीनामा ठोकला आणि आपल्या आवडीला जोपासण्यासाठी ती अभिनय क्षेत्राकडे वळली. तिला तिच्या पहिल्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे नाव होते ‘सारे तुझ्याच साठी’. या मालिकेतून गौतमी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
या मालिकेमधील हर्षद अतकरी आणि गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हि जोडी चाहत्यांना खूपच आवडली. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत असल्यामुळे लोकांनी या मालिकेला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ती सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. गौतमीचा आवाज खूपच सुंदर असल्यामुळे गौतमी एक चांगली गायिका देखील आहे.
तिने 2016 मध्ये सुपर सिंगर स्पर्धेमध्ये भाग देखील घेतला होता. यासोबतच आपली बहीण मृण्मयी देशपांडेचा चित्रपट ‘मन फकीरा’ या चित्रपटात गौतमीने गाणे देखील गायले आहेत. गौतमीचं अजून लग्न झालेले नसून ती सिंगल असल्याची माहिती समोर आली आहे.
Gautami Deshpande Instagram वर देखील खूपच ऍक्टिव्ह असते, ती आपले फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते, तसेच काही गायनाचे छोटे व्हिडिओ देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
गौतमी देशपांडे बद्दल अधिक माहिती (Gautami Deshpande Biography)
वयक्तिक माहिती (Personal Info)
नाव : गौतमी विवेक देशपांडे
जन्म तारीख : 31 जानेवारी 1992
जन्म ठिकाण : पुणे
कॉलेज : युनिव्हर्सिटी ऑफ पुणे
शिक्षण : इंजीनियरिंग
कौटुंबिक माहिती (Family Info)
वडील : विवेक देशपांडे
आई : प्रतिभा देशपांडे
बहीण : मृण्मयी देशपांडे
छंद : गाणी म्हणणे
उंची, वजन इ. (Height, Weight etc)
उंची : 5 फूट 5 इंच
वजन : 55 किलो
केसांचा रंग : डार्क ब्राऊन
डोळ्यांचा रंग : काळा