Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

स्वतःच ७ हजार कोटींचा घोटाळा केला आणि स्वतःच उघडकीस आणला

कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणारा घोटाळा

घोटाळ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा विषय काही नवीन नाही. अक्षरशः डोकं चक्रावून जाईल एवढ्या रकमेचे घोटाळे आजवर आपण पाहिले आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा, तेलगी स्टॅंपपेपर घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा आणि असे कित्येक. अगदी राजकारणापासून ते संरक्षणक्षेत्रापर्यंत या घोटाळ्यांची व्याप्ती राहिलेली आहे. मग कॉर्पोरेट क्षेत्रसुद्धा याला अपवाद कसं ठरेल.

एकेकाळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अल्पावधीतच यश मिळवणाऱ्या ‘Satyam Computers’ या कंपनीत बी. रामलिंग राजू याने केलेला गैरव्यवहार हा कॉर्पोरेट क्षेत्रातील घोटाळ्याचे जिवंत उदाहरण ठरला. मग चला तर जाणून घेऊन कसा झाला होता हा घोटाळा !

सत्यम कम्युटर्सची ‘वाटचाल’ (Satyam Computers History)

१९८७ साली बी. रामलिंग राजूने हैदराबादमध्ये सत्यम कॉम्प्युटर्सची स्थापना केली. ही कंपनी सुरु करण्याआधी बी. रामलिंग राजू याचा कॉटन मिलचा व्यवसाय होता. १९९१-१९९२ मध्ये सत्यम कॉम्प्युटर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाली आणि २००१ मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर. त्यावेळी सत्यम कॉम्प्युटर्स भारतातील एक वेगाने वाढणारी कंपनी असल्याने सत्यम कॉम्प्युटर्स आणि B. Ramalinga Raju यांना अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते.

satyam computers case study, satyam computers history, satyam computers owner, why satyam computers failed, Byrraju Ramalinga Raju, reasons for downfall of satyam computers, mahindra satyam, satyam scandal essay, satyam scandal in marathi, सत्यम कॉम्प्युटर्स घोटाळा, बी रामलिंग राजू
Byrraju Ramalinga Raju and The Satyam Scandal

सत्यम घोटाळ्याची ‘सुरवात’

त्यावेळी रिअल इस्टेटच्या व्यवसायाने जोर पकडला होता. हैदराबादमध्ये देखील रिअल इस्टेटचे दर वेगाने वाढत होते. बी. रामलिंग राजूची नजर रिअल इस्टेटवर पडली आणि त्याने ठिकठकाणी जमिनी खरेदी करायला सुरवात केली. मेटस इन्फ्रा आणि मेटस प्रॉपर्टीस या कंपन्यांच्या नावावर (ज्या बी. रामलिंग राजू याच्याच कंपन्या होत्या) तसेच आपल्या नातेवाईकांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करण्याचे काम राजूने सुरु केले.

B. Ramalinga Raju एवढ्या वेगाने प्रॉपर्टी खरेदी करत सुटला होता की नंतर त्याला पैशाची चणचण भासू लागली. ही चणचण दूर करण्यासाठी राजूने सत्यम कंपनीच्या फायनॅनशियल स्टेटमेंट्समध्ये (हिशोबात) फेरफार करायला सुरवात केली. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास जर कंपनीला ६० कोटींचा नफा झाला असेल तर राजू तो नफा ६०० कोटींचा दाखवायचे.

त्याच्या या फेरफारीमुळे कंपनीचा कारभार खूप उत्तम सुरु असून कंपनी वेगाने वाढत आहे अशी खोटी प्रतिमा निर्माण झाली. परिणामी कंपनी खूप चांगली चालते आहे म्हणून कंपनीच्या शेयर्सची मागणी वाढली आणि शेयर्सचे भाव वेगाने वाढू लागले. याच गोष्टीचा फायदा घेत बी. रामलिंग राजू याने Satyam Computers चे शेयर्स मोठ्या किंमतीला विकले आणि स्वतःजवळील शेयर्स गहाण ठेवून त्यामार्फत पैसे उभारले.

सत्यम घोटाळ्याची ‘वाढती व्याप्ती’ (The Satyam Scandal)

या उभारलेल्या पैशातून जमिनी खरेदी करण्यासाठी बी. रामलिंग राजूने शेकडो कंपन्या स्थापन केल्या. आपल्या मित्र, नातेवाईक व स्वतःकडे काम करणाऱ्या लोकांना या कंपन्यांचे डायरेक्टर बनवून त्यांच्या नावावर जमिनी घ्यायचा सिलसिला राजूने सुरु केला. मेट्रोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इ. श्रीधरन यांचे म्हणणे होते की बी. रामलिंग राजू जवळ हैदरबाद मेट्रोची अंतर्गत माहिती होती आणि यामुळेच त्याला या मेट्रोचा मार्ग कुठून जाणार आहे हे ही माहित होते. राजूने या मार्गा नजिकच्या जमिनी या विचाराने खरेदी करायला सुरवात केली की जेव्हा मेट्रो लाईन तयार होईल तेव्हा या जागांची किंमत वाढेल आणि त्यातून होणाऱ्या नफ्यातून सत्यम कंप्युटरचा दाखवलेला खोटा नफा भरून काढता येईल.

राजू कंपनीचा कारभार उत्तम सुरु आहे, हे दाखवण्यासाठी खोटे सेल्स इन्व्हॉईस तयार करायचा आणि त्यातून मिळालेले पैसे हे बँकेत रिझर्व आहे असे भासवण्यासाठी खोट्या बँक स्टेटमेंट तयार करायचा. कित्येक वर्ष त्याचा हा खेळ असाच सुरु होता. यामुळे प्रत्यक्षात झालेला नफा आणि कागदोपत्री दाखवत असलेला नफा यातील दरी वाढतच गेली व तिचे रूपांतर एका मोठ्या आकड्यात होऊन हा गॅप भरून काढणे राजूला झेपेना झाले.

बी. रामलिंग राजूचे ‘फसलेले प्लॅन व झालेली कोंडी’

२००८ साली आलेल्या मंदीने रिअल इस्टेटचे भाव जोरदार आपटले आणि प्रॉपर्टी विकून नफ्यातील गॅप भरून काढण्याचा बी. रामलिंग राजूचा प्लॅन सपशेल फसला. वाढवून चढवून दाखवलेल्या नफ्याचा हिशोब कसा लावायचा या विवंचनेत असलेल्या B. Ramalinga Raju ने आणखी एक शक्कल लढवली. मेटस इन्फ्रा आणि मेटस प्रापर्टीज या स्वतःच्या असलेल्या कंपन्यांचे शेयर्स खरेदी करण्याचा निर्णय राजुने घेतला. मेटास इन्फ्राचे १०० टक्के आणि मेटस प्रॉपर्टीसचे ५१ टक्के शेयर्स खरेदी करून सत्यमला झालेला नफा (जो प्रत्यक्षात झाला नव्हता फक्त कागदोपत्री वाढवून दाखवला होता) या ठिकाणी खर्च झाल्याचे दाखवून प्रत्यक्ष नफा आणि कागदोपत्री नफा यातील तफावत भरून काढण्याचा राजूचा प्लॅन होता.

१६ डिसेंबर २००८ ला सत्यमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने या प्लॅनला लगेचच मंजुरी दिली. शेयर होल्डर्सची परवानगी न घेता राजूने या डिलला मंजुरी दिली. पण सत्यमचा हा निर्णय गुंतवणूकदारांना काही पसंत पडला नाही, खासकरून सत्यमच्या इंस्टिट्युशनल गुंतवणूकदारांना. या निर्णयानंतर सत्यमच्या शेयर्सचे भाव चांगलेच कोसळले. एवढंच नाही तर अमेरिकेतील सत्यमच्या एका गुंतवणूकदाराने सत्यम विरोधात खटला सुद्धा दाखल केला आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सत्यमचे स्टॉक ५५ टक्क्यांनी पडले. या सर्व घडामोडींमुळे सत्यमवर दबाव आल्याने सत्यमला मेटस सोबत होणारी डील रद्द करावी लागली.

बी. रामलिंग राजूने ‘स्वतःच केला घोटाळा उघड’

प्रत्यक्ष नफा आणि वाढवून चढवून दाखवलेला नफा यातील दरी भरून काढण्याचे सर्वच प्रयत्न फसल्याने व यातून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने ७ जानेवारी २००९ रोजी बी. रामलिंग राजूने सेबीला स्वतःच पत्र लिहून इतक्या वर्षांपासून सुरु असलेल्या घोटाळ्याची माहिती दिली.

कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या या ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा निकाल सहा वर्षांनंतर लागला. बी. रामलिंगा राजूला ५.५ कोटी रुपयांच्या दंडासहित ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. सेबीने सत्यम कॉम्प्युटरचा संस्थापक (Founder of Satyam Computers) आणि मुख्य आरोपी बी रामलिंगा राजू याच्यासह त्याच्या चार अन्य पूर्व अधिकार्यांना पुढील १४ वर्षांसाठी कोणत्याही व्यवहारात सहभागी होण्यास बंदी घातली. तसेच चुकीच्या पद्धतीने कमावलेले १८४९ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले.

satyam computers case study, satyam computers history, satyam computers owner, why satyam computers failed, Byrraju Ramalinga Raju, reasons for downfall of satyam computers, mahindra satyam, satyam scandal essay, satyam scandal in marathi, सत्यम कॉम्प्युटर्स घोटाळा, बी रामलिंग राजू
Satyam scandal in marathi

सत्यम कॉम्युटर्सचे ‘पुनर्वसन’

सत्यम घोटाळा उघडकीस येताच सरकारने सत्यम कंपनीवर लगेचच नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची नेमणूक केली आणि कंपनीला पूर्णतः कोसळण्यापासून वाचवण्यासाठी तयारी सुरु केली. कंपनी वाचवण्यासाठी सरकारचा प्लॅन हा होता की शक्य तितक्या लवकर कंपनी विकली जावी. सरकारी लिलावात २००९ साली महिंद्रा ह्या कंपनीने सत्यमला विकत घेतले आणि कंपनीचे नाव महिंद्रा सत्यम (Mahindra Satyam) झाले. पुढे महिंद्रा सत्यमचे टेक महिंद्रामध्ये विलीनीकरण करण्यात आले.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.